लिंगाणा किल्ल्याची माहिती । Lingana Fort Information In Marathi

लिंगाणा किल्ल्याची माहिती । Lingana Fort Information In Marathi

लिंगाणा किल्ला हा रायगड किल्ल्याच्या उपदुर्ग आहे.

लिंगाच्या आकाराचा हा लिंगाणा किल्ला महाडपासून ईशान्य दिशेला सुमारे 16 किलो मीटरच्या अंतरावर असून सह्याद्री पर्वताच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड या किल्ल्यांच्या दरम्यान आहे.

आज आपण याच लिंगाणा किल्ल्याची माहिती ( Lingana Fort Information In Marathi ) बघणार आहोत.

लिंगाणा किल्ल्याची माहिती । Lingana Fort Information In Marathi

रायगड हा किल्ला जर राजगृह असेल तर लिंगाणा हा त्याचे कारागृह आहे. म्हणजेच लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. रायगडाकडे जाणाऱ्या घाट वाटांवर पहारा देणाऱ्या किल्ल्यांमध्ये लिंगाणा किल्ल्याचा समावेश होतो.

लिंगाणा किल्ल्याचा आकार हा लिंगाच्या आकारा सारखा असल्याने ह्या किल्ल्याला लिंगाणा हे नाव पडले असावे. लिंगाणा किल्ल्या वरील खडक 2969 फूट उंच असून त्याची चढण 4 मैल लांबीची आहे.

लिंगाणा किल्ल्याची तटबंदी ही आज पूर्णता नष्ट झालेली आहे. परंतु या तटबंदीचे आणि धान्य कोठाराचे आजही काही अवशेष बघायला मिळतील.

लिंगाणा किल्ल्याची चढाई ही कठीण आहे व हा किल्ला डोंगरी किल्ल्याच्या प्रकारामध्ये मोडतो. डोंगरावर असल्याने आणि या किल्ल्याची चढाई ही कठीण असल्याने ह्या किल्ल्याची सध्याची परिस्थिती व्यवस्थित आहे.

  • लिंगाणा किल्ल्याचा इतिहास :

लिंगाच्या आकाराचा हा लिंगाणा किल्ला महाड पासून सोळा किलो मीटरच्या अंतरावर असून सह्याद्री पर्वताच्या मुख्य रांगेत तोरणा किल्ला आणि रायगड किल्ल्या च्या मध्ये वसलेला हा किल्ला आहे.

ह्या लिंगाणा किल्ल्याचा इतिहास हा शिवकालीन आहे. कारण मोर्‍यांचा पराभव केल्यावर शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याच्या जवळ हा लिंगाणा किल्ला बांधला असावा.

लिंगाणा किल्ल्याच्या गुहेत पहिले कारागृह होते. रायगड हा राजग्रह असला तर लिंगाणा किल्ला ह्या राजग्रहाचे कारागृह होते. या कारागृहात एका वेळेस 50 कैदी ठेवले जाते.

इ.स. 1665 च्या सुमारास झालेल्या पुरंदराच्या तहामध्ये रायगड आणि त्या परिसरातील किल्ले म्हणजेच लिंगाणा किल्ला व बाणकोट किल्ला शिवाजी महाराज्यांकडेच होते. लिंगाणा किल्ल्याच्या गिर्दनवाहीचे देव श्रीजननी व सोमजाई हे आहेत.

ह्या देवींच्या नवरात्रामध्ये होणाऱ्या उत्सवाच्या सर्व खर्च हा रायगडाच्या जमाखर्चातुन होत असे. रायगडाचा महत्त्वाचा भाग म्हणजे हाच लिंगाणा किल्ला होता.

इ.स. 1786 पर्यंत लींगणा किल्ल्यावरील सर्व वस्तूंची देखभाल केली जात होती. त्यामध्ये लिंगाणा किल्ल्याचे बुरुज, दरवाजे आणि धान्याचे कोठार यांचा समावेश होतो.

  • लिंगाणा किल्ल्याचा ऐतिहासिक निर्देश :

रायगड किल्ल्याचा महत्त्वाचा भाग समजला जाणारा हा लिंगाणा किल्ला काही काळापर्यंत रायगड किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापरला गेला.

  • लिंगाणा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

डोंगराळ भागावर असलेला आणि चढाईसाठी अतिशय कठीण असलेल्या ह्या लिंगाणा किल्ल्याच्या परिसरात पर्यटकांना पाहण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. त्यामध्ये मोहरी नावाच्या गावातून बोराट्याची एक अरुंद वाट जाते आणि या वाटेने चालत गेले असता तेथे असणाऱ्या रायलिंगहून लिंगाण्याचे दर्शन होते.

लिंगाणा किल्ल्यावर एक प्रशस्त गुहा असून या गुहेत तीस-चाळीस माणसे सहज सामावू शकतात. या गुहेच्या समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्वराचे दर्शन आपल्याला होते. गुहे मध्ये एक कौरडा हौद व एक पाण्याचा हौद बघायला मिळतो.

या हौदाच्या पुढे म्हणजेच लिंगाणा किल्ल्याच्या उत्तरेस पायऱ्या आहेत. त्या पायर्‍यांवरुन वर गेल्यास अजून एक गुहा लागते. लिंगाणा किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्या किल्ल्या वर कठीण चढाईचा सुळका आहे व यावर जायची संपूर्ण वाट ही घसरडी आहे. या सुळक्यावर जायला तीन-चार तास लागतात.

गुहेवर पाण्याची कुंड आहेत. गडाचे क्षेत्रफळ कमी आहे म्हणजे जवळ- जवळ 250 चौरस मीटर इतके आहे. त्यामुळे गडावर गेल्याने रायगड, तोरणा आणि रायगड हे किल्ले दिसतात.

  • लिंगाणा किल्ल्यावर जाण्याच्या वाटा :

लिंगाणा किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम महाड या गावी जावे लागते. व तेथून पाने गावाला जाण्यास सकाळी 11 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता बस गाड्या उपलब्ध आहेत.

पाने गावापासून लिंगाणा किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणता पाऊण तास लागतो. आणि तेथून पुढे सुळक्या चढण्यासाठी अर्धा तास लागतो.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment