कर्नाळा किल्ल्याची माहिती । Karnala Fort Information In Marathi

कर्नाळा किल्ल्याची माहिती । Karnala Fort Information In Marathi

महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या किल्ल्यांमध्ये कर्नाळा किल्ल्याचा ही समावेश होतो. मुंबई- महाड या राज्यमार्गावर वसलेला हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे.

आज आपण याच कर्नाळा किल्ल्याची माहिती  बघणार आहोत.

चला तर मग बघुया ” कर्नाळा किल्ल्याची माहिती ” सविस्तर मध्ये.

कर्नाळा किल्ल्याची माहिती । Karnala Fort Information In Marathi

महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये या किल्ल्याचे स्थान आहे. पनवेल पासून सुमारे 12 किलो मीटरच्या अंतरावर हा कर्नाळा किल्ला वसलेला आहे.

या कर्नाळा किल्ल्याचा आकार हा साधारणता अंगठ्याच्या आकारासारखा वाटतो म्हणून हा किल्ला सर्वांचे लक्ष वेधतो. कर्नाळा किल्ल्याचा माथा हा फारच लहान आहे व किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात कर्नाळा पक्षी अभयारण्य असल्याने हा किल्ला आणखीच प्रसिद्ध झाला आहे.

  • कर्नाळा किल्ल्याची रचना :

कर्नाळा किल्ल्याचा सुळका हा 48 मीटर उंच असल्याने ह्या किल्ल्याचे दर्शन लांबूनच आपल्याला होते. कर्नाळा किल्ला हा गिरिदुर्ग प्रकाराच्या किल्ल्यांमध्ये मोडतो.

किल्ल्यावर जाण्यासाठी चढाईचा मार्ग सोपा असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने या किल्ल्याला भेट देताना दिसतात व किल्ल्याची सध्याची अवस्था ही बऱ्यापैकी चांगलीच दिसते. किल्ल्याच्या आसपास कर्नाळा पक्षी अभयारण्याचा परिसर असल्याने किल्ल्याभोवतीचे वातावरण खूपच छान आहे.

साधारणता दीड किलो मीटर बांधून काढलेल्या वाटेने किल्ल्याच्या वरती गेल्यावर प्रचंड खडक आढळतो व थोडेसे पुढे चालत गेल्यावर पडक्या अवस्थेतला किल्ल्याचा पहिला दरवाजा दिसतो. कर्नाळा किल्ल्यावर चढताना सुळका लागतो. कर्नाळा किल्ल्याची ही रचना दोन हजार वर्षांपूर्वी झालेली असावी.

  • कर्नाळा किल्ल्याचा इतिहास :

कर्नाळा किल्ला हा प्राचीन कालखंडापासून प्रसिद्ध आहे. कर्नाळा किल्ल्याचा उल्लेख यादवकाळात सुद्धा आढळतो. सन इ.स. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील केला व पुढे पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.

व पुन्हा सन 1670 मध्ये मराठ्यांनी पुन्हा कर्नाळा किल्ला आपल्या साम्राज्यात आणला. स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. पूर्वी बोर घाटद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या कर्नाळा किल्ल्याचा वापर होत असे.

  • कर्नाळा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

कर्नाळा किल्ला पर्यटकांसाठी महत्वाचे ठिकाण झाले आहे कारण हा कर्नाळा किल्ला कर्नाळा पक्षी अभयारण्यात येतो. येथे आढळणारे पक्षी व प्राणी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. तर कर्नाळा किल्ल्याचा सुळका हा विशेष लक्षवेधी आहे.

अंगठ्याच्याच्या आकाराप्रमाणे दिसणारा हा सुळका पाहण्यासाठी व चढण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. कर्नाळा किल्ल्याची तटबंदी ही ढासळलेल्या अवस्थेत आहे. कर्नाळा किल्ल्यावर प्रवेश केल्यावर एक मोठा वाडा लागतो पण हा वाडा सध्या सुस्थितीत नाही.

सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत. तसेच कर्नाळा किल्ल्यावर करणाई देवीचे मंदिर, भवानी मातेचे मंदिर, जुनी तटबंदी, जुने बांधकाम पर्यटकांना बघण्यासारखे आहे व या किल्ल्यावर येण्या- जाण्याची तसेच राहण्या -खाण्याची व्यवस्था आहे.

  • कर्नाळा किल्ल्यावर जाण्याचा वाटा :

रायगड जिल्ह्या पासून पनवेल तालुक्या पर्यंत जाण्यासाठी बसेस ची सुविधा आहे. व पुढे पनवेल पासून पेण- अलिबाग- रोहा- साई केलवणे कोणतीही एस.टी. बस कर्नाळापर्यंत जाते.

पनवेल- पळस्पे- शिरढोण- चिंचवण नंतर कर्नाळा अभयारण्य आहे. एस.टी. बस कर्नाळा अभयारण्याच्या प्रवेश द्वाराजवळच थांबते. या प्रवेश द्वारा पासून कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे दोन तास लागतात.

तसेच पुणे- कर्नाळा अशी एस.टी. दिवसातून दोन वेळेस उपलब्ध आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment