मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध | Mi Sahyadri Boltoy Marathi Nibandh

मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध | Mi Sahyadri Boltoy Marathi Nibandh

मित्रांनो! तुम्ही सह्याद्री हे नाव तर ऐकलेच असेल. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीचे वास्तव्य पसरलेले असून सह्याद्री पर्वत हा कोकणाला आणि महाराष्ट्राला विभागाचे काम करतो. कित्येक वर्षापासून ऊन, वारा, पाऊस झेलत आपल्या राज्याचे रक्षण करीत असलेला हा सह्याद्री पर्वत बोलू लागला तर आपल्याशी काय बोलले? ही कल्पना आम्ही आजच्या लेखामध्ये घेऊन आलं चला तर मग पाहूया….

मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध | Mi Sahyadri Boltoy Marathi Nibandh

मित्रांनो! ओळखलं का मला मी आहे, “सह्याद्री पर्वत” होय, खरंच मी सह्याद्री पर्वत बोलत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या रक्षणासाठी कित्येक वर्षापासून येथे स्थायिक आहे.

मीच आहे सह्याद्री पर्वत ज्याने निजामशाही, आदिलशाही व मुघलांना आपल्या देशातून पळून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली. महाराष्ट्र मध्ये असलेले रायगड, राजगड, तोरणा हे किल्ले देखिल माझ्या छत्र छायेखाली आहेत. एवढेच नसून महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे शिखर असण्याचा मान मिळणारे कळसुबाई शिखर हेदेखील माझेच ना!

आपल्या देशातील खूप लोकांना माझ्या सानिध्यात राहायला खूप आवडते. कारण माझा हिरवागार रंग आणि त्यावर येणारे रंगीबेरंगी फुले पावसाळा ऋतु आला की, आपल्या देशातील निसर्गप्रेमी आणि चित्रकार प्रेम नक्कीच मला भेट द्यायला येतात. माझे वास्तव्य हे महाराष्ट्रातील तापी नदी पासून ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेले पहायला मिळते.

मी सह्याद्री पर्वत परंतु मला महाराष्ट्रातील पश्चिम घाट या नावाने देखील ओळखले जाते. सह्याद्री बोलते माझ्यामुळे तर कोकण आणि महाराष्ट्र राज्य वेगवेगळे झाले तसेच भीमा, तापी,‌कृष्णा आणि गोदावरी या चारी नद्यांचा प्रवाह बदलणारा मी सह्याद्री बोलतोय.

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, कारण मी महाराष्ट्र राज्याच्या सेमी मध्ये येऊन मला मराठी माणसांचा सहभाग लाभला यामुळे माझे मोल आणखीनच वाढले.

त्यामुळे मी सतत महाराष्ट्राचे व मराठी माणसांचे रक्षण करीत इथे उभा आहे. खरतर ह्या सह्याद्री पर्वताला जगायला आणि प्रेम करायला शिकवणाऱ्या राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. तुमच्या सर्वांचा प्रेम आणि सहवास मला लाभला म्हणून कित्येक वर्षापासून मी असाच तुमचे रक्षण करीत उभा आहे.

Read : छत्रपती शिवाजी महाराज बद्दल संपूर्ण माहिती.

म्हणून महाराष्ट्र राज्य बद्दल माझ्या मनात नेहमीच आदर आणि सन्मानाची भावना आहे. महाराष्ट्राचे गुणगान गाताना माझा तोंडी नेहमी एक ओळ असते “माझ्या महाराष्ट्र मातीचा, लावा कपाळी टिळा”.

तुम्ही महाराष्ट्रीय लोक म्हणजे नटसम्राट हा चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. मित्रांनो मी सुद्धा एक नटसम्राटच आहे. अहो! मी सह्याद्री मीच आहे त्या कोकणाचा श्रावणधारा, मीच आहे हरिश्चंद्र चा कोकण कडा आणि मीच आहे सातारचे कास पठार.

मी सह्याद्री बोलतोय, मी सह्याद्री होऊन अनेक वेळा असंख्य अशा भूमिका पार पाडल्या आहेत.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येतच असतात त्याप्रमाणे मी सह्याद्री माझ्या जीवनामध्ये देखील दुःखाचे डोंगर पसरलेले आहे. आज वाढत्या औद्योगिक क्रांतीमुळे अनेक उद्योग धंदे यांनी मला पोखरले आहे. त्यामुळे मला दिवसेंदिवस अधिकच वेदना होत आहेत.

पण माझ्या या वेदना ऐकणार कोण? आणि मला या दुःखातून सावरण्याची कोण? आला तर बोलण्यासाठी मित्र करण्यासाठी सुद्धा कोणी नाही. मी आपला एकटा उभा तुमचे रक्षण करीत परंतू माझे रक्षण करणार कोण?

मी सर्व मनुष्याला स्वार्थी स्वतःच्या स्वार्थापायी मोठमोठी जंगले तोडून त्या ठिकाणी तुम्ही इमारती बांधण्यात आल्या, उद्योगधंदे सुरू केले. काँक्रेटची शहराच्या शहरे उभारण्यात आली परंतु या सर्वांचा त्रास कोणाला होतो तुम्हा आम्हालाच ना! तुमचा हा उपद्रव य का उत्सकसा सहन करतो हे मलाच माहिती! पूर्वी पावसाळा ऋतु सुरू होणार म्हटले की पूर्वीचे लोक सर्वत्र झाडे लावत होते कारण पावसाचे पाणी मिळाल्याने झाडे लवकर वाढतात असे मानले जाते परंतु आजच्या काळामध्ये लोकांना झाडे नकोसे झालेले आहेत त्यामुळे ते सतस वृक्षतोड करत आहेत.

परंतु आजचा मनुष्य विसरत चालला आहे की येथे वृक्षतोड केल्याने त्याला किती समस्यांना तोंड द्यावे लागेल. वृक्षतोड केल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन वाढतो त्यामुळे वायुप्रदूषण होते सोबत पावसाचे प्रमाण देखील कमी होते त्यामुळे दुष्काळ यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

एवढाच नसून आजच्या मनुष्याने मलादेखील पोखरायला सुरुवात केली आहे त्यामुळे माझा काही भाग हा तुटला आहे. विविधा इंधनाचा शोध खाणींचा शोध करण्याकरिता मला पोखरले जात आहे. तुम्ही जेवढा मला त्रास द्यायचा त्यापेक्षा अधिक त्रास तुम्हाला भोगावा लागेल.

परंतु माझ्या आसपास असलेली अभयारण्य म्हणजे सह्यादी अभयारण्य, कर्नाळा पक्षी अभयारण्य, कोयना अभयारण्य, मेळघाट अभयारण्य, ताडोबा अभयारण्य अशा अनेक लहान मोठ्या अभयारण्य आणि मला पुन्हा जीवनदान दिले आहे. युनेस्को द्वारा जागतिक वारसा प्राप्त असलेले महाराष्ट्रातील “कास पठार” हे देखील माझाच भाग आहे व मला याच्यावर खूप अभिमान आहे.

मी हे विसरता कामा नये की मी तुमचे रक्षण करतो माझ्यावर असणारे लोकसंख्येचे वृक्ष हे तुम्हाला ऑक्सिजन प्राप्त करतात तर माझ्या मध्ये कित्येक प्राणी-पक्षी नव्याने जीवन जगत आहेत एवढेच नसून मी आमच्यापर्यंत येणारे अतिथंड वाऱ्याला रोखतो. त्यामुळे तुमचा थंडीपासून बचाव होतो एवढेच नसून माझ्यामुळे महाराष्ट्र राज्य मध्ये पाऊस पडण्या मध्ये देखील मदत होते.

आज संपूर्ण जगामध्ये जैवविविधतेचे अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून मला ओळखले जाते. परंतु आज माझा होणारा र्हास तुमचे उद्याचा दिवस खराब करू शकतो. मी महाराष्ट्राच्या इतिहासाचे सुवर्णपान आहे त्यामुळे मला हरवू देऊ नका माझा इतिहास शोधा तलावाचा आणि त्याचा अभ्यास करा. मी तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे जाणून घ्या, एवढीच विनंती!

तर मित्रांनो ! ” मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध | Mi Sahyadri boltoy Marathi Nibandh “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

3 thoughts on “मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध | Mi Sahyadri Boltoy Marathi Nibandh”

Leave a Comment