जर मला पंख असते तर मराठी निबंध । Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

जर मला पंख असते तर मराठी निबंध । Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” जर मला पंख असते तर मराठी निबंध । Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

जर मला पंख असते तर मराठी निबंध । Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

मला पंख असते तर निबंध मराठी : अपेक्षा

पक्षी कोणाला आवडत नाही? या पृथ्वीवरील सर्व मनुष्याला पक्षी हे खूप आवडतात. पक्षी दिसायला असतातच खूप सुंदर! मुक्तपणे संचार करताना ते आणखीन सुंदर दिसतात.

आकाशामध्ये सुंदर पक्षांना संचार करताना माझ्या मनात कल्पना आली ” मला पंख असते तर..” खरंच! मला पंख असते तर किती मज्जा आली असती ना!

मीही पक्षांप्रमाणे मुक्तपणे आकाशात संचार केला असता. मला पंख असते तर मी हे पक्षांप्रमाणे आकाशाचा वाहत बनलो असतो. पृथ्वीच्या सर्व गुलामगिरीतून आणि बंधनातून मला मुक्तता मिळाली असती. तसेच शाळेतील अभ्यासाचे ओझे, ते घर कामांचे ओझे आणि बंधन या सर्वांपासून मला मुक्तता मिळाली असती.

मीही पक्षांप्रमाणे लांब आणि उंच उड्डाणे घेतली असते. एक मनुष्य म्हणून मला संपूर्ण जग फिरता आले नसते पण पक्षी बनवणे मला पाहिजे त्या ठिकाणी फिरायला गेलो असतो. जगातील सात आश्चर्य सुद्धा मी पाहिले असते.

मी ढगांचे सौंदर्य आणि इंद्रधनुष्याचे रंगाचे बारकाईने निरीक्षण केले असते . हवेच्या आणि डागांच्या महासागरामध्ये उडण्याचा आनंद हा इतका अनन्यसाधारण आहे. असा आनंद मी जर मला पंख असते तर अनुभवला असता.

जर मला पंख असते तर मी नियमितपणे सुंदर, प्रचंड मोठ्या आणि दंडात जंगलाचा फेरफटका मारला असता. विविध पक्षी आणि प्राण्यांची बारकाईने निरीक्षण केले असते. संपूर्ण सृष्टीतलावर अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी असतात हे मी जवळून पाहिले असते.

जंगलामध्ये फिरताना मला सिंहाची भीती नसते नाव वाघाची भीती नसते. एक प्रकारे जंगलाचा राजा बोनूश मी संपूर्ण जंगलामध्ये वावरलो असतो. तसेच मला खाण्यापिण्याची चिंता नसते मला जे आवडते ते फळे खाल्ली असते. विविध गोड आणि चविष्ट फळांचा आनंद घेतला असता.

तसेच जर मला पंख असते तर मला सायकल, बस आशा कुठल्याही वाहनांची गरज भासली नसती. मला पाहिजे त्या ठिकाणी माझ्या पंखाच्या सहाय्याने उडत गेलो होतो. बस आणि रेल्वेच्या तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज मला कधीही लागली नसती. मी माझ्या पंखांच्या बळावर मित्रांना नातेवाईकांना भेटायला गेलो असतो.

मला कुठल्याही रस्त्याचे केव्हा पटेल यांची गरज भासली नसती. आकाशामध्ये उडताना दिशा दिसली त्या दिशेला मी फिरत गेलो असतो. हलगी डोंगर, दर्या माझा मार्ग रोखू शकले नसते.

कोणासोबत माझी भांडण झाले तर मला मार खाण्याची भीती राहिली नसते. घरामध्ये मला कोणीही काही काम सांगितले तर मी ताबडतोब माझ्या पंखांच्या बळावर उडत जाऊन ते काम पूर्ण केले असते.

जर मला पंख असते तर मी आकाशामध्ये मुक्तपणे हवा तसा संचार करत राहिलो असतो. मला कोणाचे बंधन नसते ना कुणाचे ऐकून घ्यावे लागले नसते. मला पंख असते तर मी खूप मज्जा केली असती. परंतु मला पंख असते तर त्याचे मला खूप फायदे झाले असते त्यासोबतच तोटे सुद्धा झाले असतेच ना!

मला पंख असते आणि मी उडण्यासाठी आकाशात संचार केला असता तर इतर पक्षांनी मला विचित्र समजून माझ्यावर हल्ला केला असता. या गोष्टीचा मी विचारच केला नाही?

तसेच मी बाजारात गेलो असतो तर सर्व लोकांनी मला विचित्र प्राणी समजून मारले असते. मी शाळेमध्ये गेलो असता तर माझे विचित्र रुप बघून कोणीही माझ्या जवळ आले नसते. मला बघून सर्वजण घाबरले असते परिणामी शाळेतला शिक्षकाने मला शाळेतून काढून टाकले असते. या सर्व घडामोडींमुळे मला आणि माझ्या घरच्यांना किती मनस्ताप भोगावा लागेल. याचा विचार मी केलाच नाही.

माझ्या आईने तिच्या सर्व मैत्रिणी हसतील. बाबांना ऑफिस मधील त्यांचे सर्व मित्र माझ्या पंखात बद्दल प्रश्न करतील. सारे लोक आम्हाला प्रश्न विचारून त्रास देतील. पंख असून मला जेवढी मज्जा येईल त्यापेक्षा दुप्पट त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे मला पंख असते तर ही कल्पना फक्त बरी आहे पण प्रत्यक्षात मात्र हे पंख नको मला!

तर मित्रांनो ! ” जर मला पंख असते तर मराठी निबंध । Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” मला पंख असते तर मराठी निबंध “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment