मी मुख्याध्यापक झालो तर निबंध मराठी | Mi Mukhyadhyapak Zalo Tar Nibandh Marathi

मी मुख्याध्यापक झालो तर निबंध मराठी | Mi Mukhyadhyapak Zalo Tar Nibandh Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी मुख्याध्यापक झालो तर निबंध मराठी “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी मुख्याध्यापक झालो तर निबंध मराठी | Mi Mukhyadhyapak Zalo Tar Nibandh Marathi

विद्यार्थी व यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे मोठे होऊन काही ना काही बनायचे स्वप्न असते. कोणाला डॉक्टर व्हायला आवडते, कोणाला शिक्षक, तर कोणाला इंजिनियर त्याच प्रमाणे माझे देखील मोठे होऊन मुख्याध्यापक होण्याचे स्वप्न आहे.

कारण मला वाटते की शाळेचे यश किंवा अपयश शाळेवर अवलंबून नसून ते शाळेच्या मुख्याध्यापकावर अवलंबून असते.

त्यामुळे मला शिक्षक परीक्षा मुख्याध्यापक होणे फार आवडते. जर शाळेचा मुख्याध्यापक हा सक्षम असेल आणि तो आपली सर्व कर्तव्य उत्तमरित्या पार पाडत असेल तर शाळा नक्कीच यशस्वी बनते अन्यथा शाळेला अपयश मिळते. आपल्या समाजातील बहुतेक शाळा या मुख्याध्यापकांच्या कार्यामुळे यशस्वी झाल्याचे पहायला मिळते.

त्यामुळे ” मी मुख्याध्यापक झालो तर “ शाळेची सूत्र मी योग्यरीत्या सांभाळेन. कारण मुख्याध्यापकच असा व्यक्ती आहे की ज्याच्या हातात शाळेची संपूर्ण सूत्रे असतात. त्यामुळेच मुख्याध्यापक बनण्यासाठी जी तयारी आवश्यक असतील त्याची सुरुवात मी आजपासूनच केले आहे. पुढील शिक्षणात मी बीए,‌‌‌‌एम आणि m.ed करेन. कारण एवढ्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला मुख्याध्यापकांची पदे मिळू शकते.

मला माहिती आहे की शाळेचे मुख्याध्यापक होण्याची पद्धत खूप महत्त्वाचे असते. तरीसुद्धा मी मुख्याध्यापक होऊन माझे सर्व काम योग्यरीत्या पार पाडण्यास प्रयत्न करेन.

मुख्याध्यापक हा शाळेचा केंद्रबिंदू असतो आणि व त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी शाळेच्या केंद्रीभूत असतात‌. त्यामुळे मुख्याध्यापकाच्या रूपाने माझ्यावर अनेक जिम्मेदारी सोपवलेले असतील.

त्यामुळे मी मुख्याध्यापक झालो तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना शिस्त बुद्ध करण्यासाठी प्रयत्न करेन. कारण मला वाटते की, कोणताही विद्यार्थी किंवा व्यक्ती विशिष्ट शिव्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे मी माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध करण्यासाठी प्रयत्न करेन.

परंतु शिस्तीचे नियम हे फक्त शाळेतील विद्यार्थ्यांनाच लागू होत नसून शाळेतील सर्व शिक्षकांना व मलाही लागू होतात. त्यामुळे मी सर्वप्रथम स्वतःसह शाळेतील सर्व शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना प्रथमता शिस्तीचे पालन करण्याचा आदेश देईन. जर मी मुख्याध्यापक झालो तर माझे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक गुणांची रुजवणूक करणे.

कारण विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गुणांची पुर्ती घरातून आणि शाळेतूनच होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नैतिक मूल्य लक्षात घेऊन त्यांचे चरित्र व उत्तम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी हे प्रयत्नशील राहील.

आपल्या समाजामध्ये डोकावून पाहिले असता आपल्या आजूबाजूला भ्रष्टाचार, खोटे बोलणे, चोरी, लूटमार, धार्मिक दंगे प्रमाण वाढून समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य योग्यरीत्या आत्मसात होईल याचे शिक्षण देईन.

जर मी मुख्याध्यापक झालो तर माझे तिसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता याकडे विशेष लक्ष देणे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता समाजातील व्यापाराचे ज्ञानसुद्धा देईन. कारण आज आपल्या देशामध्ये बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे.

म्हणून मला वाटते की माझ्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यात जाऊन बेरोजगार तरुणांमध्ये सामील न होता स्वतःच्या पायावर उभा झाला पाहिजे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना इतरांनी आना देण्यासाठीही प्रयत्न करेन.

तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाकडे हे पूर्णता लक्ष देईन. विद्यार्थ्यांच्या व्यायाम आणि खेळाकडे विशेष लक्ष देईन. आठवड्यातून एक वेळा व्यायामाचे तास घेऊन आठवड्यातून तीन ते चार तास विद्यार्थ्यांच्या नवीननवीन खेळ घेइन.

कारण मला वाटते की, खेळामुळे आणि व्यायामामुळे पिक्चर त्यांचे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या विकास होतो. तसेच विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासासोबत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करेल.

त्यासाठी मी शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केरेन. विद्यार्थ्यांचे मन प्रसन्न व्हावे यासाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे ही सतत आयोजन करत राहील.

आजचे आधुनिक युग हे संगणकाचे युग आहे. आजकाल दिवसेंदिवस संगणकाचा वापर हा वाढत चालला आहे. त्यामुळे मी मुख्याध्यापक झाल्यानंतर माझ्या शाळांमध्ये संगणकावर प्रशिक्षण दिले जाईल याकडे विशेष भर देईल. फक्त माध्यमिक येतलास संगणकाचे प्रशिक्षण न देता प्राथमिक इयत्ते पासून संगणकाचे प्रशिक्षण कसे देता येईल याकडे लक्ष देईन.

जर मी मुख्याध्यापक झालो तर शाळेच्या प्रगतीकडे लक्ष देण्याकरिता  स्वतःला समर्पित करेन. आपल्या समाजामध्ये खूप गरीब विद्यार्थी आहे त्यांना पैसे भरून शिक्षण घेता येत नाही. त्यांच्यासाठी मी विनाअनुदानित शाळेची सुरुवात करेन. विद्यार्थ्यांच्या शाळेकडे कसे आकर्षित होतील यासाठी सर्व प्रयत्न मी करेन.

मुलांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी मी शाळेचे बांधकाम उत्तम रित्या आकर्षित बनवेल. शाळेमध्ये विविध नकाशे, चार्ट, ऑडिओ-व्हिडिओ  आणि एक सुसज्ज ग्रंथालयाची उभारणी करेल.

अशा पद्धतीने मुख्याध्यापकाच्या रूपात मी पूर्ण निष्ठेने माझे कार्य पार करेन. यामध्ये मी अशी शिक्षण प्रणाली निर्माण करणे जेणेकरून सर्व विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता आतूर राहतील. मी माझ्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वां  नैतिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती आणि देशभक्ती विषयी आदर निर्माण करीन.

तर मित्रांनो! ” मी मुख्याध्यापक झालो तर निबंध मराठी “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” मी मुख्याध्यापक झालो तर निबंध मराठी “ आमच्याकडून काही पॉइंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

 

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment