मोबाईल चे महत्व मराठी | Mobile Che Mahatwa In Marathi | Important Of Mobile In Marathi
मित्रांनो मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आजच्या काळामध्ये मोबाईल शिवाय जगणे हे कठीणच झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये मोबाइल पाहायला मिळतो.
दिसायला जरी लहान असला तरी एवढ्याश्या मोबाईल मध्ये संपूर्ण जग सामावलेले आहे. त्यामुळे मोबाईल चे महत्व हे खरंच अनन्यसाधारण आहे म्हणून आजच्या लेखामध्ये आपण मोबाईल चे महत्व मराठी | Mobile Che Mahatwa In Marathi | Important Of Mobile In Marathi घेऊन आलोत.
मोबाईल चे फायदे व तोटे मराठी | Mobile Che Fayde Ani Tote In Marathi
Table of Contents
आजच्या वैज्ञानिक विभागामधील शास्त्रज्ञाने विविध शोध लागतो त्यातील मोबाईलचा शोध हा सर्वात महत्वाचा आणि फायद्याचा ठरला. मोबाईल मुळे सर्वसामान्यांचे जीवन अधिक सोपे आणि सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनाचा मोबाईलला हा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाइलला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.
आज पासून सुमारे 20 ते 25 वर्षा अगोदर मोबाईल म्हटले की सर्वांना आश्चर्य वाटत असे. सुरुवातीला मोबाईल हा खूप असाधारण होता त्या मोबाईल फोन वापर फक्त एकमेकांशी बोलण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी केला जात होता परंतु काळानुसार झालेल्या बदलामुळे आजचा मोबाईल फोन हा देखील स्मार्ट झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये संपूर्ण जग सामावलेले आहे.
बटनाचा मोबाईल पासून ते स्मार्ट किंवा टचस्क्रीन मोबाईल पर्यंतचा मोबाईलचा हा प्रवास सर्वांसाठी आश्चर्यजनक आहे. दरवर्षी बाजारपेठे मध्ये मोबाईलचे देखील विविध मॉडेल्स पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे लोक गाड्यांना महत्त्व देतात त्याप्रमाणे आज मोबाईलला देखील महत्त्व प्राप्त झालेले आहे बाजारपेठेमध्ये मोबाईलचा नवीन मॉडेल कधी लॉन्च होईल त्याचे आतुरतेने वाट पाहत असतात.
उच्च ब्रँडचे मोबाईल वापरणे यावरून व्यक्तीची प्रतिष्ठा ठरविली जाते. त्यामुळे सर्वजण आपल्याकडे चांगल्या कंपनीचा मोबाईल असावा अशी अपेक्षा ठेवून मोबाइल खरेदी करतात.
ज्या प्रमाणे शरीराला हात, पाय ,तोंड असतात. त्याप्रमाणे मोबाईला हा देखील शरीराचा एक नवीन अवयवच बनला आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मोबाईल चा विविध प्रकारे उपयोग होतो. मोबाईलचे खूप सारे फायदे आहे त्यामुळे मोबाईल चे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
मोबाईल चे महत्व कुठल्या कारणामुळे किंवा कायद्यामुळे वाढत चालले आहे ते आपण आता पाहू यात.
मोबाईल चे महत्व :
मोबाईल मध्ये होणाऱ्या विविध फायद्यांमुळे मोबाईल चे महत्व खूप वाढत चालले आहे मोबाईल सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.
-
इंटरनेट चालवण्याचे सर्वोत्कृष्ट साधन :
मोबाईल च्या मदतीने आपण कधीही कोठेही इंटरनेटची सेवा उपलब्ध करून शकतो. आपण सर्वांना तर माहितीच आहे इंटरनेटच्या मदतीने आपण जगभरातील कुठलीही माहिती सहज रित्या उपलब्ध करू शकतो. आणि ती माहिती पाहण्यासाठी मोबाईल हे उत्कृष्ट साधन आहे. त्यामुळे मोबाईला खूपच महत्त्व दिले जाते.
-
मनोरंजनाचे साधन :
मोबाईल फोन हा मनोरंजनाचे साधन म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते मोबाईल च्या मदतीने आपण व्हिडिओ, यूट्यूब सारख्या ॲपच्या द्वारे मनोरंजन करून घेऊ शकतो. जर आपल्या जवळ मोबाईल असेल तर आपल्याला कोणत्याही व्यक्तीची गरज भासणार नाही. आपण मोबाईलच्या साह्याने स्वतःचे मनोरंजन करून घेउ शकतो आणि मोबाईल मध्ये आपला वेळ कसा जाईल हे सुद्धा कळणार नाही.
-
व्यावसायिक क्षेत्रामध्ये मदत :
मोबाईल फोन हा असा साधन आहे जो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला उपयुक्त ठरतो. आज बहुतांश व्यवसाय आहे मोबाईल फोन वरूनच केले जातात त्यामुळे व्यवसायाचा वेग वाढला व कमी वेळेमध्ये जास्त फायदा होऊन कामे होऊ लागली. काही मिनिटांमध्येच एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्यांशी सहजरित्या संपर्क साधतो व मोबाईल वरूनच माहितीची देवाण-घेवाण करु लागला आहे.
-
शिक्षण क्षेत्रामध्ये मोबाईल चे महत्व :
असे एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये मोबाईल वापरला जात नाही आजच्या काळामध्ये तर शिक्षण क्षेत्रामध्ये मोबाईल ने बाजी मारली आहे. अलीकडील काही काळामध्ये महामारी पसरल्याने सर्वजण थक्क झाले अशा काळामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू केली आणि हे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत मोबाईलच्या साह्याने पोहोचवले जाते. शिक्षण क्षेत्रातील मोबाईलच्या या महत्त्वामुळे मोबाइलला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे व आज लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना जवळ मोबाईल पहायला मिळतो.
-
छायाचित्रण काढण्यासाठी उपयुक्त :
पूर्वी छायाचित्रे काढण्यासाठी लोक कॅमेरे चा वापर करत होते परंतु मोबाईल च्या शोधामुळे कॅमेरे नाहीसे होऊन मोबाईल मध्येच कॅमेरा हा ऑप्शन आलेला आहे. त्यामुळे आपण सहज घेता कोणत्याही ठिकाय मोबाईल द्वारे फोटो काढू शकतो
आपल्या जीवनातली प्रत्येक आनंद हा आपण मोबाईलचा मध्ये कॅमेरा मध्ये कैद करू शकतो. एवढेच नसून मोबाईल मध्येच सेल्फी हा ऑप्शन आहे ज्याच्या मदतीने आपण स्वतःचा फोटो स्वताच काढू शकतो.
-
बँक सुविधांसाठी मोबाईलचा वापर :
मोबाईलचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे मोबाईल मध्ये बँकिंग सेवा घरबसल्या सोपी झाली. पूर्वी पैसे काढण्यासाठी केव्हा बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी बँकेत सोबत लांब रांगेमध्ये उभा राहण्याची गरज होती. परंतु आता आपण घर बसल्या पैशाची देवाण-घेवाण सहजरीत्या करू शकतो.
-
सोशल मीडिया एप्स वापरण्याकरिता :
सोशल मीडिया एप्स वापरण्यासाठी मोबाईलचा खूप मोठ्या प्रमाणे वापर केला जातो. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप यांसारख्या सोशल मीडिया एप्स वापरण्याकरिता मोबाईलचा खूप मोठा वापर दिवसेंदिवस होत चालला आहे.
या सर्व कारणांमुळे मोबाईलचे महत्त्व हे अधिकच वाढत आहे व मोबाईल सर्वांच्या जीवनामध्ये महत्त्वाचा भाग बनला आहे.
तर मित्रांनो ! ” मोबाईल चे महत्व मराठी | Mobile Che Mahatwa In Marathi | Important Of Mobile In Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.
ये देखील अवश्य वाचा :-
- संगणक शाप की वरदान मराठी निबंध
- सर्वोत्तम मोटारसायकल अपघात वकील
- नऊ ग्रहांची मराठी माहिती
- माझी मातृभाषा मराठी निबंध
- ड्रॉप शिपिंग म्हणजे काय?
धन्यवाद मित्रांनो !
This is nice