मी सैनिक झालो तर निबंध मराठीत । Mi Sainik Zalo Tar Nibandh Lekhan

मी सैनिक झालो तर निबंध मराठीत । Mi Sainik Zalo Tar Nibandh Lekhan

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी सैनिक झालो तर निबंध मराठीत । Mi Sainik Zalo Tar Nibandh Lekhan ” घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी सैनिक झालो तर निबंध मराठीत । Mi Sainik Zalo Tar Nibandh Lekhan

मी सैनिक झालो तर मराठी निबंध :

प्रत्येक देशाची सैना नाही त्या देशाची सर्वात मोठी शक्ती असते. त्यामुळे देशाच्या सुरक्षेची जबाबदारी ही देशातील एक सैनिकावर असते. त्यामुळे प्रत्येक देशाच्या सुरक्षेसाठी सैनिक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. देशातील सैनिक प्रत्येक परिस्थितीला धैर्याने आणि सामर्थ्याने सामोरे जातात.

देशाच्या सेवेसाठी सैनिक आपल्या प्राणांचा सुद्धा विचार करत नाहीत. आपल्या परीवारा पासुन कुटुंबापासून लांब राहून देशाचे सेवा करण्यात मग्न असतात. त्यामुळे मला आपल्या देशातील सैनिकांचा खूप अभिमान वाटतो.

1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांचे एक मार्मिक स्मरण मी एका पुस्तकात वाचले. त्या शूर वीर आणि धैर्यवान आणि देश प्रेमी सैनिकांचे व्यक्तिमत्व वाचत कसाणा मीही विचार केला, मोठे होऊन सैनिक व्हायचे आहे.

जर ” मी सैनिक झालो तर ” आपल्या भारत देशाचे मनोभावाने सेवा करीन. आपल्या स्वतंत्र भारताचे सेना आणि फौजही संपूर्ण जगभरामध्ये प्रख्यात आहे. त्यामुळे असे फौजेचा एक हिस्सा होणे माझे मी सौभाग्य समजेल. आपल्या देशाचे सैनिक देशाच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये देशाचा अभिमान आणि स्वतंत्र जगण्यासाठी कधीही तत्पर असतात.

त्यामुळे मी सैनिक झालो तर आपल्या देशाची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहील. त्यामुळे माझ्या जीवनाचे एकच ध्येय आहे ते म्हणजे सैनिक बनणे.

जर मी सैनिक झालो तर हे माझे सौभाग्य समजेल. बहुतांश विद्यार्थ्यांना मोठ्या होऊन डॉक्टर, शिक्षक, इंजिनीयर, मुख्याध्यापक होण्याची इच्छा असते परंतु माझी इच्छा आहे की मी मोठे होऊन सैनिक व्हावे.

लहानपणापासूनच मला आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. देशाची सेवा करणे हे माझे स्वप्न आहे. आणि माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सैनिक बनणे हा मार्ग स्वीकारेन. जेव्हा प्राथमिक शाळेमध्ये शिकत होतो तेव्हाच माझे आई-वडील मला सांगत होते की, मोठे‌ होऊन तुला आपल्या भारत देशासाठी देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. तेव्हापासूनच मी ठरवले की, मोठे होऊन मला देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी करायचे आहे.

आज आपल्या देशाला अनेक संकटाने ग्रासले आहे. शत्रु देशा मुळे आपल्या देशावर रोज काही ना काही समस्या उद्भवत आहेत. शत्रु देशांत पासून आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या देशाचे सैनिक सीमेवर तर उभे राहतात. जर मी सैनिक झालो तर मी सुद्धा सर्व सैनिकांसोबत मिळून देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता देशाची सेवा करेन.

शत्रु देशांत पासून आपल्या देशाचे होत असलेले नुकसान थांबवण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल. देशाच्या सैनिकावर देशाचे संपूर्ण जबाबदारी असते.

जर मी सैनिक झालो तर मला माझ्या कुटुंबापासून दीर्घकाळ दूर रहावे लागेल पण या गोष्टीचा मला जराही खेद नाही कारण मी माझ्या देशाचा सुरक्षितेसाठी सैनिक झालो.

माझ्या देशातील कुटुंबासोबत देशातील सर्व कुटुंबातील सदस्य सुखरूप राहील याकरिता मी आपल्या देशाच्या सैन्यात जाईल व देशाचे रक्षण करेल. जर मी सैनिक झालो तर या गोष्टीचा माझ्या परिवाराला सुद्धा हे आनंद असेल कारण मी देशाच्या सुरक्षिततेसाठी काम करत असेल.

जर मी सैनिक झालो तर कुटुंबापासून दूर नवीन नवीन ठिकाणी माझे कर्तव्य पार पाडत असेल. सैन्यामधील वेगवेगळ्या फौजांशी माझी मैत्री झाली असती.सैन्यात राहून मी उत्कृष्ट कार्य केले असते ज्यामुळे सैन्यातील उच्च अधिकाऱ्यांकडून माझा सन्मान होईल.

इतकेच नव्हे तर मी सैनिक झालो असतो तर सर्व समाजातील लोकांनी माझा सन्मान केला असता. जेव्हा जेव्हा मी सैनिकाची ड्युटी संपवून सुटल्यावर घरी गावाकडे आलो असतो तर गावातील लोकांनी माझा सन्मान करतील. ज्यामुळे समाजामध्ये माझ्या आई-वडिलांचे मान उंचावली असते. अशाप्रकारे मी एक उत्तम सैनिक बनून मी माझे देशाचे व माझ्या कुटुंबाचे नाव उंचावेल.

आपल्या देशामध्ये सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. काही सैनिकांनी तर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची पैज लावली. जखमी अवस्थेमध्ये सुद्धा आपल्या देशावर शत्रू सैन्याने हल्ला करू नये यासाठी लढत राहिलेले सैनिक आपल्या समाजासाठी एक गर्वाची गोष्ट आहे.

जर मी सैनिक झालो तर माझ्या आचरण मी एवढे उत्कृष्ट बनवेल की, देशातील अनेक सैनिकांना माझ्यापासून प्रेरणा मिळेल. सैनिकांमध्ये जी विसरत आसावी ती माझ्या रक्ता-रक्ता मध्ये असेल. माझ्यापेक्षा अधिकारांचा पूर्ण आदर करेल. मी त्यांच्या सर्व आज्ञांचे पालन करेल.

खरंच ! भारतीय सैन्यातील सैनिक बनून मी राष्ट्राचा अभिमान आणि स्वातंत्र्याचा पहारेकरी बनेल. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जागणे आणि म्हणे यालाच मी माझ्या जीवनाचे ध्येय समजेल.

सैनिक बनण्यासाठी लागणारी सर्व कष्ट आणि परिश्रम मी आज पासून करायला सुरुवात करेल. व सैनिक बनण्याचे माझे स्वप्न नक्कीच पूर्ण करेन.

तर मित्रांनो ! ” मी सैनिक झालो तर निबंध मराठीत । Mi Sainik Zalo Tar Nibandh Lekhan “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” मी सैनिक झालो तर निबंध मराठीत “ या मध्ये काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

 

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “मी सैनिक झालो तर निबंध मराठीत । Mi Sainik Zalo Tar Nibandh Lekhan”

Leave a Comment