लोहगड किल्ल्याचा इतिहास | Lohagad Fort Information In Marathi

लोहगड किल्ल्याचा इतिहास | Lohagad Fort Information In Marathi

भारत देशामध्ये अनेक किल्ले आहेत. त्या प्रत्येक किल्ल्या मागे काही ना काही इतिहास असतोच. आज आपण लोहगड किल्ल्याचा इतिहास बघणार आहोत.

आणि सोबत बरीचशी माहिती सुद्धा, चला तर जाणून घेऊत मग काय आहे लोहगड किल्ल्याचा इतिहास.

लोहगड किल्ल्याचा इतिहास | Lohagad Fort Information In Marathi

” लोहगड ” हा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक पुरातन किल्ला आहे. भारत सरकारने 26 मे 1909 रोजी या लोहगड किल्ल्याचा ” महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक ” म्हणून घोषित केले आहे.

लोहगड किल्ल्याचा इतिहास Lohagad Fort History In Marathi :

लोहगड हा किल्ला अतिशय मजबूत, बुलंद आणि दूजेंय आहे. ह्या किल्ल्याची उंची सुमारे 3420 फूट येवढी आहे आणि हा किल्ला गिरीदुर्ग ह्या प्रकार मध्ये येतो.

लोहगड किल्ल्याच्या जवळ असणारी भाजे आणि ही बौद्धकालीन लेणी प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, ही लेणी ज्या काळात निर्माण झाली, त्यापेक्षा आधीच्या काळात म्हणजे इ.स. पूर्व सातशे वर्षापूर्वी लोहगड या किल्ल्याची निर्मिती झाली असावी.

इ.स. 1489 मध्ये मलिक अहमंदने निजाम शाहीची स्थापना केली होती आणि त्याने अनेक किल्ल्यांवर आक्रमण करून ते जिंकून सुद्धा घेतले.

त्यांनी जिंकलेला किल्ल्यांपैकी लोहगड हा एक किल्ला होता. पुढे इ.स. 1564 मध्ये अहमदनगर चा सातवा राजा आणि दुसरा बुऱ्हाण निजाम याच किल्ल्यावर कैदेत होता.

पुढे इ.स. 1630 मधील लोहगड किल्ला आदिल शाहीत शामिल झाला.

सन 1657 मध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी हा परिसर जिंकून घेतला. त्याच बरोबर लोहगड आणि विसापूर हा परिसर सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील करून घेतला.

त्यानंतर पुढे झालेल्या पुरंदरच्या तहात लोहगड किल्ला 5 वर्षे मुघलांच्या ताब्यात गेला. आणि पुढे तर 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्यात पुन्हा लोहगड किल्ल्याचा प्रवेश केला आणि आपला खजिना व किंमती मालमत्ता ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला.

लोहगड किल्ल्याचा वापर मराठा साम्राज्याने सुद्धा खराब झालेला माल ठेवण्यासाठी करत होते. व पुढे पेशव्यांच्या काळात नाना फडणविसांनी काही काळ या किल्ल्याचा वापर माल ठेवण्यासाठीच केला व त्यांनी या गडाच्या हात मोठ्या पायऱ्या आणि टाक्यांची बांधणी नव्याने केली.

लोहगड किल्ल्याचे भौगोलिक स्थान :

लोहगड हा किल्ला महाराष्ट्रातील डोंगराळ किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला पर्वतीय भागा असलेल्या लोणावळ्या जवळ आणि पुण्याच्या उत्तरे कडील भागात 52 किलो मीटरच्या अंतरावर स्थित आहे. लोहगड किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची ही सुमारी 1033 मीटर व 3389 फूट येवढी आहे.

नाणे मावळ आणि पवन मावळ यांच्या मधील पर्वत राजीत हा लोहगड किल्ला किल्ला वसलेला आहे.

लोहगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

लोहगड किल्ला हा पर्यटकांसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या किल्ल्यावर जाताना चार मोठ्या प्रवेश द्वारांमधून आणि नागमोडी मार्गावरून जावे लागते.

गणेश दरवाजा :

लोहगड किल्ला मध्ये प्रवेश घेण्यासाठी पहिल्यांदा गणेश दरवाजातून जावे लागते. ह्या दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगड वाडीची पाटीलकी देण्यात आली होती. या गणेश दरवाज्याच्या आतील बाजूस शिलालेख आहेत.

नारायण दरवाजा :

हा दरवाजा लोहगड किल्ल्यात प्रवेश घेताना दुसऱ्या क्रमांकाला येतो. नारायण दरवाजाची बांधणी नाना फडणवीसांनी केली होती. या दरवाज्या लगतच एक भुयार आहे. आणि या भुयारात भात व नाचणी साठवून येई.

हनुमान दरवाजा :

लोहगड किल्ल्याचे प्रवेश घेताना तिसरा मुख्य दरवाजा म्हणजे हनुमान दरवाजा आहे. हा दरवाजा सर्वात प्राचीन असल्याचे समजले जाते.

महा दरवाजा :

महा दरवाजा हा लोहगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. या दरवाज्यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्याचे काम सुद्धा नाना फडणवीसांनी केले आहे. हा दरवाजा बांधण्यासाठी त्यांना 4 वर्षाचा कालावधी लागला.

1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1794 या कालावधीत हा महा दरवाजा बांधण्यात आला. महा दरवाजातून आत जाताच एक दर्गा लागतो. आणि या दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहार खान्याचे अवशेष आढळतात. या दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनवण्याचा खाण आहे. आणि उजवीकडे ध्वजस्तंभ आहे.

लोहगड किल्ल्याच्या आत बघण्यासाठी ठिकाण म्हणजे एक प्राचीन काळातील शिवमंदिर आहे. आणि अष्टकोनी आकाराचे एक छोटेसे तळे सुद्धा आहे.

तळ्याच्या शेजारी पिण्याचे पाण्याचे टाके आहेत. तेथून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर चालून गेल्यास एक मोठे तळे दिसेल. त्या तळाची निर्मिती नाना फडणीसांनी केली असावी.

मोठ्या तळ्याच्या पुढे विंचूकाटा आहेत. विंचूकाटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंदीची असून डोंगराळ वाट आहे.

लोहगड किल्ल्यावरून पाहिले असता ती विंचवाच्या नंगी सारखी दिसते म्हणून त्याला विंचूकाट हे नाव पडले. लोहगडावर 100 माणसं झोपु शकतील एवढी मोठी गुहा सुद्धा आहे. विंचूकाट्याच्या खाली घनदाट जंगल आहे. आणि वाटेवर वेगवेगळ्या **** आहेत. लोहगड किल्ल्याचे हे सर्व बांधकाम बघण्यासाठी खूप सुंदर आहे.

लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग :

लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्यतः तीन मार्ग आहेत ते पुढीलप्रमाणे ,

1. पुण्यावरून अथवा मुंबईवरून येताना लोणावळ्याच्या शेजारी असलेल्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडी ने किंवा लोकलने उतरावे व तेथून पुढे एक्सप्रेस हायवे ओलांडून भाजे गावातून सरळ लोहगडला जाणारी वाट पकडावी.

ही वाट मोठी आहे. या वाटेवर दीड तासांच्या चाली नंतर गायमुख खिंडीस पोहोचतो. त्या खिंडीच्या अगोदर एक लोहगडवाडी नावाचे गाव लागते.

खिंडीतून उजव्या बाजूला गेल्यास लोहगड आणि डाव्या बाजूस विसापूर किल्ला लागतो. या मार्गाने लोहगड किल्ल्यावर जाताना चार मुख्य दरवाजे लागतात.

2. लोहगड किल्ल्यावर जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे लोणावळ्यातून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने सरळ लोहगडवाडी पर्यंत जाता येते.

पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून गेल्यावर तीन ते चार किलोमीटर नंतर लोहगडवाडी लागते.

उभा चढ आणि अतिशय वळणा- वळणाचा रस्ता आहे. हा प्रवास साधारणतः अर्ध्या तासाचा आहे. स्वतःचे वाहन असल्यास हा प्रवास करणे सोयीस्कर आहे.

3. लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी तिसरा मार्ग आहे तो म्हणजे काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथेच जवळ लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर पसरलेला दिसतो.

पवना धरणापासून चा रस्ता गायमुख खिंडीच्या डावी कडील टेकडीवर जातो. व तेथून एक पायवाट आहे ती पायवाट आपणास लोहगडवाडी घेऊन जातो.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment