कर्नाळा अभयारण्य मराठी माहिती । Karnala Abhayaranya Information In Marathi

कर्नाळा अभयारण्य मराठी माहिती । Karnala Abhayaranya Information In Marathi

कर्नाळा अभयारण्य मराठी माहिती । Karnala Abhayaranya Information In Marathi : महाराष्ट्रातील पनवेल शहरा जवळील कर्नाळा किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात वसलेले हे कर्नाळा अभयारण्य आहे.

विशेषता पक्ष्यांच्या जैवविविधते साठी प्रसिद्ध हे कर्नाळा अभयारण्य जैवविविधतेने नटलेले आहे.

आज आपण याच कर्नाळा अभयारण्य मराठी माहिती ( Karnala Abhayaranya Information In Marathi ) मध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत.

चला तर मग बघुया कर्नाळा अभयारण्य मराठी माहिती ( Karnala Abhayaranya Information In Marathi ) मध्ये.

कर्नाळा अभयारण्य माहिती मराठी । Karnala Abhayaranya Information In Marathi

कर्नाळा हे अभयारण्य महाराष्ट्रातील पनवेल शहरा जवळील कर्नाळा या ठिकाणी आहे. आकारमानाने 12 चौरस किलो मीटरच्या परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. पक्ष्यांच्या विविध जातीच्या संरक्षणासाठी सन 1969 मध्ये महाराष्ट्र शासनाने करणारा अभयारण्याची स्थापना केली.

कर्नाळ्याच्या अभयारण्यात एक वर्षात सुमारे 125 ते 150 जातीचे पक्षी आढळतात. पनवेल पासून 12 किलो मीटरच्या अंतरावर असलेले हे अभयारण्य पातळ गंगेच्या खोऱ्यात आपटे कल्हाया रानसई- चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे.

कर्नाळा अभयारण्याला केव्हा ही भेट देण्यास गेल्यास तेथे असणाऱ्या निरनिराळ्या जातींच्या पक्ष्यांचे दर्शन नक्कीच घडते.

कर्नाळा अभयारण्य रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असून मुंबई पासून 62 किलो मीटरच्या असल्याने हे ठिकाण पर्यटनासाठी महत्त्वाचे ठरत आहे. कर्नाळा हे अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.

  • कर्नाळा अभयारण्यातील जंगले :

कर्नाळा ह्या अभयारण्यातील जंगले दाट आहेत. विविध वनस्पती आणि झाडांच्या जातींनी या अभयारण्याला आश्रय घेतला आहे.

  • सदाहरित जंगले :

कर्नाळा अभयारण्या पासून महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर आणि आंबोली ही ठिकाणे जवळ असल्याने येथे पावसाचे प्रमाण जास्त आढळते त्यामुळे कर्नाळा अभ्यारण्यात सदाहरित अरण्ये आहेत.

त्या मध्ये अंजनी, हिरडा, आंबा, चिंच, साल, मागचाफा, शिवस, जांभूळ अशा प्रकारच्या वृक्षांची झाडे आढळतात. त्यामुळे कर्नाळा अभयारण्य हिरवे आणि घनदाट दिसतात.

  • १. पानझडी वृक्ष :

कर्नाळा अभयारण्यातील जंगले ही सदाहरित असली तरी सुद्धा या जंगलात पानझडी वृक्ष आढळतात. त्यामध्ये हिरडा, बेहडा, किडाल, कवठ, जांब ही वृक्षे आढळतात.

  • २. पानझडी वृक्षांची हिरवी जंगले :

कर्नाळा अभयारण्यात पानझडी वृक्षांची हिरवे जंगले आढळतात त्यात शिवस, मोह, साग, धावडा या वृक्षांचा समावेश होतो.

  • कर्नाळा अभयारण्यातील प्राणी जीवन :

कर्नाळा हे अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध जरी असले तरी सुद्धा या अभयारण्यात वन्यप्राणी जीवन बघायला मिळते. रानडुक्कर, ससे, माकड, रान मांजर, भेकर, कोल्हा, मुंगूस, साळींदर, वानरांच्या काही जाती आणि क्वचित एखादा बिबट्या या अभयारण्यात आढळतो.

सरपटणाऱ्या प्राण्यांमधील वेगवेगळ्या जातीचे विषारी व बिनविषारी साप, घोरपड, सरडा हे प्राणी कर्नाळा अभयारण्यात आढळतात. कर्नाळा हे अभयारण्य विशेषत: पक्षांच्या विविध जाती साठी प्रसिद्ध आहे.

कर्नाळा अभयारण्यात पक्ष्यांच्या सुमारे 150 जाती आढळतात व स्थलांतरित करणाऱ्या 37 जातींचे पक्षी येथे बघायला मिळतात. तुरेवाला सर्प गरुड, खरुची, कापशी, शिक्रा असे शिकारी पक्षी कर्नाळा अभयारण्यात बघायला मिळतात.

तसेच जंगली कोंबडा, भारद्वाज, धनेश, होल, मोर या सारखे मोठे पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात. लांब शेपटीचा स्वर्गीय नर्तक आणि शामा हे पक्षी आकर्षक ठरतात. तिबोटी खंड्या, चष्मेवाला कोतवाल, चातक, तांबट, दयाळ, नाचण, शिंजीर ह्या जातीचे पक्षी आढळतात.

त्याबरोबरच सोनेरी पाठीचा सुतार पक्षी, हरितांग, मिलिंद, खंड्या, नीलिमा, नीलमणी हे विविध पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतात.

  • कर्नाळा अभयारण्यातील पर्यटन :

मुंबई पासून 60 किलो मीटरच्या अंतरावर असलेले हे कर्नाळा अभयारण्य पर्यटनाच्या दृष्टीने एक आकर्षक आणि महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे. विविध पक्ष्यांच्या जाती साठी अभयारण्य प्रसिद्ध असल्याने अनेक पर्यटन आणि पक्षीप्रेमी अभयारण्यात पर्यटना साठी येत असतात.

पावसाळ्या मध्ये तर हे ठिकाण आणखी आकर्षक वाटते. पावसाळ्यात कर्नाळा अभयारण्यात गर्द हिरवी मखमल पसरलेली दिसते. अनेक लहान- लहान पाण्याचे झरे येथून वाहताना दिसतात. पक्षी मित्रांसाठी तर कर्नाळा अभयारण्य ही निसर्गाने दिलेली देणगी आहे.

विशेषतः पुणेकर आणि मुंबईकर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या अभयारण्यातील पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी येतात. तसेच पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे येथे असलेला कर्नाळा किल्ला.

किल्ल्याकडे जाणारी निसर्ग वाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी हा किल्ला एक आकर्षणाचे ठरत आहे. कर्नाळा अभयारण्यात महाराष्ट्र शासनाने राहण्यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे.

तसेच थंडीच्या दिवसात कर्नाळा अभयारण्यात जाण्यास तेथील निसर्गाची मनसोक्त मजा लुटण्यात एक वेगळाच आनंद आहे. त्यामुळे कर्नाळा अभयारण्यातील पर्यटन हे वाढत आहे.

  • कर्नाळा अभयारण्यात कसे जावे :

पुणे- पनवेल पासून 12 किलो मीटरच्या अंतरावर असलेले हे कर्नाळा अभयारण्य आहे. येथे जाण्यासाठी पुणे- पनवेल बसची व्यवस्था आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment