लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध मराठी । Loksankhya Vadh Ek Samasya Marathi Nibandh

लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध मराठी । Loksankhya Vadh Ek Samasya Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध मराठी । Loksankhya Vadh Ek Samasya Marathi Nibandh “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध मराठी । Loksankhya Vadh Ek Samasya Marathi Nibandh

  • लोकसंख्या वाढ एक समस्या मराठी निबंध :

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज पन्नास वर्षाहून अधिक काळ झालेला आहे. भारत देशाने अतोनात प्रगती केली हे खरे पण आजही देशाचे नाव मागासलेल्या देशांमध्ये घेतले जाते त्या मागच्या कारण म्हणजे भारत देशाची “वाढती लोकसंख्या.”

संपूर्ण देशामध्ये विविध प्रकारच्या समस्या पाहायला मिळतात जसे की भ्रष्टाचार, महागाई, अशिक्षितपणा परंतु या सर्व समस्या मधील सर्वात मोठी समस्या म्हणजे वाढती लोकसंख्या होय. वाढती लोकसंख्या ही समस्या आपल्या देशाची समस्या नसून संपूर्ण जगभराची समस्या बनली आहे.

आपल्या जगाचे क्षेत्रफळ आहे ते पुढील कित्येक वर्षे ही जाऊदे तेवढीच राहणार परंतु लोकसंख्या ही वर्षानुवर्षे वाढत चालली आहे. परिणामी लोकांना वास्तव्यासाठी जागा कमी पडू लागली आहे.

वाढत्या लोकसंख्येचे परिणामाने लोकांना आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करणे सुद्धा अशक्य होत चालले आहे. त्याप्रमाणे देशाच्या सरकारला सुद्धा या गरजा पूर्ण करणे आता शक्य राहिले नाही. जसे की, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, राहण्यासाठी जागा आणि आरोग्य सेवा इत्यादी उपलब्ध करून देणे हे सरकारला सुद्धा शक्य राहिले नाही.

मनुष्य प्राचीन काळापासून निसर्गावर अवलंबून आहे. परंतु अलीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे मानव निसर्गाला हानी पोहोचत आहे. निसर्गातील झाडांना तोडून त्या जागांवर मोठमोठ्या इमारती बांधलेल्या दिसत आहेत. त्यामुळे निसर्गाचा संपूर्ण समतोल बिघडला आहे. ऋतुचक्र चक्रामध्ये जाणवत असलेला फरक सुद्धा आणि वाढत्या तापमानात होणारी वाढ हे या मागचे कारण म्हणजे लोकसंख्या वाढ हेच आहे.

तसेच लोकसंख्या वाढीमुळे आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि वास्तव्य या सर्व प्राथमिक गजांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. सामान्य जनतेला स्वतःच्या गरजा पूर्ण करणे अशक्य होत आहे.

इतकेच नव्हे तर मनुष्याला जगण्यासाठी आवश्यक असणारे अन्न सुद्धा कमी पडू लागले आहेत. म्हणून सर्व अन्नधान्य यामध्ये हायब्रीड अन्नधान्याची भेळ मिसळ होत आहे. यामुळे अन्नधान्याची गुणवत्ता कमी होऊन जीवन वाढवण्यासाठी खाणारे अन्न हे आज विषारी होत चालले आहे. आजच्या आधुनिक जगाचा मनुष्य हा बेजबाबदार झाला आहे स्वतःच्या विनाशाचे कारण त्यो स्वतः बनत आहे.

लोकसंख्या वाढीचे परिणाम हे संपूर्ण सजीव सृष्टीवर दिसून येत आहेत. वाढत्या लोकसंख्येचे परिणाम निसर्गातील सजीव निर्जीव वस्तू वर पाहायला मिळत आहे. वाढता लोकसंख्येमुळे झाडांची तोड तर होतच आहे सोबत प्रदूषण वाढले आहे, वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. वाहनांची संख्या वाढून पूर्ण वातावरणामध्ये प्रदूषण पसरले आहे.

आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाला धोका पोहोचत आहेत पण यातून पर्यावरणाला नुकसान तर होतच आहे सोबत स्वतः मनुष्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. आपल्या वातावरणामध्ये ध्वनी प्रदूषण, पाणी प्रदूषण, कचरा प्रदूषण, भूमी प्रदूषण याचे प्रमाण वाढून माणसाचे जीवन जगणे अशक्य झाले आहे.

मानवी सृष्टी हे फक्त पृथ्वीवरच आढळते की या पृथ्वीवरती 71% पाणी आणि 29% जमीन आहे. यातील 29 टक्के जमिनीवरील काही भागात शेतीसाठी वापरला जातो. तर काही भाग हा डोंगर ,धरण व्यापला आहे.

या व्यतिरिक्त शिल्लक राहिलेल्या जमिनीवर मानवी वस्ती पाहायला मिळते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्या मुळे भविष्यामध्ये लोकांना राहण्यासाठी जागा कमी पडेल. आपण पाहिले असता मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये आजही राहण्यासाठी जागा कमी आहे.

या भागामध्ये जमिनीच्या किमती या गगनावर जाऊन पोचले आहेत त्यामुळे या भागांमध्ये सध्या शेत जमिनी व तीही प्लॉट पाडून विकले जात आहेत. परिस्थिती भविष्यामध्ये ही चालू राहिली तर लोकांना अन्न पिकवण्यासाठी जमीन राहणार नाही सर्वत्र मानवी वस्तीत पाहायला मिळेल यामुळे अण्णाच्या आभावी माणसाचे आयुष्य धोक्यात येईल.

त्यासोबतच वाढती लोकसंख्या म्हणजे वाढती मागणी. त्यामुळे अलीकडे नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या चा दर वाढतच चालला आहे. लोकसंख्या ही आपल्या समाजातील सर्वात मोठी समस्या होऊन बसली आहे.

इतकेच नव्हे तर आजच्या आधुनिक जगाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतोनात प्रगती केली आहे. आणि याचा परिणाम म्हणजे अलीकडे मृत्यू दर कमी झाला आहे.

एक विचाराने वैद्यकीय क्षेत्राने केलेली प्रगती ही मनुष्यासाठी गरजेचे आहे परंतु त्याचे परिणाम म्हणजे लोकसंख्या वाढी या समस्यां द्वारे होत आहे. सध्या भारताची लोकसंख्या आहे 135 करोड वर जाऊन पोहोचली आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. ही लोकसंख्या अशीच दिवसेंदिवस वाढत राहिली तर भविष्यामध्ये भारत जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने पहिला देश म्हणून सुद्धा ओळखू जाऊ शकतो. ही गोष्ट आपल्यासाठी गर्वाचे नसून समस्येचे कारण बनू शकेल.

 लोकसंख्या वाढीचे कारणे :

दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे यामध्ये बरीच कारणे आहेत त्यातील काही महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे मांडली आहेत.

 1. अशिक्षितपणा :

आज ही आपल्या समाजातील बहुतांश जनता ही अशिक्षित आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीसाठी बहुतांश कारणीभूत ठरत असलेले कारण म्हणजे आपल्या समाजातील अशिक्षित पणा आहे.

आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून मुलगा आणि मुलगी असा भेदभाव चालत आहे आजही काही प्रमाणात मध्ये हा भेदभाव पाहायला मिळतो. जर एखादा दापत्त्यांना मुलगा नसेल तर त्यांचे वैवाहिक जीवन हे अपूर्ण मानले जाते.

त्यामुळे जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत अनेक बाळांना जन्म घातले जाते. उत्पन्नावर कुटुंबाकडे योग्य ते नियोजन केले जात नाही. भविष्याचा विचार केला जात नाही. वाईट व्यसन आणि संगत यामुळे अनेक आपल्याला जन्माला घातले जाते परिणामी लोकसंख्या वाढ पाहायला मिळते.

 2. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती :

आजच्या आधुनिक जगामध्ये वैद्यकीय क्षेत्राने खूप मोठी प्रगती केली आहे. विज्ञानाच्या जोरावर माणसाने स्वतःच्या स्वार्थापायी स्वतःचे जीवन सुखी करण्यासाठी दिवसेंदिवस विज्ञानाच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केली आहे.

विज्ञानाच्या आधारावर माणसाने धोकादायक समस्यांवरही विजय प्राप्त केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीमुळे माणसांनी असाध्य अशा रोगांवर अति औषध उपचार निर्माण केले आहेत. त्यामुळे सर्व रोगांचे निदान सापडले आहे व मृत्युदर कमी होते लोकसंख्या वाढ होत आहे.

 3. बालविवाह :

आजही आपल्या समाजामध्ये काही भागांमध्ये बालविवाह पाहायला मिळतात. बालविवाह हे सुद्धा लोकसंख्या वाढ मागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आहे. कमी वयामध्ये मुला-मुलींची लग्न त्यामुळे लोकसंख्यावाढी साठी मिळत आहे.

 लोकसंख्या वाढीचे परिणाम :

लोकसंख्या वाढीमुळे देशातील विकासाचा वेग मंदावला आहे. परंतु लोकसंख्या वाढल्याने अनेक जण बेरोजगारा आहेत. प्रत्येकालाच नोकरी, काम धंदा, व्यवसाय करता येते अशी परिस्थिती सध्या उपलब्ध राहिलेली नाही. त्यामुळे आपल्या समाजातील काही लोकांना दोन वेळचे पोटभर अन्न खाण्याची सुद्धा गरज पूर्ण होत नाही.

लोकसंख्या वाढीमुळे जंगलतोड करून त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती व औद्योगिक कारणासाठी कारखान्याचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी काही भागांमध्ये पिण्यासाठी पाण्याची ही सुविधा उपलब्ध नाही. तसेच लोकसंख्यावाढीमुळे प्रदूषण वाढले आहे व वातावरणातील तापमान वाढले आहे.

अशाप्रकारे लोकसंख्या एक समस्या संपूर्ण जगाला ग्रासले आहे.

लोकसंख्या वाढीवर उपाय :

आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे त्याचे परिणाम आपण सर्वसामान्यांना भोगावे लागतील. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कठोरात कठोर पावले उचलायला पाहिजे. त्याबरोबरच मुलगा-मुलगी असा भेदभाव समाजातून नष्ट व्हायला पाहिजे.

लोकसंख्या वाढ एक समस्या या मुद्द्यावर समाजामध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे. लैंगिक शिक्षण, कुटुंबनियोजन याचा प्रत्येकाने अभ्यास करणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो ! ” लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध मराठी । Loksankhya Vadh Ek Samasya Marathi Nibandh “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध मराठी “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

 

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment