दिवाळी सणाची माहिती । Information About Diwali Festival

दिवाळी सणाची माहिती । Information About Diwali Festival

प्रस्तावना:

हिंदू धर्मात सर्वात मोठा व पवित्र व धार्मिक सण मनून जागा मिळवलेला सण म्हणजे ” दिवाळी”. दिवाळीला ‘ दीपावली’ असे म्हटले जाते. वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणूनही ‘ दिवाळी’ ओळखले जाते.

दिवाळी सणाची माहिती । Information About Diwali Festival

श्री प्रभु राम १४ वर्षाच्या वनवासातून अयोध्या ला परतनार होते. त्यांच्या स्वागता- साठी घरोघरी दीपक जळून सडा- रांगोळी, फुल- हारांनी स्वागत केलते.

तेव्हा पासून दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील पवित्र आणि सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो.

  • दिवाळी सणाची माहिती :-

दिवाळी सण भारतामध्ये सर्वत्र आणि सर्व धर्मामध्ये साजरा केला जातो.

पावसाळा संपून नुकतीच नवीन पिके येताना शरद ऋतूच्या एन मध्यभागी, अश्विन कार्तिके या महिन्यांच्या संधिकालात दिवाळी हा सण येतो. साधारणता ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान दिवाळी हमखास असतेच आणि तसेच आठ दिवस शाळेच्या सुट्टीचा हा सण सगळे आप- आपले घर स्वच्छ करून घराला सुशोभित करतात.

  • दिवाळी

दिवाळीमध्ये घराबाहेर तेलाचे दिवे, उंच ठिकाणी आकाश दिवा ( आकाश कंदील) लावला जातो. घराबाहेर सडा- रांगोळी काढली जाते. मुख्यतः या दिवाळी सणामध्ये संपूर्ण परिवार एकत्र असतो सगळे एक- मेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आपापल्या नातेवाईकांमध्ये प्रेम संबंध वाढवितात.

दिवाळी मध्ये घरोघरी मिठाई केली जाते. ती मिठाई- फराळ आपल्या नातेवाईकांना, मित्र- मैत्रिणीला देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.

सगळीकडे रोषनाई, फटाकड्यांचा आवाज दिवाळी मध्ये सगळे वातावरण आनंददायी असते. दिवाळी सणाची सुरुवाती ” वसुबारस” त्या दिवसापासून होते.

  • वसुबारस :-

‘ वसुबारस’ ‘ वसु’ म्हणजे धन आणि ‘ बारस’ म्हणजे द्वादशी. अश्विन कृष्ण द्वादशीस, वसुबारस म्हणून ओळखले जाते. तसेच वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी. या दिवसापासून ‘ दिवाळीस’ सुरुवात होते. बायका घराबाहेर रांगोळी काढायला सुरुवात करतात.

ज्यांच्या घरी गुरे, वासरे आहेत त्यांनी गाई- गुरांची पूजा करतात. गाईंच्या पायावर पाणी घालून हळदी कुंकू लावून ओवाळले जाते व केळीच्या पानाने गाईला पुरण- पोळीचा नैवेद्य दिला जातो.

  • धनत्रयोदशी :-

अश्विन कृष्ण त्रयोदशीस ‘ धनत्रयोदशी’ हा सण साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागे एक पुरातन कथा आहे. हेमा राजाच्या पुत्राची भविष्यवाणी केली जाते त्यानुसार वयाच्या सोळाव्या वर्षी राजाचा मुलगा मृत्युमुखी पडणार असतो. त्याआधी आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुखे भोगाव्या म्हणून राजा- राणी त्यांचा विवाह करतात. विवाहाच्या चौथ्या दिवशी तो मरण पावण्याचा दिवस असतो.

या दिवशी त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही, आवती- भावती सोन्या- चांदीच्या मोहरा, हिरे- मोती महालात सर्वत्र दिव्यांच्या प्रखर प्रकाश केला जातो. जेव्हा यम राजकुमाराच्या खोली सर्प रूपात येतो तेव्हा सोन्या- चांदी त्याचे डोळे दिपतात. व यम आपल्या जगात परततो व राजकुमाराचे प्राण वाचतात म्हणून या दिवसाला ‘ यमदीपदान’ असेही मनले जाते.

धनत्रयोदशी सकाळी चार वाजता कणीकाचे चे दिवे करून दक्षिण दिशेला लावतात. व दिव्यास नमस्कार करतात त्यामुळे अपमृत्यू टळतो असा समज आहे. या दिवशी नवीन कपडे, दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते.

  • लक्ष्मीपूजन :-

हिंदू संस्कृतीमध्ये लक्ष्मी मातेला अत्यंत महत्त्व आहे. अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन जवळपास सगळ्या घरांमध्ये केले जाते.

लक्ष्मीपूजन या दिवशी संध्याकाळच्या वेळी केले जाते. असे मनतात कि लक्ष्मी देवी फार चंचल असते देवीला एका जागेवर स्थिर करण्यासाठी हि पूजा केली जाते. व्यापारी लोक यादिवशी आपल्या मौल्यवान वस्तूंची पूजा करतात अर्थात व्यापारांसाठी लक्ष्मीपूजन पासून नवीन वर्षाची सुरुवातच होते.

लक्ष्मीपूजन साठी या दिवशी अंगणात रांगोळी टाकली जाते. दिवे लावले जातात दरवाजाला फुलांचे तोरण बांधले जाते. घरामध्ये पाटवत नवीन वस्त्र टाकून लक्ष्मी देवीचा फोटो ठेवला जातो समोर तांदूळ घालून त्यावर एका वाटीमध्ये सोन्याचे दागिने ठेवले जाते. लाहया वत्तासांचा नैवेद्य देवीला दाखविला जातो. समोर नवीन दिवे लावले जातात. धूप- दिप लावून लक्ष्मी देवीची आरती केली जाते.

लक्ष्मीपूजन दिवशी नवीन वहीची पूजा करणे शुभ माणले जाते. लक्ष्मी देवीच्या पूजनाच्या आर्थिक व्यवहारातील सर्व समस्या दूर होऊन देवीच्या आशीर्वादाने यश मिळते.

  • भाऊबीज :-

दिवाळी मध्ये ‘ भाऊबीज’ या सणाला विशेष महत्त्व आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेस ‘ भाऊबीज’ हा सण साजरा केला जातो.

भाऊ- बहिणीच्या प्रेमबंधनाचा, प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला सायंकाळी चंद्र उगवल्याणी ओवाळते. भावाला जेवायला करते. भाऊ ओवाळीच्या ताकट ‘ ओवाळणी’ भेट वस्तू देऊन बहिणीचे आभार मानतो, तिचे सत्कार करतो. भावा- बहिणीला जवळ आणण्याचा हा सण कायस्थ समाजाचे लोक ‘ चित्रगुप्ताची’ जयंती म्हणून हा सण साजरा करतात.

अशा प्रकारे विविध सण साजरे करत दिवाळी हा सण आनंदाने, उत्साहाने दर वर्षी साजरा केला जातो.


ये देखील अवश्य वाचा :-