” रक्षाबंधन ” मराठी निबंध । Essay On Raksha Bandhan in Marathi Language
प्रस्तावना :
भारतीय संस्कृतीमध्ये सण, परंपरा यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. येथील अनेक सण साजरे केले जातात. भारत देशामध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक एकत्र राहतात.
प्रत्येक जातीचे, धर्माचे सण येथे साजरे करतात. प्रत्येक सणा मधून एक विशिष्ट संदेश सुद्धा दिला जातो. तसेच बहिण भावाचे नाते दर्शविणाऱ्या त्यांच्यातील प्रेमसंबंध दाखविणारा सण म्हणजे ” रक्षाबंधन” आणि आज आपण निबंध बघणार आहोत ते म्हणजे याच सणावर ” रक्षाबंधन”.
” रक्षाबंधन ” मराठी निबंध । Essay On Raksha Bandhan in Marathi Language
Table of Contents
रक्षाबंधन हा सण भारत देशामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. देशातील विविध जातीचे, धर्माचे लोक एकत्र येऊन अतिशय उत्साहाने हा सण साजरा करतात.
रक्षाबंधन म्हणजे काय –
” रक्षाबंधन” म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचे बंधन त्यांच्या मायेचे बंधन. दोघांमध्ये असलेल्या स्नेहाच्या नात्याचे बंधन म्हणजे रक्षाबंधन होय.
तसेच रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात, राखी म्हणजेच बहिण- भावाच्या प्रेमाला दर्शविणारे प्रतीक आणि त्यांच्या अनमोल नात्याची रेशमी धाग्यातून बांधलेली गाठ अशा अनमोल राखीला रक्षाबंधन या दिवशी अनन्य साधारण महत्व आहे.
रक्षाबंधन हा सण केव्हा येतो :
रक्षाबंधन हा सण हिंदू कालगणनेनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये व मराठी कालगणनेनुसार श्रावण महिन्या मध्ये साजरा केला जातो. भारतामध्ये काय भागामध्ये रक्षाबंधन म्हणून ओळखला जाणारा हा सण पश्चिम भारतात ” नारळी पौर्णिमा” म्हणून ओळखला जातो व साजराही केला जातो.
रक्षाबंधन सणाची तयारी कशी करतात :
बहिण- भावाचे सुंदर नाते दर्शविणारा हा सणाच्या दिवशी पहाटे लवकर उठून बहिण भाऊ अंघोळ करून नवीन आणि सुंदर कपडे घालतात. सकाळच्या शुभ मुहूर्तावर बहिण आपल्या भावाला पाठीवर बसून डोक्यावर स्वच्छ आणि नवीन रुमाल घालून, कपाळावर कुंकवाचा टिळा लावते व त्यावर तांदळाचे दाणे चिटकवते.
व बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखीचा पवित्र धागा बांधल्यावर भावाच्या मुखामध्ये काहीतरी गोड मिठाई ठेवते. तसेच बहिण आपल्या भावाला ओवाळते आणि आपल्या भावाच्या सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना करते.
तसेच ओवाळणी झाल्यावर भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे चा आहेर आशीर्वाद म्हणून ओवाळणीच्या ताटात ठेवतो व बहिणीच्या पाया सुद्धा पडतो. व दोघे बहिण- भाऊ एकमेकांना वचन देतात की, भाऊ हा कुठल्याही परिस्थितीमध्ये व समस्यांमध्ये सदैव आपल्या बहिणीच्या पाठीशी उभा राहील. व बहिण सुद्धा काही समस्या असल्यास आपल्या भावाकडे च त्याचे समाधान करेल. या दिवशी काही ठिकाणी, भागात बहिण- भाऊ राखी बांधण्यापूर्वी उपवास ठेवतात आणि राखी बांधून झाल्यानंतर दोघं मिळून उपवास सोडतात.
रक्षाबंधन सणाचे महत्व :-
राखी चा दोरा हा नुसता दोराच नसून तो बहिण- भावाच्या नात्याचे प्रतिक आहे. ते एक शील, प्रेमळ, मायाच्या पवित्र्याचे रक्षण करणारे बंधन आहे. हा दिसायला छोटासा दिसणाऱ्या धाग्या सोबत अनेक जणांची पवित्र मने जुळलेली असतात.
त्यांच्या भावनांचा आदर करणारा व पिढ्या न पिढ्या बहिण- भावाचे नाते टिकवून ठेवणारा हा रक्षाबंधन सण भारत देशा व्यतिरिक्त अन्य कुठल्याही देशात साजरा केला जात नाही.
रक्षाबंधन चं पौराणिक कथा :-
रक्षाबंधन हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो व हा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सुद्धा आहेत. काही जण असे म्हणतात की, जेव्हा श्री कृष्णांची काही कारणाने राग भरात येऊन आपले सुदर्शन चक्र सोडून स्वतःच्या चुलत भावाला वध केला तेव्हा व त्यांच्या उजव्या हाताला जखम होऊन रक्त येऊ लागले.
मग हाताला काहीतरी कापड बांधण्यासाठी इकडे- तिकडे शोधू लागले तेव्हा पाच पांडवांची पत्नी द्रौपदीने स्वतःच्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णांच्या हाताला जखम झालेल्या भागावर बांधली तेव्हा श्रीकृष्णांनी द्रोपदीचे रक्षण करण्याचे वचन घेतले व एक भाऊ म्हणून द्रौपदीच्या सदैव पाठीशी उभा राहण्याचा संकल्प केला.
तसेच जेव्हा देवी इंद्राचा पराजित दानवांकडून झाला तेव्हा इंद्राणीने इंद्राच्या उजव्या हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले त्यामुळे इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला व त्यांना युद्ध करण्यास प्रोत्साहन मिळून त्यांनी दानवांना हरवून विजय प्राप्त केला. व तेव्हा पासून रक्षाबंधन सणाला सुरुवात झाली असा समज आहे.
तसेच राणी लक्ष्मीबाई यांनी लढण्यासाठी नवाब बांदा यांना राखी भेट वस्तू पाठवून मदत करावी अशी विनंती केली. अशा प्रकारे अनेक प्राचीन व पौराणिक कथांमधून सुद्धा बहिण- भावाच्या नात्यां बद्दल असलेला प्रेमळ भाव बघायला मिळतो.
रक्षाबंधन बहीण- भावाचे नाते :
बहिण कितीही मोठी झाली, किंवा भलेही तिचे लग्न सुद्धा झाले ती किती श्रीमंतही झाली. तरी तिची जबाबदारी के तिच्या भावावरच असते याचा अर्थ ती कमजोर नाही तर भावाचे कर्तृत्व हे महान आहे आणि बहिणीचा भावावर असलेला विश्वास खूप मोठा आहे.
बहिण- भाऊ हे फक्त रक्ताचेच असावे असे काही नाही. विश्वातील प्रत्येक स्त्री ही भावाला बहीण प्रमाणेच वाटावी व यां विश्वातील प्रत्येक पुरुष बहिणीला भावा प्रमाणेच असावा.
म्हणून बहिण – भाऊ हे फक्त रक्ताचे असो किंवा मानलेले असो पण त्यामागचे संबंध, भावना ह्या पवित्रच असाव्यात आणि या नात्यामागची कृतज्ञता जोपासणारा, बहिण- भावाचे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा.
म्हणून ज्या बहिणीला, स्त्रीला भाऊ नसतो ती बहिण चंद्राला आपला भाऊ समजून चंद्राची पूजा करते व चंद्राला ओवाळते म्हणून लहानपणा पासून आपल्याला चंद्राला चंदा मामा असे म्हणून म्हणायला सांगितले जात होते.
तसेच, ज्या बहिणीला भाऊ नाही ती बहीण रक्षाबंधन दिवशी देवाला गणपती बाप्पा ला आपला भाऊ समजून राखी बांधते व सदैव माझे रक्षण कर अशी प्रार्थना करते.
आधुनिक काळाचा रक्षाबंधन :
आज बाजारपेठेत अनेक प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने राखी खरेदी करतात. काही जणांचा भाऊ नोकरीसाठी बाहेर देशात किंवा शहरात असल्याने इंटरनेट द्वारे, मेसेज द्वारे, मेल, कुरियर अशा सोयीस्कर पद्धतीने राखी पाठवून हा सण साजरा केला जातो.
तसेच आज हा सण फक्त भाऊ- बहिणीसाठी राहिला नाही तर मुलगी- वडील, चुलत भाऊ, मामे भाऊ किंवा मित्र यांनासुद्धा एक भावाचा दर्जा देऊन हा सण साजरा केला जात आहे. त्यामुळे सर्व नात्यांमध्ये एकजुटीचे वातावरण होत आहे.
या सणाच्या परंपरा भविष्यामध्ये सुद्धा अश्याच चालत रहाव्या म्हणून शाळा, महाविद्यालय यामध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो तर काही मुली झाडे- झुडपांना राखी बांधतात, त्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण कमी व्हावी म्हणून.
अशा प्रकारे आजच्या जगात हा सण आगळ्या – वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. अशा तऱ्हेने भारतीय संस्कृती मधील बहिण- भावाच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्ष भरा मध्ये बहिण- भाऊ कसे ही राहो.
किती ही राग अथवा भांडण असो पण या रक्षाबंधन दिवशी बहिण- भावासाठी सर्व काही असते व तिनी बांधलेल्या राखी चे मोल सुद्धा भावासाठी अनमोल असते. बहिण- भावाचे हे प्रेमळ नाते भविष्या मधील पिढ्यां मध्ये असेच टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने दर वर्षी येणारा हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला पाहिजे.
व याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले पाहिजे. भाऊ ज्या प्रमाणे आपल्या बहिणीची माया करतो तिचा सन्मान करतो त्या प्रमाणेच त्या इतर स्त्रीला सुद्धा बहिणी प्रमाणेच समजून तिच्या सोबत वागले पाहिजे त्यामुळे समाजात मुली बद्दल असलेली भीती नाहीशी होईल.
भारत संस्कृती मध्ये अशाप्रकारे बहीण- भावाच्या नात्याचा मान ठेवणारा व त्यांची मने जोपासणारा हा सण. बहिणी किती दूर असो आपल्या भावापासून तरी सुद्धा रक्षाबंधनाच्या या शुभ दिनी ती आपल्या भावाकडे येते व तू माझे रक्षण कर म्हणून रेशमी गाठ असलेली राखी आपल्या भावाला बांधते. व भाऊ सुद्धा कितीही महत्त्वाची कामे असली तरी राखी बांधण्यासाठी वेळ काढतो व बहिणीचे रक्षण सदैव करेल याची ग्वाही देतो.
अशा प्रकारे संपूर्ण देशामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- वाचाल तर वाचाल मराठी निबंध
- ध्वनी प्रदूषण एक समस्या निबंध मराठी
- मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे मराठी निबंध
- सोशल मीडिया वर निबंध मराठी
- संगणक ची माहिती मराठी मध्ये
धन्यवाद मित्रांनो !