माळढोक पक्षी अभयारण्य माहिती | Maldhok Pakshi Abhayaranya Information In Marathi

माळढोक पक्षी अभयारण्य माहिती | Maldhok Pakshi Abhayaranya Information In Marathi

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील नान्नज गावाच्या आसपासच्या परिसरात वसलेले माळढोक पक्षी हे अभयारण्य आढळते. माळढोक पक्षी अभयारण्य माहिती.

मुख्यतः माळढोक या पक्ष्यासाठी प्रसिद्ध असे हे अभयारण्य आहे ते म्हणजेच माळढोक पक्षी अभयारण्य माहिती होय.

आज आपण याच अभयारण्याची माहिती बघणार आहोत. चला तर मग बघुया काय आहे. ” माळढोक पक्षी अभयारण्य माहिती “.

माळढोक पक्षी अभयारण्य माहिती | Maldhok Pakshi Abhayaranya Information In Marathi

माळढोक पक्षी अभयारण्य हे सोलापूर जिल्ह्या जवळील नान्नज या गावाच्या परिसरात आढळते. द ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणजेच माळढोक पक्षी. आणि या पक्ष्याच्या नावावरूनच या अभयारण्याला माळढोक अभयारण्य असे नाव देण्यात आले असावे.

एका काळी माळढोक हा पक्षी नामशेष म्हणजेच नष्ट होण्याच्या मार्गावर होता. म्हणून 1971 मध्ये या माळढोक पक्षी अभयारण्याची स्थापना करण्यात आली. या अभयारण्याच्या सोलापुरात मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यांच्या वन क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे.

माळढोक पक्षी अभयारण्य माहिती ( Maldhok Pakshi Abhayaranya Mahiti In Marathi )

माळढोक हा पक्षी मुख्यतः माळ रानांत आढळतो. या अभयारण्याच्या स्थापनेनंतर माळढोक पक्ष्याची शिकार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

माळढोक पक्षी संरक्षण आणि संवर्धन यासाठी माळढोक पक्षी अभयारण्य प्रसिद्ध आहे. माळढोक अभयारण्यातील गवताळ माळरानावर आढळणारा एक गावठी राजहंस म्हणजेच हा माळढोक पक्षी.

माळढोक अभयारण्यातील वृक्ष :

अनेक वृक्षांनी आणि झाडा, झुडपांनी बनलेले हे माळढोक पक्षी अभयारण्य आहे. अनेक प्रकारची निसर्ग संपत्ती येथे बघायला मिळते. विविध प्रकारच्या झाडा, झुडपांनी हे अभयारण्य परिपूर्ण आहे.

बाभूळ, खैर, लिंब, शिरस, बोर, अंजन, चंदन, साग, आपटा, अशा प्रकारची मोठी झाडे या अभयारण्यात आढळतात.

माळढोक अभयारण्यातील प्राणीजीवन :

माळढोक हे अभयारण्य माळढोक या पक्ष्यासाठी प्रसिद्ध असेल तरी सुद्धा कोल्हा, लांडगा, तरस, साळींदर, मुंगूस, ससा, खोकड आणि पांढऱ्या टिपकाचे हरीण हे प्राणी आढळतात. माळढोक पक्ष्या प्रमाणेच पांढऱ्या टिपकाचे हरीण येथे मोठ्या संख्यांनी आढळते.

ठिपक्याची हरिण :

अंगावर पांढरे ठिपके असलेले हे हरिण दिसायला खूप आकर्षित वाटते. ठिपके असलेले हे हरीण सर्वांच्या परिचयाचे आहे. भारतात सर्वत्र हे हरीण दिसते. तसेच माळढोक पक्षी अभयारण्यात या हरणाचे अस्तित्व बघायला मिळते. या प्राण्याच्या पाठीवर तांबूस रंग असतो आणि अंगावर पांढरे ठिपके असतात.

ते हरणे सुद्धा 13- 15 हरणे मिळून कळपामध्ये राहतात. पांढऱ्या टिपक्याच्या हरणांचा गर्भधारणेचा काळ हा आठ महिन्यांचा असतो. व मादी एका वेळेस एकाच पिलाला जन्म देते.

माळढोक अभयारण्यातील पक्षी जीवन :

माळढोक अभयारण्यात माळढोक पक्ष्या व्यतिरिक्त तांबट, सुगरण, खंड्या, पारवा, बुलबुल, चंडोल, मैना, मोर, करकोचा, तितर, मुनिया हे पक्षी आढळतात व मुख्यतः माळढोक अभयारण्यात माळढोक पक्षी आढळतो.

माळढोक पक्षी :

माळढोक हा पक्षी उडणाऱ्या पक्ष्यातील सर्वांत जड पक्षी आहे. यातील नर पक्ष्याचे वजन 15 किलो तर मादीचे वजन 9 किलोपर्यंत भरते. माळढोक पक्ष्याला गवताळ माळरानात राहायला खूप आवडते. झाडे- झुडपांमध्ये हा पक्षी मुख्यतः पाहायला मिळतो.

पक्षिवर्गातील ग्रूईफॉर्मिस गणाच्या ओटिडिडी कुलात माळढोक या पक्ष्याचा समावेश होतो. माळढोक पक्ष्याचे शास्त्रीय नाव हे आड्रेओटिस नायग्रिसेप्स आहे. माळढोक पक्ष्याच्या नराची उंची ही सुमारे 1 मीटर तर मादी ही 76 से.मी. ची असते.

नर माळढोकाची मान पांढरी असून मानेच्या मागील शरीराचा भाग हा निमुळता असतो. पाठीचा रंग गडद तपकिरी असून त्यावर पांढऱ्या रंगाच्या रेघा व ठिपके असतात.

पोटाकडचा रंग पांढरा असतो. तर छातीवर आडवा काळा पट्टा असतो. मादी माळढोक पक्षीच्या छातीवर हा पट्टा अरुंद किंवा अर्धवट असतो. माळढोक हा पक्षी भित्रा आणि खूप सावध असतो. ते वेगाने धावू शकतात व उडू शकतात.

माळढोक पक्ष्याचे खाद्य हे कीटक, गोमा, पाली, सरडे, टोळ, भुंगे, याबरोबरच तो धान्य, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, ह्या गोष्टी अन्न म्हणून आपल्या आहारात खातो.

माळढोक पक्षी अभयारण्यास कसे जावे :

माळढोक पक्षी अभयारण्य पाहायला सोलापूर पासून पुढे 20 किलो मीटरच्या अंतरावर नान्नज हे ठिकाण आहे व येथून ” माळढोक ” या अभयारण्याची सुरुवात होते व या पक्ष्याचे दर्शन सुद्धा घडते.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !