मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर मराठी निबंध । Mi Nagarapalikecha Adhyaksha Zalo Tar Marathi Nibandh

मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर मराठी निबंध । Mi Nagarapalikecha Adhyaksha Zalo Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर मराठी निबंध । Mi Nagarapalikecha Adhyaksha Zalo Tar Marathi Nibandh “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की ,या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर मराठी निबंध । Mi Nagarapalikecha Adhyaksha Zalo Tar Marathi Nibandh

काल मुसळधार पाऊस पडला आणि संपूर्ण तालुक्यामध्ये गटारी तुंबल्या सर्वत्र पाणीच पाणी झाले. यामुळे काहीजणांच्या आर्थिक नुकसान देखील झाले.

अशा परिस्थितीमध्ये सर्वजण नगर पालिकेच्या अध्यक्षाला दोषी ‌‌ठरवत होते कारण, पावसाळा ऋतु सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी तालुक्यामध्ये कुठल्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. एवढेच नव्हे तर जेव्हा पासून निवडून निवडणुका झाल्या तेव्हापासून तालुक्यामध्ये कुठलीही सुविधा करण्यात आलेले नाही.

परिस्थितीमध्ये माझ्या मनात विचार आला की जर मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर… तालुक्यामध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिले असते.

खरंच! मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर किती मजेदार होईल ना…!

शहराची परिस्थिती पाहून मला माझ्या शिरा साठी काहीतरी करण्याची इच्छा होते त्यामुळे जर मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर नक्कीच माझ्या शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करेल.

माझ्या शहराचु परिस्थिती अत्यंत वाईट आहे शहरामध्ये कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत. सर्वत्र कचऱ्याचे ढीग आहेत शहरातील नदी-नाले, गटारे तुंबलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतील. दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे पावसाळा ऋतु मध्ये तर शहराची अवस्था विचारुच नका!

पूर्ण शहरामध्ये गटार आणि नाला यातील पाणी शिरते. पूर्ण शहराची अवस्था घाण होते. मच्छरांचे साम्राज्य पसरते यामुळे शहरातील बहुतेक जणांना डेंगू मलेरिया यांसारख्या रोगाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे शहरातील सर्व स्वच्छता विस्कटली आहे.

शहरांमध्ये दूषित आणि घातक पदार्थांची विक्री केली जाते यामुळे शहरातील सर्व लोक वाईट व्यसनाच्या मार्गी जात आहेत. पाणीपुरवठा करण्याची यंत्रणा देखील उपलब्ध नाही. त्यामुळे मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर शहराची पूर्ण रूपच बदलून टाकिल.

मी शहरभर नियमित आणि योग्य साफसफाई करीन. शहरातील प्रत्येक गटारींवर झाकण ठेवीन, तसेच वेळेवर साफ-सफाई करून घेईन. जेणेकरून शहरांमध्ये घाण बसणार नाही आणि शहरातील सर्व वातावरण स्वच्छ राहील.

तसेच मच्छरांची संख्या कमी करण्याकरिता मी वेळेवर फवारणी सुद्धा करून घेइन. तसेच हॉटेल आणि बाजारपेठेतील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देईन. माझ्या शहरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी मी सर्वोपर प्रयत्न करेन.

तसेच मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर माझ्या शहरातील लोकांचे जीवन सुखकर व्हावे त्यांना जीवनातील सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करीन. त्यासाठी मी शहरातील सर्व रस्ते दुरुस्त करीन,शहरांमध्ये वेळेवर पाणीपुरवठा, वीजपुरवठा यांची सुविधा उपलब्ध करून देईन.

तसेच लोकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात साठी सहजरीत्या जाता यावे यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करेन. वाहतुकीची सुंदर व्यवस्था करून, रस्ते अपघात रोखण्यासाठी मी प्रयत्न करीन.

नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी सदैव प्रयत्न करेन. मी शहरातील रस्ते आणि रस्त्यावरील दिवे व्यवस्थित हाताळील. माझ्या शहरातील सर्व लोकांना व्यवस्थित रोजगार मिळेल याकडे लक्ष केंद्रित करेल तसेच शहरातील सर्व मुलांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करेन.

याशिवाय मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर किमान माझ्या शहरातील लोकांचे जीवन आनंदी आणि सुखी बनेल एवढ्या सुविधा उपलब्ध करून देईल. शहरातील गरीब लोकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना घरे सरकारचा निधी वेळेवर पोहोचेल याकडे लक्ष घालेन.

शहरी भागातील जीवनामध्ये आणखी भर घालण्या करिता मी माझ्या शहरांमध्ये क्रीडा मैदाने आणि बाग-बगीचे यांची स्थापना करेल. मी स्नानगृह संग्रह स्थान, रंग भावन इत्यादी सार्वजनिक ठिकाणी आर्थिक सहाय्य करीन. तसेच माझ्या शहरांमध्ये ग्रंथालय, वाचनालय यांची स्थापना करीन. गुंड, असामाजिक घटकांपासून खेळायला वाचवण्याकरिता आम्ही सर्व प्रयत्न करेल शहरांमध्ये सूचक पोलीस गट योजना करेन.

लहान मुलांना शाळेमध्ये दूध आणि इतर पौष्टिक घटक विनामूल्य दिले जातील याकडे भर‌ घालीन.

खरंच मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर शहर आणि शहरी जीवनाचा नकाशाच बदलून टाकील. आणि ही माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

तर मित्रांनो ! ” मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर मराठी निबंध । Mi Nagarapalikecha Adhyaksha Zalo Tar Marathi Nibandh “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर मराठी निबंध । Mi Nagarapalikecha Adhyaksha Zalo Tar Marathi Nibandh “ यामध्ये आमच्या कडून काही पॉईंट्स राहिले असते तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment