मी शाळा बोलतेय मराठी निबंध | Mi Shala Boltoy Marathi Nibandh

मी शाळा बोलतेय मराठी निबंध | Mi Shala Boltoy Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” मी शाळा बोलतेय मराठी निबंध | Mi Shala Boltoy Marathi Nibandh “ घेऊन आलोत. आम्हाला खात्री आहे की या वेबसाईटवर हे सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी शाळा बोलतेय मराठी निबंध | Mi Shala Boltoy Marathi Nibandh

प्रत्येकाच्या जीवनामध्ये शाळेला अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे. शाळा हे आपले ज्ञानाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते मुल जन्माला आल्यानंतर त्याला घरा व्यतिरिक्त चांगल्या वाईट गोष्टीचा संस्कार जे तेज दिले जातात ते म्हणजे शाळाच होय.

नमस्कार मित्रानो! मी शाळा बोलते. धन्यवाद! कारण तुम्ही आज मला येथे बोलण्याची संधी प्राप्त करून दिली खूप दिवसापासून मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा होती पण आज ती इच्छा पूर्ण होत आहे.

होय, मी शाळा बोलते ऐकून थोडे नवल वाटत असेल. मी शाळा माझ्यामुळेच तुम्हा सर्वांना ज्ञान प्राप्त झाले व माझ्या माझ्या मध्ये घेतलेला ज्ञाना मुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकलात.

शाळेमध्ये तुम्ही प्राथमिक शिक्षण घेतले व या प्राथमिक शिक्षणातूनच तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला पुढचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यामध्ये मदत झाली. तुम्ही जसे तुमच्या जीवनामध्ये यशस्वी झाला तसे मला विसरलात मी तुमच्यासाठी केलेली सर्व कर्तव्य विसरलात. म्हणून आज माझा संयम संपला. मी निपुटपणे सर्व सहन करत आले.

पण आता मला राहवत नाही माझ्यावर होणारा अन्याय मी सहन करू शकत नाही. तुम्ही जेव्हा गरज असते तेव्हा मला आठवन करता त्यानंतर माझ्याकडे डोकावून हे पाहत नाही. त्यामुळे मी खूप दुःखी आहे.

मला आनंद होतो की विविध विद्यार्थी माझ्या मध्ये येतात ज्ञान प्राप्त करतात आणि जीवनामध्ये यशस्वी होतात परंतु मला देखील:ख वाटते माझ्या मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा असते की त्यांनी त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पायरी मध्ये मला आठवण ठेवावे.

आजचे लोकं स्वार्थी झाले आहेत स्वतःचा स्वार्थी पणा मुळे माझ्यावर कसलेही आरोप करून मला बदनाम करीत आहे. संपूर्ण समाजामध्ये असे उठवले आहे की, माझ्यामुळे चांगले शिक्षण मिळत नाही.

आपल्या पाल्याचे भवितव्य धोक्यात आहे असा अपप्रचार केला जातो. माझ्यावर काहीही खोटे आरोप सोडून संपूर्ण समाजामध्ये शाळा म्हणजे पालक आपल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी घाबरत आहेत.

समाजातील स्वार्थी आणि धनिक लोक तर संपूर्णपणे मला संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण मी कोणालाही घाबरणार नाही सर्व समस्यांना धडपणे तोंड देत मी उभी राहणार आहे.

ज्याप्रमाणे आधुनिक काळ बदलत आहे त्याप्रमाणे माझे स्वरूप देखील बदलत चालले आहे त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी माझ्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी घाबरण्याची गरज राहणार नाही.

आज माझी विविध माध्यमे तुम्हाला पाहायला मीळतील जसे की मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम , तेलुगु, कन्नड , हिंदी अशा विविध भाषांतून उपलब्ध झाली आहेत तुम्हाला ज्या भाषेतून आपले शिक्षण घ्यायचे आहे त्यासाठी मी शाळा उभे झाले आहे.

माझ्या मध्ये तुम्ही योग्य ज्ञान प्राप्त करून घेतले तर तुम्हाला हमखास सरकारी नोकरी किंवा इतर नोकरी मिळवण्यासाठी मी मदत करीन. म्हणून तुम्हाला जीवन आवश्यक असणाऱ्या सर्व गुण प्राप्त होतील चांगले वाईट गोष्टीचे ज्ञान, अभ्यासाचे ज्ञान आणि तुमचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

तसेच माझ्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नीतिमूल्य संस्कार, शिस्त ,ज्ञान ,मोठ्यांचा आदर असे विविध गोष्टींचे ज्ञान शाळा याच माध्यमातून प्राप्त होतात मुलांना प्राथमिक संस्कार हे घरातून मिळतात मान्य आहे परंतु मुलांचे दुसरे घर हे शाळा चा असते.

तुम्हाला तुमचा पाल्य आदर्श विद्यार्थी किंवा आदर्श व्यक्तिमत्व बनवायचे असेल तर तुमच्या पाल्याला शाळेमध्ये पाठवणे गरजेचे आहे. मध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील असा कुठल्या ना कुठल्या पदापर्यंत पोहोचणार असतो.

आज तुम्हा सर्वांच्या सहकार्याने मला नवीन रूप प्राप्त झाले आहेत म्हणजेच आज माझ्या स्वरूप हे डिजिटल स्वरूपामध्ये बदलले आहे मी आज तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी डिजिटल झाले आहे. त्यामुळे माझ्यामध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा काळानुरूप बदलू सुद्धा शकतो.

शेवटी सांगायचे एवढेच की मी शाळा तुमच्या विद्यार्थांना भविष्यामध्ये यशस्वी काढण्यासाठी आणि अशा पर्यंत पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते त्यामुळे सर्वांनी माझा आदर करा व माझा अप्रचार करू नये. मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते त्यामुळे सर्वांनी आपल्या पाल्याला वेळ शाळेमध्ये पाठवून आपले कर्तव्य पार पाडावे हीच विनंती.

तर मित्रांनो ! हे लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment