जर मला लॉटरी लागली तर मराठी निबंध | Mala Lottery Lagli Tar Nibandh in Marathi

मला लॉटरी लागली तर मराठी निबंध | Mala Lottery Lagli Tar Nibandh in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मला लॉटरी लागली तर मराठी निबंध “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल

मला लॉटरी लागली तर मराठी निबंध | Mala Lottery Lagli Tar Nibandh in Marathi

आज आपल्या समाजाला गरिबीने ग्रासले आहे. आपल्या समाजामध्ये अनेक गरीब अन्नपाण्याशिवाय आणि निवारा शिवया मृत्युमुखी पडत आहेत.

आपल्या समाजामध्ये गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत हा श्रीमंतच. त्यामुळे आपल्या समाजात गरीब आणि श्रीमंत अशी दरी निर्माण झाली आहे. मीही याच गरीब समाजातला एक मुलगा.

मी मिळेल ते काम करून माझे जीवन जगत असतोी. असंच एकदा चालत असताना माझ्या नजरेस एक लॉटरीचे दुकान दिसले. तेथून मी एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले. तेव्हा माझ्या डोक्यात कल्पना आली की जर “मला लॉटरी लागली तर….”

जर मला लॉटरी लागली तर मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन. मला लॉटरी लागली तर वर्तमानपत्रांमध्ये माझा सन्मान केला जाईल. वर्तमानपत्रांमध्ये माझा फोटो सुद्धा येईल सर्वांकडून माझे अभिनंदन केले जाईल….. मजाच मजा!

मी लॉटरी लागलेल्या विचारांमध्ये हळूहळू गुंग होत गेलो. माझ्यासमोर लॉटरी लागल्यानंतर चे सर्व दृश्य रंगू लागले माझ्या हातामध्ये नोटांचा मोठा गट्टा होता. त्यातून मी माझ्या घरचे च्या सर्व वस्तू घेतल्या व समाजातील एक श्रीमंत व्यक्ती होईल.

माझ्या छोट्याशा घरामध्ये आनंदाचे जणू लाटच येईल. मी आणि माझे कुटुंब एका रात्री मध्येच लक्षाधीश होईल. समाजात आमचा आदर वाढेल. माझ्या आई-बाबांना लोकांची नोकरी साखळी करण्याची गरज भासणार नाही.

मला लॉटरी लागली तर त्यातून आयुष्यभर पुरेल एवढा पैसा मिळेल. त्यामुळे माझ्या आईच्या कमरेला घरातील सर्व तिजोरी यांच्या चावीचा घटा दिसेल यामुळे आईला मालकिणीचे रूप प्राप्त होईल. शेजारी आणि समाजामध्ये आम्हाला मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. जय समाज आज आमच्या कडून सलाम करून घेत होता तो उद्या मला सुद्धा सलाम घालेल.

जर मला लॉटरी लागली तर मी त्याला आठवतं मिळालेल्या पहिल्यापासून मोठे घर, कार घेऊन बाकीचे पैसे बँकेमध्ये निश्चित रुपाने टाकेल. जेणेकरून मला कधीही पैशाची कमतरता पडणार नाही. लॉटरीच्या पैशातून मी एक चांगला प्लॉट खरेदी करेन व त्या ठिकाणी मोठे आलिशान बंगला बांधील. ज्यामध्ये सर्व आधुनिक जगातील सुविधा असतील.

त्यानंतर मी एक कार की जेणेकरून मला कॉलेजमध्ये ये-जा करण्यासाठी बसची गरज लागणार नाही. मी माझ्या वैयक्तिक कारमधून कॉलेजमध्ये जाऊन येऊन करेन.

माझ्यावर आई बाबा आणि समाजाचे मोठे ऋण आहे. त्यामुळे मी या पैशातून समाजासाठीही काही महत्त्वाचे कार्य करेन. लॉटरीच्या पैशातून गावांमध्ये एक सुंदर मंदिर बांधेल. तसेच गावातील गरीब लोकांना पैशाची मदत करेल. गावामध्ये एक शाळा व आरोग्य केंद्र बांधेल. यामुळे गावातील लोकांना कुठल्याही हेमाकरिता गावाबाहेर जाण्याची गरज पडणार नाही.

तसेच गावामध्ये अशिक्षित असता मोठ्या प्रमाणात असल्याने गावातील लोकांसाठी एक ग्रंथालयाची स्थापना करीध. तसेच मी गावांमध्ये पाण्याची, विजेची सुविधा उपलब्ध करून देते. शहरी भागाप्रमाणे गावाचे जीवन हे सुख समाधानाचे व्हावे यासाठी प्रयत्न करेन.

शक्य असल्यास मी माझे उच्च शिक्षण इंग्लंड सारख्या मोठ्या देशामध्ये करण्याचा प्रयत्न करीन. व शिकून एक मोठा डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्यासाठी नेहमी तत्पर राहील. मला मी खरेदी केल्या लॉटरीच्या तिकिटावर बरीच अशा आहे. त्यामुळे जर मला लॉटरी लागली तर मी माझे सर्व स्वप्न पूर्ण करेल.

त्याच वेळी मला माझ्या शाळेमध्ये झालेला एक प्रसंग आठवण आला. दिवाळीच्या सुट्टीमध्ये शाळेतील शिक्षकांनी स्वतःची खरी कमाई करण्याचा उपक्रम दिला होता. त्यामध्ये मी मिळेल ते काम केले.

कधी घरोघरी जाऊन पेपर टाकले, तर कधी बांधकामाच्या कामावर जाऊन काम केले. यातून मला पाचशे रुपये मिळाले. या महिन्यातील मुळे सर आणि माझ्या पाठीवर शाबासकी चा हात फिरवला. त्यावेळी माझ्या वर्गातील सर्व मुले माझ्या कडे अभिमानाने आणि कौतुकाने पाहत होती. अरे मला माझ्या कमाईवर गर्व आणि अभिमान झाला. स्वतःची कमाई एक रुपया असली तरी त्याचा स्वाभिमान आणि अभिमान हा स्वतःला असतो, हे मला कळाले.

लॉटरीच्या आईत्या पैशावर समाजाचे ऋण फेडण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने समाजाला केलेला मदतीमध्ये अधिक अभिमान मिळेल.

त्यामुळे जर ” मला लॉटरी लागली तर…” ही मी केलेली कल्पना मला खोटी वाटली. आणि तेव्हापासून मी ” जर मला लॉटरी लागली तर “ ही कल्पना डोक्यातून काढून टाकली.

तर मित्रांनो ! ” मला लॉटरी लागली तर मराठी निबंध “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” मला लॉटरी लागली तर मराठी निबंध “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असेल तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment