माझा आवडता ऋतू पावसाळा । Maza Avadata Rutu Pavsala Nibandh in Marathi

माझा आवडता ऋतू पावसाळा । Maza Avadata Rutu Pavsala Nibandh in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईट वर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” माझा आवडता ऋतू पावसाळा । Maza Avadta Rutu Pavasala Nibandh in Marathi “ यावर निबंध घेऊन आलोत.

या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता ऋतू पावसाळा । Maza Avadata Rutu Pavsala Nibandh in Marathi

आपल्या देशात मुख्यतः तीन ऋतू आहेत ते म्हणजे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा. या तिने ऋतूमध्ये उन्हाळा हा ऋतू अतिशय कडक उन्हाचा, हिवाळा ऋतु कडक थंडीचा तर पावसाळा हा ऋतू मुसळधार पावसाचा असतो.

हे हिवाळा, पावसाळा, आणि उन्हाळा ऋतू साधारणता चार चार महिन्याच्या असतात. यातील ” माझा आवडता ऋतू पावसाळा “ आहे.

पावसाळा ऋतू सुरू होण्याअगोदर कडक उन्हाळ्याचे साम्राज्य असते. या कडक उन्हाचा त्रासाने सर्व सजीव कंटाळलेले असतात. या परिस्थितीत सर्व पशु-पक्षी आतुरतेने वाट पाहतात तो म्हणजे पावसाळा ऋतु ची, कधी एकदाचा पावसाळा ऋतू सुरू होतो आणि आमच्या सर्वांच्या मनाला शांत करून गारवा पसरतो, याची वाट मी पाहत असतो.

अखेर उन्हाळ्याचे कडकाचे दिवस संपवून , अचानक ढग जमा होतात.जोराचा वारा सुटतो,पक्षी मधुर गीत गातात, सर्वत्र धूळ उडते आणि पावसाची रिमझिम धारा सुरु होतात.

साधारणतः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाळ्यात पाऊस सुरू होतो. पावसाळ्यातील पहिला पाऊस हा सर्वांना शांत करत मातीचा सुगंध सर्वत्र पसरवतो. मातीचा तो वास नाकाला आल्यास अतिशय तृप्त वाटते.

रिमझिम पावसाची सुरुवात संपूर्ण वातावरणाला बदलत येते.या पावसात भिजण्याची मजा काही वेगळीच आहे. त्यामुळे मी माझ्या सर्व मित्रांसोबत या पावसात भिजण्याची मजा लुटतो, नाचतो आणि सोबत मातीचा सुगंध अनुभवतो. तसेच आमच्या इथे कल्पना आहे की पहिल्या पावसाचे पाणी पिल्याने ताप कमी होतो,त्यामुळे मी एका बाटलीत पावसाचे पाणी भरून ठेवतो .

पावसामुळे सर्व वातावरण आनंदमयी होते ,झाडे हिरवीगार होतात .पावसाळा ऋतु च्या आगमनानंतर थोड्या दिवसातच संपूर्ण पृथ्वीला जणू हिरवीगार शाल पांघरली असे वाटते.

वातावरणात हवेचा गारवा जाणवू लागतो. मुसळधार पावसाने नद्या, नाले जोराने वाहू लागतात. तलाव, धरणे पुन्हा भरले जातात .खास करून पावसाळ्यात ऋतूच्या आगमनाने शेतकऱ्यांना खूप आनंद होतो. कारण शेतकऱ्यांची शेती पूर्णत पावसावरच अवलंबून असते त्यामुळे पावसाळयात शेतकरी खूश होतात व शेतीच्या कामाला सुरुवात करतात.

पावसाळ्याने एक उसळता उत्साह आणि चैतन्य साऱ्या माणसांमध्ये भरून जाते तसेच पक्षी, प्राणी सुद्धा पावसाळ्याचा आनंद घेतात . कोकिळा , मोर हे पक्षी पावसाळ्याचा आनंद घेत असतात आणि त्यांच्या आवाजाने सर्व वातावरण प्रसन्न करतात.

आमच्या गावा बाहेर असलेले डोंगर पाचूचे वैभव मिरवीत असतात. या डोंगरावर हिरवेगार गवत आणि रंगीबेरंगी लहान लहान फुले येतात, त्यामुळे हे डोंगर बघण्यासारखे दिसतात. त्यासोबतच या डोंगरातून वाहणारे धबधबे अतिशय सुंदर दिसतात त्याला बघून वाटते जणू या डोंगरांनी मोत्याच्या माळांनी शृंगार केलेला आहे.

आम्हा शाळकरी मुलांनाही या पावसात जायला फार आवडते .शाळेची नवीन सुरुवात हि याच वेळी झालेली असते. त्यामुळे आई-बाबा नवीन रेनकोट, गमबूट, छत्री घेऊन देतात. त्यामुळे शाळेत जाताना आमची मज्जाच मज्जा असते.

शाळेतून येताना पावसात भिजणं, वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणे ही मज्जा अवर्णनीय आहे. तसेच रिमझिम पाऊस होऊन गेल्याने आभाळात दिसणारा सप्तरंगी इंद्रधनुष्य मनाला मोहीवतो. ” पावसाच्या धारा अंगावर झेलीत पावसाच्या हातात हात घालून मुक्तपणे भिजणे म्हणजे खरा पाऊस अनुभणे”, असे मला वाटते.

कधी कधी आहे पावसा सोबत गाराही पडतात, गारा म्हणजे बर्फाचे छोटे छोटे गोळे , मला या गारा खूप आवडतात, गाराचा पाऊस पडला की ,मी अंगणा मध्ये जाऊन सर्व गारा गोळा करून खात असतो. मला गारा खायला खूप आवडतात. हे सुद्धा एक कारण आहे, ज्यामुळे पावाला पावसाळा ऋतु खूप आवडतो.

तसेच, माझा आवडता ऋतू पावसाळा जरी असला, तरी पाऊस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणी हे आपल्याला पावसा पासूनच मिळते. जर पाऊस पडला नाही तर आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळणार नाही, त्यामुळे पावसाळा हा ऋतू सर्व सजीवांसाठी खूप महत्त्वाचा ऋतू आहे.

पाऊस हा माणसाची वर घडलेली उमेद पुन्हा जिवंत करून देतो, सृष्टी तर नवे चैतन्य उभारते, पिके नव्याने डोलू लागतात. अशाप्रकारे पावसाळा हा एक जीवनदायी ऋतू आहे.

पावसाळा हा एक सुखदायी असला तरी त्याचे बरेच चांगले आणि वाईट परिणाम आहेत. वाईट परिणाम म्हणजे, अतिशय मुसळधार पावसाने धरणे तुंब भरून फुटणे, महापूर येणे, अर्थात पावसामुळे ओला दुष्काळ पडतो ,सर्वत्र पाणीच पाणी होते, सोबत जीवित हानी होते आणि आर्थिक हानी सुद्धा होते.

पण पावसामुळे जे काही दुष्परिणाम होते त्यामागे माणूसच जबाबदार आहे. कारण अलीकडे प्रदूषण खूप वाढले आहे आणि त्याचाच परिणाम ऋतुचक्र बदलत चालले आहे. त्यामुळे कधी पाऊस पडतच नाही तर कधी पडतो तर खूप मुसळधार पडतो, आणि सोबतच रुद्ररूप धरण करून बरेच नुकसान ही करून जातो.

पण मला वाटते ,याला पाऊस जरासुद्धा जबाबदार नाही, याला जबाबदार आपण सर्व माणूष्य आहोत. जरी पावसामुळे काही नुकसान होत असले तरी ,पाऊस आपल्या सर्वांसाठी खूप आवश्यक आहे. पावसाच्या नुकसाना पेक्षा त्याचे फायदे जास्त आहेत. त्यामुळे मला पावसाळा ऋतु खूप खूप आवडतो.

तर मित्रांनो ! तुम्हाला ” माझा आवडता ऋतू पावसाळा । Maza Avadata Rutu Pavsala Nibandh in Marathi “ वाचून आवडला असेल तर ,तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” माझा आवडता ऋतू पावसाळा Maza Avadta Rutu Pavadala Nibandh in Marathi “ या मध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

4 thoughts on “माझा आवडता ऋतू पावसाळा । Maza Avadata Rutu Pavsala Nibandh in Marathi”

Leave a Comment