इस्रो संस्थेची मराठी माहिती | ISRO Information in Marathi

इस्रो संस्थेची मराठी माहिती | ISRO Information in Marathi

मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे इस्रो ही भारतातील प्रमुख अंतराळ संस्था आहे. भारताला विकासाच्या देशाकडे घेऊन जाण्यासाठी इस्त्रोचे मोठे योगदान आहे. अंतराळातील माहिती गोळा करणे आणि त्यावर संशोधन करणे हे इस्रोचे मुख्य कार्य असते.

आजच्या लेखामध्ये आपण आज इस्त्रो संस्थेचे मराठी मध्ये माहिती पाहणारा चला तर मग पाहूया,इस्रो संस्थेची मराठी माहिती | ISRO Information in Marathi.

इस्रो संस्थेची मराठी माहिती | ISRO Information in Marathi

इस्रो ही भारतातील सर्वात मुख्य अंतराळ संशोधन संस्था आहे. इस्रो ची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी करण्यात आली व इस्रोचे मुख्यालय बेंगलोर येथे स्थित आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्य देशभरातील विविध केंद्रांमधून संचलित होत असते.

आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा जेवढा विकास झाला आहे त्याचे श्रेय केवळ इस्रो या संस्थे लाच जाते.

इस्रो चा फुल फॉर्म Full Form of ISRO in Marathi :

ISRO चा इंग्रजी मध्ये अर्थ ” Indian Space research Organisation ” असा होतो तर इस्रो चा मराठी मध्ये अर्थ ” भारतीय अंतराळ संशोधन संस्था “ असा होतो.

इस्रो म्हणजे काय? ISRO meaning in Marathi

इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याला आपण Indian Space research Organisation असे सुद्धा म्हणतो. भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेला अधिक मजबूत बनविण्याकरिता आणि अंतराळ संशोधनाच्या विकासामध्ये इस्रोचे मोठे योगदान आहे.

इस्रो या संस्थेची स्थापना डॉक्टर विक्रम साराभाई यांनी 15 ऑगस्ट 1969 रोजी केली. भारतामधील तंत्रज्ञानामध्ये जी काही प्रगती घडून आली त्यामागे इस्रोचा खूप महत्वाचा वाटा होता.

इस्रो ही भारत सरकारची अंतराळ संघटना असून ती अवकाश संबंधित संशोधन करत असते. तसेच इस्रो उपग्रह आणि तंत्रज्ञानाची निर्मिती देखील करते.

इसरो च्या माध्यमातून संशोधित केल्या गेलेल्या अनेक तंत्रज्ञानाचा वापर भारताच्या विकासासाठी आणि देशातील इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. देशाच्या  सुरक्षित ते त्याच्या बाबतीत देखील महत्त्वाची भूमिका बजावते. भारताला अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा प्रदान करण्याचे काम इस्रो कडे असते.

भारत देशामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या अंतराळ संशोधन आणि प्रक्षेपण कार्यक्रमांसाठी इस्रो जबाबदार असते. इस्रो विविध कार्यक्रम घेऊन लोकांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे महत्त्व सांगत असते. इस्रो या संस्थेची आपल्या भारत देशामध्ये अनेक केंद्रे आहेत.

भारतातील इतर केंद्रांमध्ये सुद्धा अंतराळ संबंधित संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित केले जाते. इस्रोच्या अशाप्रकारच्या यशस्वी वाटचालीमुळे आपला भारत देश आज स्वतः सॅटॅलाइट आणि विविध अंतराळ उपकरणे करून त्या उपकरणांना अंतराळ कक्षेत स्थापित करणारा जगातील सहाव्या क्रमांकाचा देश बनला आहे.

इस्रोच्या अस्या यशस्वी वाटचालीमुळे आपला देश हा अधिकच प्रगतशील होत आहे म्हणूनच आपला देश चंद्रावर मंगळावर देखील जाऊन आलेला आहे. तसेच विविध देशांचे तसेच खाजगी कंपन्यांचे उपग्रह आणि उपकरणे अंतराळ कक्ष मध्ये स्थापित करून  इस्रो स्वतःचे उत्पन्न करीत आहे.

इस्रो या संस्थेची संपूर्ण मराठी माहिती | ISRO Information in Marathi

इस्रो ही भारतातील अंतराळ संशोधन संस्था असून या संस्थेमार्फत अंतराळामध्ये  होणार सर्व गोष्टींवर संशोधन केले जाते तसेच विविध उपकरणे देखील अंतराळामध्ये सोडली जातात.

1962 साली भारत देशाने अंतराळ संशोधनासाठी एक संस्थेची स्थापना केली त्या संस्थेला India national committee for space research म्हणजेच INCOSPAR असे म्हणतात.

INCOSPAR या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर. विक्रम साराभाई यांची निवड करण्यात आली. त्यानंतर 1969 मध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली या समितीचे नाव बदलून ISRO असे ठेवण्यात आले. यानंतर पुढे 1972 मध्ये भारत सरकारने अंतरिक्ष आयोग म्हणजेच Space Commission आणि अंतरिक्ष विभाग म्हणजेच  Department of sapce  ची स्थापना केली तेव्हा इस्रोला देखील या संस्थेच्या अंतर्गत घेण्यात आले.

ISRO म्हणजे Indian Space research Organisation चे मुख्यालय हे देशाची सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेल्या राज्य म्हणजेच कर्नाटक राज्यातील बेंगलोर या ठिकाणी स्थायिक आहे.

सध्या इस्रोचे प्रमुख रॉकेट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर के.शिवीन   हे आहेत. इस्रो मजे सध्या 17 हजाराहून अधिक कामगार काम करतात. देशाची प्रमुख अंतराळ संशोधन संस्था असलेल्या इस्रोचे पण एक प्रमुख केंद्र ही देशभरामध्ये पाहायला मिळतात.

इस्रोची कार्य :

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही पुढील प्रमाणे आपले कार्य पार पाडते.

  1. इस्रोने 22 सप्टेंबर 2008 रोजी भारताची पहिली चंद्रयान-1 ही मोहीम पार पाडली.
  1. फेब्रुवारी 2017 रोजी एकाचवेळी देशांचे 104 उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित करीत याचा 27 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.
  1. मार्स ऑर्बिटर मिशन 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात व खूप कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला.
  1. सॅटॅलाइट सुचालन प्रणाली गगन आणि क्षेत्रीय सुचलन उपग्रह प्रणाली IRNSS विकसित केली गेली.
  1. तसेच उपग्रह आणि क्षेपणास्त्र SDSC श्रीहरीकोटा येथे एकत्रित आणि प्रक्षेपित केले जातात.
  1. VSSC तिरुअनंतपुरम येथे रॉकेट लॉन्चर तयार केले जाते.

तर मित्रांनो !‌  हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment