महागाईचा भस्मासूर मराठी निबंध । Mahagai Cha Bhasmasur Marathi Nibandh

महागाईचा भस्मासूर मराठी निबंध । Mahagai Cha Bhasmasur Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” महागाईचा भस्मासुर मराठी निबंध “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

महागाईचा भस्मासूर मराठी निबंध । Mahagai Cha Bhasmasur Marathi Nibandh

महागाईचा भस्मासुर मराठी निबंध :

दिवसेंदिवस विविध समस्या पाहायला मिळत आहेत. त्यातील एक दिवसेंदिवस वाढत चाललेली समस्या म्हणजे महागाई होऊन. महागाईचा भस्मासुर हा कमी न होता संपूर्ण जगभरामध्ये वाढत चालला‌आहे. आज महागाईने संपूर्ण जगाला आपल्या ताब्यात घेतले आहे.

महागाई आजच्या काळातील प्रमुख समस्यांपैकी एक समस्या बनली आहे. विकसित देशांच्या तुलनेत  भारतासारख्या विकसनशील  देशामध्ये महागाईने भयंकर रूप धारण केले आहे. देशामध्ये महागाई का वाढते? हे आपल्यातली बरेच जणांना माहितीच नाही.

महागाई वाढण्यामागचे कारण म्हणजे जेव्हा सरकारचा प्रशासनाचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा वाढतो. तेव्हा सरकार जास्त नोटा छापून हा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करते. परिणामी चलन वाढ किंवा  विविध वस्तूंच्याच्या किंमती वाढतात. त्यामुळे सर्वत्र महागाई पसरते.  थोडक्यात सांगायचे म्हणजे, जेव्हा मुद्रेचे अवमूल्यन वाढते तेव्हा बाजारपेठेतील महागाई वाढली जाते.

विकसित देशाच्या तुलनेत  विकासनशील देशांमध्ये महागाईचा दर हा वाढत जातो. असे म्हणतात की प्राचीन भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. परंतु इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षांहून अधिक काळ राज्य केले. या काळामध्ये इंग्रज आणि भारतातील सर्व मालमत्ता आपल्या देशामध्ये लुटून नेली. त्यामुळे भारत देश आणखीनच गरीबीच्या जाळ्यात अडकत गेला. यावर आणखी भर टाकली ती म्हणजे महागाईच्या भस्मासुराने.

आज महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा या महागाईच्या काळामध्ये लोकांना अन्न, वस्त्र,‌निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणेही शक्य राहिले नाही. दिवस-रात्र कष्ट केले तरी या गरजा पूर्ण होत नाहीत. आज लहानात लहान वस्तूच्या किमती हे गगनाला जाऊन पोचले आहेत.

असे हे महागाईचे संकट समाजातील गरीब आणि श्रीमंत लोकांना भोगावे लागत आहे.  साधे दूध पिता जा किमतीही गगनाला जाऊन भिडले आहेत.  साजूक तूप आणि तेल यासारख्या गोष्टी त्या गरीब लोकांना पहायला सुद्धा मिळत नाहीत. असे म्हणतात की, वस्त्र निर्यातीमध्ये भारत देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. परंतु भारतात राहणारा लोकांना अंग झाकण्यासाठी वस्त्र मिळत नाही. कारण चांगल्या कपड्याचे किमती सर्वसामान्यांना घेता येतील तेवढ्या राहिल्या नाहीत.

राहण्यासाठी घरे बांधणे आजच्या काळामध्ये शक्य राहिले नाही. शहरी भागामध्ये घराचे भाडे इतके वाढले की उत्पन्नाचा अर्धा खर्च घराचे भाडे भरण्या मध्येच जातो. त्यामुळे जाणता हे झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहे. सामान्य जनता पोटाला पट्टी बांधून फक्त पाणी पिऊन जगत आहे.

आज वाढले मागायचे चर्चा हा प्रत्येक जण करतो. कारण सर्वसामान्यांना अन्नपाणी खाणे सुद्धा महाग झाले आहे. दरवर्षी च्या निवडणुकीमध्ये प्रत्येकजण महागाईचा मुद्दा मानतोच.  सर्व राजकीय नेते त्या काळापुरतेच महागाई कमी होईल असे आश्वाने   देतात परंतु महागाई हे कमी न होता दिवसेंदिवस वाढतच जाते. महागाई वाढण्यामागे अनेक कारणे आहेत.

सर्व कारणांपैकी महत्त्वाचे कारण म्हणजे उत्पादन आणि मागणी असलेली प्रचंड तफावत होय. एखाद्या वस्तूचा कच्च्या मालापासून पक्का माल होईपर्यंत तुझ्या किमतीमध्ये अतोनात वाढ होत जाते परिणामी महागाई वाढते.

भारतात सामान्य उपयोगाच्या वस्तूंच्या उत्पादनावर कमी आणि चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर जास्त भर दिला जातो.कारण चैनीच्या वस्तू उत्पादकांना जास्त फायदा होतो. महागाईमुळे शेतीच्या स्थितीवर परिणाम सुध्दा होता आहे. भारतातील शेती मुख्यता पावसावर अवलंबून आहे. मग देशांमध्ये वेगवेगळे पाऊस पडला तर ठीक अन्यथा उत्पादनामध्ये घट होते व परिणामी महागाई वाढली जाते.

तसेच काळाबाजार सट्टेबाजी भ्रष्टाचार यांचा सुद्धा महागाई वाढीवर प्रत्यक्ष संबंध  येतो. अशामुळे बाजारातील धन्यादिश  वस्तू अदृश्यपणे गायब होतात. म्हणजेच काळाबाजार किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या व्यापारी ज्या वस्तूला बाजारपेठेमध्ये जास्त किमती आहे अशा वस्तूंची साठवणूक करतात.

बाजारामध्ये अशा वस्तूंची कमतरता भासू लागते तेव्हा या साठवलेल्या वस्तू अप्रत्यक्षरीत्या बाजारामध्ये आणल्या जातात व या वस्तूंच्या किमती मध्ये दुप्पट कडून विकल्या जातात. व्यापारांचा  स्वार्थीपणा आणि सरकारी कर्मचाऱ्यांची लाचखोरी यामुळे बाजारपेठांमध्ये महागाई वाढली जाते.

सरकार महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना करत असते परंतु आपल्या देशातील काही समाजा स्वतःच्या स्वार्थासाठी महागाईला वाढीव देतात.  तसेच लोकसंख्या वाढ हेदेखील महागाई वाडीमध्ये एक कारण ठरत आहे. लोकसंख्या वाढीमुळे सरकारच्या अंदाजपत्रकावर परिणाम होतो. त्यामुळे तुटीचे अंदाजपत्रक तयार होते परिणामी महागाई वाढत यासारख्या समस्या उद्भवतात.

महागाईचा भस्मासुर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे यामुळे सर्वसामान्य आणि गरीब जनतेला याचा सर्वात मोठा तोटा होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.

महागाई वाढल्याचा परिणाम मध्यम आणि कनिष्ठ वर्गावर तर होतच आहे. त्यामुळे जीवनाचा आनंद  अत्यल्प प्रमाणात घेतला जात आहे. आज प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवनाचा खरा अर्थ घेता येईल नाही.

महागाईमुळे समाजामध्ये भ्रष्टाचार वाढला आहे याचा परिणाम भांडण, दंगली त्याच्यातून दिसून येत आहे.

त्यामुळे देशातील  महागाई कमी  करण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलायला हवीत. महागाई भस्मासुर मध्ये सर्वसामान्य जनता मिळाली जात आहे याकडे सरकारने योग्य ते लक्ष देणे गरजेचे आहे.. महागाईचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेला होत आहे. त्यामुळे महागाई रूपी भस्मासुर राक्षसाला आपल्या समाजातून काढून टाकणे हे आपल्यासाठी गरजेचे आहे.

तर मित्रांनो ! महागाईचा भस्मासूर मराठी निबंध । Mahagai Cha Bhasmasur Marathi Nibandh वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” महागाईचा भस्मासुर मराठी निबंध “ यामध्ये आमच्या कडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment