माझी मातृभाषा मराठी निबंध | Mazi Matrubhasha Marathi Nibandh
मित्रांनो ! आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या भारत देशामध्ये विविध जातीच्या आणि धर्माच्या लोक राहतात. आपल्या भारत देशामध्ये एकूण 29 राज्य आहेत व प्रत्येक राज्याचे स्वतःची विशिष्ट अशी भाषा पाहायला मिळतात. बोलण्यासाठी एकमेकांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी संवाद साधण्यासाठी भाषा ही महत्त्वाची भूमिका बजावत असते भाषा नसते तर आपण सर्वजण अबोल राहिलो असतो.
त्यामुळे आपल्या जीवनामध्ये भाषेला खूप महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी मातृभाषा असते आणि तो व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये आपल्या मातृभाषेचा वापर करीत असतो. या लेखामध्ये आम्ही ” माझी मातृभाषा मराठी निबंध | Mazi Matrubhasha nibandh in Marathi “ घेऊन आलोत.
माझी मातृभाषा मराठी निबंध | Mazi Matrubhasha Marathi Nibandh
मी भारत देशातील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे त्यामुळे आमची मातृभाषा आहे मराठी आहे. मराठी भाषण माझे सर्वात आवडते चे आणि प्रिय भाषा आहे ग मला माझा मराठी भाषेवर खूप अभिमान आहे.
मी माझा दैनंदिन जीवनामध्ये माझ्या मातृभाषेचा वापर करतो. अमृताहुनी गोड माझी मराठी भाषा असा उल्लेख अनेक अंगाने केलेला पाहायला मिळतो. मराठी भाषेमध्ये अनेक साहित्य उपलब्ध झाले आहेत पूर्वीपेक्षा आजच्या काळामध्ये माझ्या मातृभाषेला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर, आजच्या काळामध्ये माझी मराठी मातृभाषा ही महाराष्ट्र राज्याच्या बाहेर देखील बोलली जात आहे.
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आईप्रमाणे जवळची वाटणारी आमची ही मराठी मातृभाषा आम्हाला खूपच प्रिय आहे. आज असंख्य साहित्य मराठी भाषेमध्ये उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते. सुरवातीच्या काळामध्ये संतांनी लिहिलेले ग्रंथ, अभंग, पुस्तकेत्, कथा कादंबऱ्या ह्या या सर्वांमुळे मराठी भाषेमध्ये अधिकच आमूलाग्र असा बदल घडेल चालला आहे.
मराठी भाषेचे आद्य कवी मानले जाणारे शंकराचार्य यांनी आपल्या विवेकसिंधु या पुस्तकांमध्ये मराठी भाषेचा गौरव करताना सांगितले आहे की, आपल्या मराठी म्हणजेच मातृभाषेमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी इतके साहित्य उपलब्ध झाले आहे की, आपल्याला इतर कुठलेही भाषेची गरज भासणार नाही.
तसेच मराठी भाषेचे कौतुक करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात की,
” माझ्या मराठीची बोलू कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके |
ऐसी अक्षरे रसिका मेळविन ||”
त्यामुळे मला माझी मातृभाषा अधिकच प्रिय आहे. काही जणांच्या मते मराठी भाषा ही खूप कठीण भाषा आहेत परंतु महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा ही खूपच जवळची वाटते. फार पूर्वीच्या काळापेक्षा मराठी भाषेची आवड आजच्या काळात मध्ये अधिकच वाढत चालली आहे.
त्यामुळे मुलांना लहान वयापासूनच मराठी भाषेचे शिक्षण दिले जात आहे. मुलांना मराठी भाषेचे घरातून शिक्षण दिले जातेच त्यासोबत आज शाळेत देखील मराठी हा विषय कंपल्सरी दिला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा येणे हे शक्य झाले आहे.
महाराष्ट्राची शान म्हणजे मराठी भाषा आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस “मराठी भाषा दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचे वर्णन करत असताना कवी कुसुमाग्रज म्हणतात की,
” लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी |
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||”
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले व त्यानंतर पेशवे यांनी मराठी भाषेची झेंडे संपूर्ण राज्यभरात रोवले. तेव्हाच खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला.
आज मराठी भाषा ही इंग्रजी भाषेपेक्षा कुठल्याही दर्शाने मागे राहिली नाही जिथे जिथे इंग्रजी भाषेचा वापर होतो त्या ठिकाणी मराठी भाषा देखील वापरली जाते आज मुलांना शाळेमध्ये मराठी हा विषय घेऊन मराठी भाषेचे ज्ञान दिले जाते तर महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी चित्रपट सृष्टितून लोकांचे मनोरंजन केले जाते. मुलांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचे काम हे मातृभाषा करत असते.
एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हे त्याच्या भाषेवरून ठरविले जात असते एखाद्या व्यक्ती हा व्यवस्थित बोलत असेल किंवा चांगलं संवाद करत असेल तर त्याला अधिक समजूतदार समजले जाते. त्यामुळे व्यक्तीला योग्य दर्जा देण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची भूमिका बजावत असते.
आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास करायचा असेल तर आपण आपल्या मातृभाषेचा विकास करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मातृभाषेचा प्रसार केला तरच महाराष्ट्राची प्रगती आणि जय जय कार होईल.
अशी ही माझी मातृभाषा म्हणजेच मराठी भाषा आहे मला खूपच प्रिय आहे व मला माझ्या मातृभाषेवर अभिमान आहे.
तर मित्रांनो ! ” माझी मातृभाषा मराठी निबंध | Mazi Matrubhasha Marathi Nibandh “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
ये देखील अवश्य वाचा :-
- उत्तम मराठी माहिती साठी येथे भेट द्या.
- संगणक शाप की वरदान मराठी निबंध
- सर्वोत्तम मोटारसायकल अपघात वकील
- नऊ ग्रहांची मराठी माहिती
- डीआरडीओ म्हणजे काय ? डीआरडीओ मराठी माहिती
- ड्रॉप शिपिंग म्हणजे काय?
धन्यवाद मित्रांनो !
Nice article, keep up the good work