काटेपूर्णा अभयारण्य माहिती | Katepurna Wildlife Sanctuary Information In Marathi

काटेपूर्णा अभयारण्य माहिती | Katepurna Wildlife Sanctuary Information In Marathi

महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये प्राण्यांसाठी काही राखीव वने ठेवलेली आहेत.

आपण याच राखीव वनांना अभयारण्यास असे म्हणतो.

आज आपण याच काटेपूर्ण अभयारण्य माहिती मराठी ( Katepurna Wildlife Sanctuary Information In Marathi ) मध्ये सविस्तर बघणार आहोत.

काटेपूर्णा अभयारण्य माहिती | Katepurna Wildlife Sanctuary Information In Marathi

काटेपूर्णा अभयारण्य विदर्भातील अकोला जिल्ह्यात वसलेले आहे. तसेच हे वाशिम जिल्ह्यात सुद्धा स्थिर आहे. या अभयारण्याची रचना 1988 मध्ये झाली आहे.

या अभयारण्याचा विस्तार 73.63 किलो मीटर आहे. आज आपण याचा अभयारण्याची माहिती बघणार आहोत. चला तर बघुया, काटेपूर्णा अभयारण्य माहिती.

काटेपूर्णा हे अभयारण्य विदर्भातील अकोला जिल्ह्यात स्थित आहे. तसेच ते वाशिम तालुक्यात सुद्धा येते. हे अभयारण्य काटेपूर्णा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेले आहे.

या अभयारण्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या वाशिम या तालुक्यातील ‘ काटा ‘ या गावातील उगम पावलेली काटेपूर्णा नदी या अभयारण्याच्या मध्य भागातून वहात जाते.

महाराष्ट्र शासनाने 8 फेब्रुवारी 1988 रोजी या काटेपूर्णा अभयारण्याच्या बाबतीत अधिसूचना जारी केली. व 20 एप्रिल 1996 मध्ये काटेपूर्णा अभयारण्य सुरक्षित वन क्षेत्र वस्थापना करिता अकोला वन विभागाकडून हस्तांतरित करण्यात आले आहे.

वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन या गोष्टींचा विचार करत या अभयारण्यात आश्रय स्थळांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. व या काटेपूर्णा अभयारण्याच्या आजूबाजूच्या परिसरात ‘ ग्राम परिसर विकास योजना ‘ राबविण्यात येत आहे.

  • काटेपूर्णा अभयारण्यातील जैवविविधता :

काटेपूर्णा हे अभयारण्य विदर्भातील अकोला जिल्ह्यात स्थित आहे. अकोला जिल्ह्याच्या जवळ असून ते मुख्यतः काटेपूर्णा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात येते. अभयारण्याच्या लगतच जलाशयाचे साठे असल्याने हे अभयारण्य जैवविविधतेने भरलेले आहे.

काटेपूर्णा अभयारण्यातील झाडे झुडपे ही दक्षिण उष्ठा व कोरडे पानझडी वने आहेत. काटेपूर्णा अभयारण्य 115 वेगवेगळ्या प्रजातीच्या वनस्पती आढळतात.

या अभयारण्यातील मुख्य वृक्ष म्हणजे धावडा, बेहडा, मोह, तेंदू पान, सळई, खैर ओला आणि तेऊदे इत्यादी वृक्ष काटेपूर्णा अभयारण्यात बहुसंख्येने आढळतात. तर आपटा, पळस, हीवर, अमलतास ही लहान आकाराची झाडे सुद्धा आहेत.

  • काटेपूर्णा अभयारण्यातील प्राणीजीवन :

घनदाट जंगल आणि जवळ असलेला जलाशयाचा साठा यामुळे काटेपूर्णा अभयारण्य बरेचसे प्राणी जीवन अस्तित्वात आहे.

काटेपूर्णा अभयारण्य चौशिंगी काळवीट आणि बार्किंग हरणा साठी प्रसिद्ध आहे. तसेच या अभयारण्यात इतर प्राणी सुद्धा आढळतात त्यात, लांडगा, काळे हरीण, बिबट्या, तरस, रान डुक्कर, नीलगाय, ससा, माकड, जंगली मांजर या प्राण्यांचा समावेश होतो. तसेच काटेपूर्णा अभयारण्यात गवताळ प्रदेश आणि पाणभळ पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे बघायला मिळतात.

तसेच या अभयारण्याला काटेपूर्णा नदीचा जलाशय लाभल्याने येथे अनेक पक्षी आढळतात. त्यात मुख्यता मोर आणि लांडोर हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात व अनेक विविध जातींचे पक्षी काटेपूर्णा अभयारण्यात बघायला मिळतात.

  • काटेपूर्णा अभयारण्यातील पर्यटन :

काटेपूर्णा चा विस्तीर्ण जलाशय आणि मावळतीचा सूर्य त्याचं पाण्यावर पडलेले प्रतिबिंब आणि लाल केशरी रंगाने न्हाऊन निघालेला आसामांत पर्यटकांना काटेपूर्णा च्या प्रेमात पडायला भाग पाडते.

अभयारण्यातून ऐकायला येणाऱ्या पक्षांचा किलबिलाट त्यात आणखी भर पाडतो. काटेपूर्णा नदीच्या काठावर वसलेले हे काटेपूर्णा अभयारण्य पर्यटकांना निसर्ग पर्यटनाचा मनमुराद आनंद देणारं एक ठिकाण ठरल आहे.

जैवविविधतेने संपन्न असं हे अभयारण्य अकोला शहरापासून साधारणत: 35 किलो मीटर अंतरावर आहे. त्यामुळे येथे शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी एक दिवसीय सहलीसाठी प्रचंड संख्येने येतात. पावसाळी पर्यटन हे इथलं एक प्रकारच खास आकर्षण ठरलं.

काटेपूर्णा अभयारण्य लागत असलेल्या महादेव मंदिर आणि या मंदिराच्या बाजूला असलेला महादेव धबधबा आणि पर्यटक यांचं एक अनोखं नातं निर्माण झालेला आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने काटेपूर्णा अभयारण्य महत्त्वाचं ठरत आहे. इथला हिरवागार निसर्ग आणि लहान- लहान निसर्ग वाटा मनाला उत्तम आनंद देतात. पावसाळ्यातलं काटेपूर्णा अभयारण्यात रूप हे मनाला मंत्रमुग्ध करणारं आहे.

  • काटेपूर्णा अभयारण्याला कसे जावे :

काटेपूर्णा अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी हा 1 ऑक्टोंबर ते 15 जून आहे. या अभयारण्या लगतचे विमानतळ हे नागपूरचे विमानतळ आहे.

जवळचे रेल्वे स्टेशन अकोला रेल्वे स्टेशन आहे ते काटेपूर्णा अभयारण्या पासून साधारणता 40 किलो मीटरच्या अंतरावर आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment