मराठी जाहिरात लेखन कसे करावे । Jahirat lekhan in Marathi

” मराठी जाहिरात लेखन कसे करावे? | Jahirat lekhan in Marathi “

जाहिरात लेखन सुंदर हस्ताक्षर कार्यशाळानमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मराठी जाहिरात लेखन कसे करावे? | Jahirat lekhan in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मराठी जाहिरात लेखन कसे करावे । Jahirat lekhan in Marathi

जाहिरात म्हणजेच विद्यापन होय. आज आपण बाजारामध्ये विविध वस्तू खरेदी करायला गेले असल्यास आपल्याला दिसून येईल की मोठमोठे पोम्प्लेट किंवा काटावट लावून त्यामध्ये विविध वस्तूंची किंवा दुकानाची जाहिरात केलेली असते.

एवढेच नसून टीव्हीवर देखील विविध वस्तूंची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. जाहिरात करण्यामागचा हेतू म्हणजे जास्तीत जास्त गिराईक आपल्याकडे आकर्षित करणे व वस्तूचे अधिक विक्री करणे हाच असतो.

त्यामुळे अलीकडे कुठलीही वस्तूची विक्री करायचे असेल तर जाहिरात केलीच जाते. आणि जाहीरातीचे ज्ञान हे विद्यार्थी व यामध्ये दिले जाते. जसे की साधारणता नववी दहावी विद्यार्थ्यांना जाहिरात लेखन कसे करावे याचे ज्ञान दिले जाते.

जाहिरात लेखन मराठी 9वी व 10वी – Marathi jahirat lekhan :

मित्रांनो ! आज बाजारपेठेमध्ये कुठल्याही वस्तूची विक्री करण्यासाठी या वस्तूच्या योग्य गुणवत्ता सोबत जाहिरातीकडे देखील अधिक भर दिला जातो. जाहिरातीच्या माध्यमातून त्या वस्तूची अधिकाधिक विक्री कसे होईल याकडे विशेष लक्ष दिले जाते.

प्रत्येक उत्पादक जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या वस्तूची जास्तीत जास्त विक्री करून फायदा मिळवू इच्छितो. परंतु कुठलीही वस्तू विकण्यासाठी केली जाणारी जाहिरात लेखन हीसुद्धा एक प्रकारची कला आहे.

त्यामुळे आजच्या लेखनामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना योग्य ती जाहिरात लेखन कसे करता येईल? याचे ज्ञान देण्यासाठी खालील एक घेऊन आलो.

विशेषता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनापाच ते सात गुणांसाठी जाहिरात लेखन विचारली जाते. म्हणून नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना जाहिरात लेखनाचा व्यवस्थित अभ्यास करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.

जाहिरात म्हणजे काय ?

” कोणतीही वस्तू पाठवा सेवेच्या विक्रीसाठी व या वस्तूंच्या विक्री पासून अधिक नफा प्राप्त करण्याच्या उद्देशाने उत्पादक या वस्तूंचे अथवा सेवेची माहिती आकर्षक पद्धतीने लोकांसमोर म्हणजेच त्या वस्तूची जाहिरात करणे होय. ”

जाहिरात करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे आपली वस्तू जास्तीत जास्त लोकांच्या नजरेस पडणे व त्या वस्तूची विक्री करणे हा असतो. त्यासाठी पोम्प्लेट, टीव्ही वरती जाहिरात दाखवणे, चित्रांच्या माध्यमातून जाहिरात करणे, सोशल मीडियावर पोस्ट करून जाहिरात, बॅनर, वर्तमान पत्र इत्यादी माध्यमांचा वापरर करून जाहिरात प्रसारित केली जाते.

या जाहिरातींमध्ये जीवनावश्यक सर्व वस्तूंचा समावेश केला जातो‌. खाण्याच्या वस्तू पासून ते नेसण्याच्या कपड्यांपर्यंत च्या सर्व वस्तूंची जाहिरात केली जाते.

जाहिरात लेखन करण्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे मुद्दे:

प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी काहीना काही महत्त्वाचे आणि आवश्यक असे मुद्दे असतात त्याप्रमाणे जाहिरात लेखन करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात-

  1. जाहिरात लेखन करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण केलेली जाहिरात ही जास्त आकर्षित असायला हवी जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्या जाहिरातीकडे आकर्षित होतील.
  1. जाहिरात कमी शब्दात जास्त आकर्षित आणि प्रभावशाली असायला पाहिजे.
  1. जाहिरात लेखन करत असताना त्यामध्ये घोषवाक्य, म्हणी, वाक्प्रचार किंवा स्लोगन्स, एखाद्या कवीतांची वाक्य त्यांचा वापर करावा जेणेकरून आपली जाहिरात अधिकच आकर्षक वाटेल.
  1. तसेच आपण एखादी जाहिरात वर्तमानपत्र ब्यानर पोम्प्लेट यामार्फत करणार असेल तर त्या जाहिराती मध्ये आपली चित्रे अधिक आकर्षित असायला हवी. विद्यार्थ्यांनी सुद्धा परीक्षांमध्ये जाहिरात लेखन करीत असताना आपण ज्या तुझे अथवा सेवेची जाहिरात लेखन करत आहोत त्या वस्तूच्या संबंधित चित्र लेखन करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
  1. जाहिराती च्या सुरुवातीला लक्ष वेधून घेणारे शब्द वापरायला हवेत जसे की, 70% ऑफ, एकावर एक फ्री, धमाकेदार सेल, आधी या आधी मिळवा इत्यादी.
  1. जाहिरात लेखन यामध्ये वर्तुळ, आयात, चौकोन व इतर चित्र किंवा रंगांचा वापर करावा.
  1. जाहिराती नेहमी एका चौकोनी बॉक्समध्ये तयार करावी.

मराठी जाहिरात लेखन नमुना :

पुढे आम्ही आपणास काही जाहिरात लेखनाचे नमुने देत आहोत ज्यांचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या पद्धतीने जाहिरातलेखन करू शकता.

  1. आईस्क्रीम पार्लर ची जाहिरात लेखन :

थंडगार आईस्क्रीम पार्लर

कोणताही सण उत्सव आनंद किंवा उत्सव साजरा करण्यासाठी,

उन्हाळ्याच्या कडक दिवसात, रणरणत्या उन्हात गारेगार होण्यासाठी

कधीही भेट द्यावं असं हक्काचं ठिकाण म्हणजे थंडगार आईस्क्रीम पार्लर!

 आमच्या येथे सर्व प्रकारचे आईस्क्रीम , लस्सी आणि ज्यूस मिळतील.

मराठी जाहिरात लेखन कसे करावे । Jahirat lekhan in Marathi

 आमची वैशिष्ट्ये :

मलाई आईस्क्रीम

बटरस्कॉच आईस क्रीम

स्ट्रॉबेरी फ्लेवर आईस्क्रीम

व्हॅनिला आईस्क्रीम

स्पेशियल लस्सी

मस्तानी

चॉकलेट मिल्क शेक

सर्व फळांचे ज्यूस

फॅमिली पॅक उपलब्ध

शुद्धता आणि ताजेपणाची ???? गॅरंटी.

थंडगार आईस्क्रीम पार्लर

सावंतवाडी रोड, पुणे

संपर्क- 9853641400.


  1. घरगुती खानावळ ची जाहिरात लेखन-

|| श्री गणेश कृपा ||

 समर्थ घरगुती खानावळ

 घरगुती जेवणाची उत्तम सोय !

शाकाहारी व मांसाहारी

जेवण उपलब्ध

मासिक मेंबर्शिप साठी खास सोय!!

 आमची खास वैशिष्ट्ये :-

 आमच्या येथे घरगुती पद्धतीचे सर्व जेवण मिळेल.

 मांसाहारी व शाकाहारी थाळी पद्धतीचे जेवण.

 रमणीय व शांत परिसर.

 फॅमिली साठी स्वतंत्र बसण्याची सेवा.

 स्वादिष्ट आणि रुचकर जेवण.

 स्वच्छ आणि ताजे जेवण.

 शंभर रुपयांमध्ये वेज थाळी

 पोटभर जेवण.

 चमचमीत स्वादिष्ट आणि रुचकर जेवणासाठी अवश्य भेट द्या!

ठिकाण: फर्स्ट फ्लोर, समर्थ कॉम्प्लेक्स,

गांधी चौक, पुणे.

वेळ: सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 7 ते 10.

संपर्क: 9852367400.


  1. जाहिरात लेखन सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा :

हस्ताक्षर सुधारणा कार्यशाळा

 कसे असावे सुंदर अक्षर, कसे असावे शुद्ध अक्षर?

 सुंदर अक्षर हस्ताक्षर काढण्याची आवड असेल तर नक्कीच या!

 सौ. विमल कुलकर्णी यांनी सुरू केलेले हस्ताक्षर कार्यशाळा मध्ये  सुंदर अक्षर काढायला शिकवले जाईल.

  सुंदर हस्ताक्षर फक्त दहाच दिवसात.

 अक्षर लेखन ,असावे सुंदर! सुंदर हस्ताक्षर यावर एकमेव उपाय तो म्हणजे हस्ताक्षर सुधारणा कार्यशाळा.

 

 सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा (Handwriting workshop)

 रेगुलर बॅचेस  सुरू

 शाखा: 1) मारुती मंदिर पुणे.    

2) मिरज

3) राजेंद्र चौक अकलूज

 संपर्क: 1642896445


तर मित्रांनो ! ” मराठी जाहिरात लेखन कसे करावे? | Jahirat lekhan in Marathi “वाचून आपणास आवडला  असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेयर करा.

” मराठी जाहिरात लेखन कसे करावे? | Jahirat lekhan in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “मराठी जाहिरात लेखन कसे करावे । Jahirat lekhan in Marathi”

Leave a Comment