जायकवाडी पक्षी अभयारण्य मराठी माहिती । Jayakwadi Pakshi Sanctuary Information In Marathi

जायकवाडी पक्षी अभयारण्य मराठी माहिती । Jayakwadi Pakshi Sanctuary Information In Marathi

महाराष्ट्रा मध्ये असलेल्या बरेचश्या अभयारण्या पैकी काही अभयारण्य विशेषता पक्ष्यांनसाठी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे जायकवाडी पक्षी अभयारण्य.

आज आपण या जायकवाडी पक्षी अभयारण्याची माहिती सविस्तर मध्ये बघणार आहोत.

चला तर मग बघुया, काय आहे जायकवाडी पक्षी अभयारण्य माहिती.

जायकवाडी पक्षी अभयारण्य मराठी माहिती । Jayakwadi Pakshi Sanctuary Information In Marathi

जायकवाडी पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पैठण जवळील नाथसागर या जलाशयाला लागूनच स्थिर आहे.

जायकवाडी पक्षी अभयारण्य सुमारे 340 चौरस किलो मीटर क्षेत्रावर पसरले आहे. नाथसागर हा जलाशय 24 फेब्रुवारी 1976 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हस्ते राष्ट्रास अर्पण करण्यात आले आहे.

नाथ सागराचा परिसर 450 चौरस किलो मीटर पसरलेला आहे. या नाथसागरास 45 किलो मीटरचा रम्य किनारा लाभलेला आहे. तसेच जायकवाडी येथे पैठण जवळ एक प्रचंड मोठे धरण आहे. या धरणाला जायकवाडी धरण म्हणतात. या धरणाचे काम 18 ऑक्टोंबर 1965 रोजी सुरुवात झाले व 1975 मध्ये पूर्ण झाले.

हिवाळ्यात येथे मोठ्या संख्येने पक्षी येतात हा त्यामुळे हा परिसर अधिकच मोहक दिसतो. या ठिकाणच्या विविध पक्ष्यांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने 13 नोव्हेंबर 1986 रोजी जायकवाडी पक्षी अभयारण्याची स्थापना केली.

नाथसागर जलाशयाचा हा परिसर 10 किलो मीटर रुंद तर 45 किलो मीटर येवढा लांब आहे व या जायकवाडी धरणामध्ये सुमारे 100 हजार दशलक्ष पाण्याचा साठा आहे.

तसेच या पाण्यामध्ये विविध जातीच्या जल वनस्पती, लहान- मोठ्या आकाराच्या मासोळी, गांडूळ, पाण्यातील विविध जीव, खेकडे मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणाचा निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो.

  • जायकवाडी पक्षी अभयारण्यातील जैवविविधता :

जायकवाडी पक्षी अभयारण्य हे विशेषतः पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. आजूबाजूला असलेल्या नाथसागराचा जलाशय आणि जायकवाडी धरण यामुळे या अभयारण्यात जैवविविधता आढळून येते.

जायकवाडीच्या जलाशय क्षेत्रात झाडे जरी कमी असली तरी बाहेरच्या अभयारण्याच्या बाजूस लिंब, आंबा, जांभूळ, चिंच, वड, ऊंबर, शिसम, सुबाभूळ, चंदन, आमलतारा यांसारखी झाडे आढळतात. त्याशिवाय 37 प्रजाती च्या फुलांची झाडे आढळतात.

  • जायकवाडी पक्षी अभयारण्यातील प्राणीजीवन :

जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या वनक्षेत्रामध्ये विविध प्रकारचे वन्य प्राणी आहे. त्यामध्ये रान मांजर, उदमांजर, मुंगूस, पाणमांजर, देवर अशा अन्य प्राण्यांचा समावेश होतो.

तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांमधील साप, नाग, अजगर, घोरपड, खारी, सरडे इत्यादी प्राणी ह्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात आढळतात. प्राण्यांप्रमाणेच या अभयारण्यात पक्ष्यांचेही वास्तव्य बघायला मिळते.

जायकवाडी पक्षी अभयारण्य हे विशेषत: पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असल्याने येथे विविध प्रजातींचे पक्षी आढळतात. कायम स्वरूपी या अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या 200 प्रजातींच्या पक्ष्यांच्या आढळ अभयारण्यात आहे.

तसेच हिवाळ्यामध्ये येथे बाहेर देशातून दक्षिण आफ्रिका, नेपाळ, तिबेट, चीन, रशिया येथून सुमारे 70 वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी येतात. सॅडपायपर, फ्लेमिंगो, कॉमन टिल, अशा अनेक प्रजातींचे पक्षी जायकवाडी जलाशयावर पाहायला मिळतात.

त्याशिवाय बदक, पाणकावळे, बगळा, सागरी धार, करकोचे तुतारी, गरुड, मैना, पोपट, शिंपी, सुतार पक्षी, भारद्वाज, तांबट असे विविध पक्षी जायकवाडी पक्षी अभयारण्यात बघायला मिळतात.

  • जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पर्यटन :

जायकवाडी पक्षी अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम काळ हा नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांचा काळ आहे. या ठिकाणचे निसर्ग आणि जलाशयाच्या जवळपासचा परिसर हा पर्यटनासाठी उत्तम ठिकाण ठरत आहे. निसर्ग जिवंत ठेवणारे पक्षी आणि प्राणी तसेच वृक्ष, वेली, झाडे या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात आढळतात.

जायकवाडी पक्षी अभयारण्यातील मनाला संतोष देणारे ठिकाण म्हणजे येथील ज्ञानेश्वर उद्यान त्यामुळे पर्यटक अधिकच आकर्षित होत आहेत. तसेच रंगीबेरंगी फुलझाडे, पाण्याचा कारंजा, जलकुंड, मोठ मोठे धबधबे अशा गोष्टी येथे बघायला मिळतात त्यामुळे जायकवाडी पक्षी अभयारण्याचे पर्यटन वाढत आहे.

येथे असलेल्या ज्ञानेश्वर उद्यानाचे चार भाग केले आहेत. फुलोउद्यान, फलोद्यान, निसर्गोद्यान आणि आध्यात्मिक शांती देणारे उद्यान अशी याची नावे आहेत.

या पक्षी अभयारण्यात आढळणारे विविध जातींचे प्रजातींचे पक्षी असल्याने पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने पक्षी निरीक्षणासाठी येतात. तसेच वन्यजीवन आणि जवळ असलेला नाथसागर यामुळे इथला परिसर पर्यटनासाठी आकर्षित ठिकाणी होत आहे.

  • जायकवाडी पक्षी अभयारण्यास आज कसे जावे :

जायकवाडी पक्षी अभयारण्य पैठण पासून 3 किलो मीटरच्या अंतरावर आहे. शेवगाव ते अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव असून शेवगाव पासून जायकवाडी 40 किलोमीटरवर अंतरावर आहे. आणि औरंगाबाद पासून 80 किलोमीटर वर आहे. या अभयारण्यात जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment