मायणी अभयारण्य माहिती । Mayani Bird Sanctuary Information In Marathi

मायणी अभयारण्य माहिती । Mayani Bird Sanctuary Information In Marathi

मायणी हे अभयारण्य भारतातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्यांपैकी एक आहे.

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेले हे एक प्रसिद्ध अभयारण्य आहे.

आज आपण याच ” मायणी अभयारण्य माहिती । Mayani Bird Sanctuary Information In Marathi “ सविस्तर मध्ये बघणार आहोत.

मायणी अभयारण्य माहिती । Mayani Bird Sanctuary Information In Marathi

चला तर मग बघुया काय आहे मायणी अभयारण्य माहिती ( Mayani Bird Sanctuary Information In Marathi ).

मायणी अभयारण्य हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्या पासून 65 किलो मीटरच्या अंतरावरील खाटक या तालुक्यातील मायणी या गावात वसलेले आहे.

मायणी हे अभयारण्य निसर्ग प्रेमींनसाठी आकर्षणाचे एक प्रमुख केंद्र आहे. मोठ्या प्रमाणात पक्षी या अभयारण्यात आढळतात. निसर्गाच्या अनुकूल परिस्थितीमुळे मायणी पक्षी अभयारण्याचा जन्म झाला असावा असे म्हणतात. मायणी गावाजवळ कानकाया नावाच्या एक प्रचंड नाल्या वर बांध घालण्यात आला. आणि यातून इथे एक तलावाचा जन्म झाला होता.

मायणी पक्षी अभयारण्याच्या स्थापनेच्या अगोदर मायणी येथील पाणथळ परिसराचा उगम झाला. व आजूबाजूला असणारे डोंगर आणि जवळ असलेला तलाव यांमुळे या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी स्थलांतर करून येऊ लागले.

त्यामुळे दिवसें दिवस या ठिकाणाच्या पक्ष्यांची संख्या वाढू लागली व परिणामी या पक्ष्यांच्या संरक्षणाचा गरज भासू लागली. म्हणून 11 मार्च 1987 रोजी महाराष्ट्र शासनाने मायणी पक्षी अभयारण्याची स्थापना करण्यात आली.

मायणी अभयारण्याचा परिसर हा सुमारे 1,080 एकर एवढा आहे. या ठिकाणाचा निसर्ग आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि पक्षी मित्र येतात. पक्षी हे माणसाचे आणि शेतकऱ्याचे मित्र आहेत.

पक्षी हे शेतातील पिकांचे संरक्षण करण्यात मदत करतात. त्यामुळे निसर्गाचा समतोल राहतो. मायणी या ठिकाणी फ्रेंड्स ऑफ नेचर नावाची एक संस्था आहे. इ.स. 1983 पासून ही संस्था पक्ष्यांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे.

मायणी अभयारण्यात असणाऱ्या विविध पक्ष्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम ही संस्था करते.

  • मायणी अभयारण्यातील निसर्ग, प्राणी, पक्षी :

मायणी अभयारण्य निसर्गाने नटलेले अभयारण्य आहे. विशेषता येथे आढळणाऱ्या नव- नवीन प्रजातींच्या पक्ष्यांच्या संख्ये मुळे या अभयारण्याची स्थापना करण्यात आली.

स्थलांतरित पक्ष्यांमध्ये रोहित पक्ष्यांचे थवे येथे आढळतात त्या शिवाय नाथ सागराच्या परिसरात बदक, हळद- कुंकू हे पक्षी आढळतात. शिकारी पक्ष्यांच्या प्रजाती मध्ये कापशी घार, गरुड, ससाण असे पक्षी सुद्धा आहे. खंड्या, कवड्या, राखी बगळा, वंचक हे पण पक्षी या अभयारण्यात आढळतात.

मायणी अभयारण्यात 85 प्रकारांचे सुमारे 20 ते 25 हजार पक्षी असल्याचे नोंद आहे. तसेच युरोप, तिबेट, साइबेरिया, लदाख आणि हिमालया या ठिकाणाहून काही पक्षी स्थलांतर करून मायणी पक्षी अभयारण्यात आपली हजेरी लावतात.

मायणी पक्षी अभयारण्यात विविध प्रकारची झाडे, झुडपे, वन्य प्राणी, जलचर प्राणी, सरपटणारे प्राणी या ठिकाणी आढळतात.

  • हनुमान वानर :

मायणी अभयारण्यामध्ये आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये हनुमान वानर या प्राण्याचा समावेश होतो. हनुमान वानर अथवा काळ्या तोंडाचे वानर महाराष्ट्रात जवळ जवळ सर्वच ठिकाणी आढळते. ही वानरे नेहमी कळपाने फिरताना दिसतात. 15 ते 20 वानरांचा एक कळप असतो.

स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ही वानरे झाडाच्या टोकावर मोठ्या फांदीवर जाऊन बसतात. वानर सकाळी अन्नाच्या शोधासाठी बाहेर पडतात. आणि दुपारच्या वेळेस ही वानरे सावलीच्या ठिकाणी विश्रांती करतात.

बिबट्या वाघाला वानराचे मांस खायला खूप आवडते. वानर जमिनीवर बसले असता त्यांची उंची साधारणा 60 ते 75 से.मी. भरते. या वानराची शेपूट खूप लांब असते. शेवटी ची उंची साधारणा 90 ते 105 सें. मी. असते.

वानर हे प्राणी पूर्णता शाकाहारी आहेत. रानटी फळे, झाडांचे पान, फळे, फुले इत्यादी गोष्टी खाद्य म्हणून खातात. वानरांचा गर्भधारणेचा काळ हा साधारणता 9 महिन्यांचा असतो.

  • मायणी अभयारण्यातील पर्यटन :

मायणी हे अभयारण्य विशेषता पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असल्याने विविध पक्षी प्रेमी या ठिकाणी पर्यटनासाठी येतात. निसर्गाचे आकर्षित रुप या अभयारण्यात बघायला मिळते. मायणी या गावात ब्रिटिश कालीन तलाव व पक्षी आश्रयस्थान असल्याने या ठिकाणाचा ऐतिहासिक निसर्ग संपदेचा परिसर पर्यटकांना आपल्याकडे खेचतो.

तसेच या ठिकाणी मोठा तलाव, बगीचा, पक्षी पाहण्यासाठी चार टॉवर, तलावात असणारे मारुती मंदिर, रोपवाटिका, अनेक प्रजातींचे पक्षी यामुळे सुंदर निसर्गाचे ठेवण या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.

  • मायनी अभयारण्यास कसे जावे :

मायणी हे अभयारण्य सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये मायणी या गावामध्ये वसलेले आहेत. या गावामधून मिरज- भिगवण आणि पंढरपूर- मल्हारपेठ हे दोन राज्य महामार्ग जातात.

या अभयारण्यास येण्यासाठी मायणी या गावापर्यंत महाराष्ट्र राज्याच्या बसेस ची सुविधा उपलब्ध आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

1 thought on “मायणी अभयारण्य माहिती । Mayani Bird Sanctuary Information In Marathi”

Leave a Comment