माझी आई या विषयावर निबंध । My Mother Essay in Marathi
आयुष्यातील प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वळणामध्ये समस्यांमध्ये एक व्यक्ती नेहमी सोबत असते ती म्हणजे आई. निस्वार्थ पणाने आपल्या मुलांचे संगोपन करण्याच्या मागे लागलेले असत.
आपले मुलं चांगले रहावे त्यांचे चांगले व्यक्तिमत्व घडावे म्हणून ती धडपड करीत असते. स्वतः उपाशी राहून मुलांना पोट भरण्यासाठी छटत असती.
आईच्या आयुष्य म्हणजे तिच्या मुलांसाठीच असते असे समजून संपूर्ण आयुष्य पणाला लावून पण आपल्या मुलांचे आयुष्यात चांगले घडावे या विचाराने आई जीवन जगत असते.
प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे ते म्हणजेच आईलाच. ” आई” हा शब्द जरी सोपा आणि दोन अक्षरांचा असला तरी त्या मागे लपलेले तिचे प्रेम, माया, करुणा हे शब्दात न सांगता येईल एवढे मोठे आहे.
माझी आई या विषयावर निबंध । My Mother Essay in Marathi
आई म्हणजेच देवाचं साक्षात रूपच आहे. असं म्हटलं जातं की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्या देवाने आईला बनिवले आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आईला पाठविले.
आईच्या प्रेमाला सागराची उपमा सुद्धा देतात कारण सागर हा खूप मोठा आहे त्याला कुठेही अंत नाही त्याच प्रमाणे आईच्या प्रेमाला ही कुठेही अंत नाही ते अनंत आहे आणि हा प्रेम कधीही न संपणारे आहे.
तरी आज आपण याच महान व्यक्ती बद्दल निबंध बघणार आहोत म्हणजे ” माझी आई” माझ्या आईचे नाव निर्मल जसे नाव आहे तसेच माझी आई सुद्धा आहे. स्वभावाने अतिशय प्रेमळ आहे. माझ्या कुटुंबासोबत माझी आई आणि सर्वजण एका खेडेगावात राहतो.
तिथेच माझ्या वडिलांची थोडी शेत आहे आणि आमच्या स्वतःच्या शेतीमध्ये आई- वडील काम करून आम्हाला सांभाळतात. मी लहान असल्यापासून माझी आई काम करते ते मी बघत आलो.
लहानपणा पासून आमची गरीब परिस्थिती असल्याने गरज पडल्यास आई घरी किंवा शेतीमध्ये जाऊन काम करते. आई चे बालपण ही गरीबीमध्ये गेलेले आहे म्हणून लहानपणापासून आईला गरीब परिस्थितीची जाण आहे आणि याच कारणामुळे आई लहानपणी शाळेला जाऊ शकली नाही
म्हणून ती निरक्षर आहे ती स्वतः अशिक्षित आहे तसे आम्ही राहू नये म्हणून तिने मला शाळेला पाठवले माझा सगळा खर्च तिने पुरविला माझ्या गरजा पूर्ण केल्या, मला चांगले शिक्षण देऊन साक्षर करण्यामागे माझ्या आईचे खूप कष्ट होते.
ती नेहमी म्हणत की, ‘ काम केल्याने कोणी मरत नाही !’, तिझ्या या बोलण्यामुळे मला सुद्धा कामाची सवय लागली. सुट्टीच्या दिवशी मी सुद्धा आई सोबत कामाला जाऊन तिला मदत करत असतो.
तिझ्या कामाची सुरुवात ही भल्या पहाटेपासून होते. तीन लवकर उठून अंघोळ करून देवाला नमस्कार करते व घरातील कामाला सुरुवात करून आमच्यासाठी जेवण बनवते व आम्हाला जेवायला सुद्धा वाढते.
घरातल्या सर्व सदस्यांची काळजी कधी घ्यायला ती कधी सुद्धा कंटाळा करत नाही. स्वतः कष्ट करून ती खूप काटकसरीने घर चालवते. मात्र मला आणि माझ्या बहिणीच्या कुठल्याही गरजा पूर्ण करताना ती विचार करत नाही.
आम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी वही, पेन, पुस्तके, कपडे आणि चप्पल तसेच गणवेश इत्यादी घेताना कधीच पैशाचा विचार करत नाही ते सर्व वस्तू आम्हाला वेळेवर पोहचवते.
ती आम्हां मुलांचा जसा सांभाळ करते तसेच ती दारावर आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना स्वागत करते. त्यांना पाणी, जेवण विचारते. आई म्हणत असते कि ‘ अतिथी देवो भव! ‘ घराच्या दारावर येणारा प्रत्येक व्यक्ती हा देवासमान समजून त्यांची चांगली विचारपूस करतो व घरात कोण पाहुणा आला असल्यास सुद्धा आई त्यांची काळजी घेते.
माझी आई जरी शिकलेली नसली तरी तिला चांगल्या- वाईट गोष्टींची बारकाईने पारख आहे. ती नेहमी आम्हाला सत्याच्या मार्गावर चालण्याचा सल्ला देत असते.
मला कुठल्याही गोष्टीची अडचण आल्यास मी आईला सांगत असतो व आईने दाखविलेल्या मार्गावर चालत असतो. ती सारख आम्हाला चांगल्या- वाईट गोष्टीचे ज्ञान देत असते आणि समाजामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व कसं घडवावं याचे धडे देत असते.
ती रोजच्या रोज समोर बसवून माझी विचारपूस करते आणि मी सुद्धा दिवसभरामध्ये केलेल्या सर्व गोष्टी आईला सांगतो त्यामध्ये मी कुठे चुकलो किंवा चुकीच्या रस्त्यावर जाताना दिसत असेल तर ती तिथेच मला रागवते गरज पडल्यास ती मला मारत सुद्धा असते.
म्हणून माझी आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. ती माझ्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. ती घरात नसेल तर मला करमत सुद्धां आहे. ती कामावरन आलेल्या बरोबरच मी तिला जोरात मिठी मारतो.
कधी- कधी आई खूप थकून आल्यास मी तिझे पाय दाबतो ती जशी माझी काळजी घेते त्याप्रमाणेच मी आणि माझी बहीण मिळून आईची काळजी घेतो.
ती माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर खूप प्रेम करते आणि ती मला लाडात सोनू म्हणून हाक मारते. आईची ती प्रेमळ हाक मला खूप आवडतो व ती पुन्हा- पुन्हा ऐकावीशी वाटते.
माझी आई ही माझ्यासाठी साक्षात परमेश्वरच आहे. मी तिला देवापेक्षा मोठे स्थान माझ्या जीवनामध्ये दिले आहे. माझी आई माझ्यासाठी अशी व्यक्ती आहे जिची तुलना, वर्णन मी कोणासोबत करू शकत नाही आणि तिचे वर्णन करण्यासाठी मला माझे शब्द देखील सुद्धा आपुरे पडतील ती या विश्वातील सर्वात चांगली व्यक्ती आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गुरुजी आणि शिक्षकाची आवश्यकता असते माझी आई माझ्यासाठी माझा पहिला गुरु आहे. तिने मला या सुंदर जगामध्ये आणले माझे बोट धरून मला चालायला शिकविले.
मला लागले तर ती सुद्धा माझ्यासोबत रडत असे. तिने खूप कष्ट घेतले आहे माझ्यासाठी माझ्या शिक्षणासाठी मी तिझ्या त्या कष्टाची जाणीव आयुष्यभर ठेवेन. माझे एक स्वप्न आहे की खूप शिकायचे चांगले करिअर करायचे आईने केलेल्या कष्टाचे फळ करायचे तिचे आयुष्य कामांमध्ये गेले आहे.
तिला पुढील आयुष्य तर मी नीट सुखाने ठेवीन आणि तिचे स्वप्न पूर्ण करीन आत्ता ती माझा आधार स्तंभ झाली तर पुढील आयुष्यामध्ये मी आईचा आभार स्तंभ होईल
असे म्हणतात की, ” स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी” याचाच अर्थ असा की, पैसा, धन, दौलत कितीही असो भले हि त्या व्यक्ती कडे संपूर्ण जगावर राज्य करणारा असो जर त्या व्यक्तीजवळ आई नसेल तर तो व्यक्ती तेवढ श्रीमंत असून सुद्धा काही अर्थ नाही म्हणजेच ज्या माणसाजवळ आई आहे, आईची माया आहे आणि प्रेम आहे तो माणूस या जगातला सर्वात मोठा श्रीमंत माणूस आहे.
पण आजच्या या जगामध्ये आईचे प्रेम, आईचे महत्व कमी होत चालले आहे. कारण आई- वडील मुलांना शिकवतात लहानपणाचे मोठे करतात. चांगले संस्कार देतात पण मुले मोठी होऊन नोकरीसाठी आई- वडिलांन पासून दूर जातात व आई- वडिलांच्या मायेपासून दुरावतात नोकरीसाठी शहरांमध्ये स्थित होतात.
गावाकडे गरीब असलेल्या आपल्या आई- वडिलांच्या मायेपासून वंचित राहतात व शेवटी त्यांना वृद्ध आश्रमांचा सहारा घ्यायला लागतो. जे आई- वडील त्यांच्या मुलांना जीव तोडून सांभाळतात आणि मुले मोठी झाली त्यांना नोकरी लागल्यावर स्वतःच्या पायावर उभा राहिल्यावर आपल्याच आई-वडिलांनाआश्रमाचा रस्ता दाखवतात.
तर मी तसं न करता माझ्या आई- वडिलांची मरेपर्यंत सेवा करेन. त्यांनी मला हे सुंदर जग दाखवून चांगले संस्कार माझ्यापर्यंत पोहोचले तर मी त्यांच्या या कर्तव्याची जाण ठेवील.
आईने माझ्यासाठी आतोनात केलेले कष्ट माझ्या डोळ्यासमोर आल्यास डोळ्यातून अश्रू बाहेर येतात. म्हणून मी माझ्या आईला सगळे सुख देईन तुझे स्वप्न होते की मी मोठा होऊन चांगली नोकरी करावी तिझे ते स्वप्न लक्षात ठेवून मी खूप परिश्रम नी अभ्यास करून चांगली नोकरी मिळवले व एक ना एक दिवस माझ्या आईचे नाव उंच करेल.
मी माझ्या आईचे जेवढे कौतुक करेन तेवढे कमीच आहे कारण तिझे प्रेम कर्तव्य आणि कष्ट शब्दांमध्ये न मांडता येणारी गोष्ट आहे. तर मी एवढेच म्हणेन की, माझ्या आईने मला जेवढे प्रेम दिले मी त्यापेक्षा जास्त देईन आणि तिला सदैव आनंदी ठेवेन कारण मी माझ्या आईवर खूप खूप प्रेम करतो. आणि हीच आहे मला पिढ्या न् पिढ्या मिळावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना !