व्यायाम चे महत्व व फायदे । Importance Of Yoga in Marathi
आजच्या जगात अनेक नवनवीन आजार, साथीचे रोग, त्वचेचे रोग, शरीराचे आजार उंची प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. डॉक्टर त्यांवर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही आजारांवर उपचार मिळाला तर रोगांवर आजही कुठल्याही प्रकारचे औषधे- गोळ्या उपलब्ध नाहीत,
अशा परिस्थितीत करायची काय, आपल्या शरीराची पावर ( ताकत, शक्ती) प्रतिकार शक्ती कशी वाढवायची ? शरीराला निरोगी, व रोगांपासून कसे वाचवायचे ? हे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. तर अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते म्हणजेच ” व्यायाम”.
व्यायाम चे महत्व फायदे । Importance Of Yoga in Marathi
Table of Contents
आपल्या शरीराला निरोगी ठेवायचे असेल तर सर्वांनी ” व्यायाम” हा केलाच पाहिजे.
आजही आपल्या समाजामध्ये काही लोकांना ‘ व्यायाम’ म्हणजे काय, त्याचे फायदे, व्यायमनी आपल्याला शरीरावर काय परिणाम होतो हे माहितीच नाही.
व्यायाम चे महत्व व फायदे :-
काही लोकांना त्याचे महत्त्व माहिती पण ते नोकरी, काम यामुळे व्यायाम कडे दुर्लक्ष करतात. आपण जगण्यासाठी ‘अन्न- आणि’ गरजेचे आहे मानतो. त्याबरोबरच ‘व्यायाम’ हा तितकाच महत्त्वाचा ठरतो. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते.
मन शांत व ताजेतवाने राहते. शारीरिक क्षमता, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम फायदेशीर ठरतो. म्हणून आपल्या रोजच्या आयुष्यात व्यायाम हा नियमित असलाच पाहिजे. नियमित व्यायाम केल्याने होणारे महत्वपूर्ण फायदे आपल्या शरीराला होता ते म्हणजे असे,
१) कार्यक्षमता :-
नियमित व्यायाम केल्याने शरीराची ऊर्जा पातळी वाढत जाते. त्यामुळे आळस, कंटाळा अशा गोष्टीवर आळा बसतो. व कामामध्ये आपले लक्ष लागते. व शेगावातील चयापचय क्रिया उत्तम चालत राहते. व कामामध्ये एकाग्रताने लक्ष लागण्याचे काम व्यायामामुळे शक्य होते.
२) जीवनवाढ :-
व्यायामामुळे शरीर सर्व प्रकारच्या रोगांपासून दूर राहते. सहाजिकच व्यायाम करणारी व्यक्ती इतरांच्या तुलनेने अधिक काळ आयुष्य जगते. व्यायामामुळे शरीरातील वृद्धत्व होण्याच्या प्रक्रियेचे गती मंद होते. तसेच व्यायामामुळे आयुष्य वाढतेच सोबतच निरोगी व वेदनादायक रोगांपासून मुक्त ही म्हणते.
३) रोग प्रतिकारशक्ती :-
व्यायामामुळे शरीरातील रोगांना, जंतूंना लढण्यासाठी आपले स्नायू बळकट होतात. त्यामुळे सर्दी, खोकला, अपचन, साथीचे रोग, यापासून शरीर दूर राहते. तसेच हृदयविकार, पित्त, रक्तदाब हे रोगांपासून मुक्तता मिळते.
४) व्यक्तिमत्व :-
नियमित व्यायाम करणारी व्यक्ती नेहमी आनंदी राहते त्यामुळे आत्मविश्वास व एकाग्रता वाढली जाते. व्यायाम करणाऱ्यांची शरीर सुदृढ असते. म्हणजेच वजन, उंची, जाडी यांचा विकास समतोल झालेला असते त्यामुळे तो व्यक्ती सुदृढ व चैतन्यदायी असते.
५) मजबुती :-
नियमित व्यायाम करणारे व्यक्ती मजबूत असते, असे समजले जाते त्यामागचे कारण म्हणजे व्यायाम केल्याने शरीराची हाडे घट्ट व मजबूत असतात. त्यामुळे, मुरगळणे, आखडणे, करक भरणे या गोष्टींच्या त्रासांपासून ती व्यक्ती वाचते. व शरीराची शक्ती वाया जाण्यापासून बचाव होतो.
६) समन्वय :-
शरीर समन्वय असणे ही जीवनाचा सर्वात चांगला दर्जा समजला जातो. आपल्या शरीरामध्ये हात, पाय, हृदय व मेंदू हे अवयव दोन- दोन या रूपात असतात व डाव्या व उजव्या आशा प्रकारे असतात. त्यांचा समन्वय योग्य त्या प्रकारे ठेवण्यासाठी शरीराला व्यायामाची गरज असते.
अशा प्रकारे शरीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी प्रक्रिया व्यायाम आहे. अनेक प्रकारच्या रोगांवर मात घालणारा असा या व्यायामचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामाने शरीराला वेगवेगळे फायदे होतात.
काही लोकांना नोकरीमुळे, कामामुळे व्यायामाला जास्त वेळ देता येत नाही. किंवा कंटाळा येत असेल अशा लोकांसाठी सोपे व वेळ वाचतील असे काही व्यायाम आहेत ते केल्याने शरीरावर चांगले परिणाम दिसून येतील. व रक्तदाब, मधुमेह, जाड लोकांसाठी अधिकच फायद्याचे ठरतील.
-
नियमित चालणे :-
सर्वात सोपा व फायदेशीर असा हा प्रकारचा व्यायाम म्हणजे चालणं. लहान- मुलांपासून, आजी- आजोबांन पर्यंतच्या सर्व लोकांसाठी उपयुक्त ठरेल.
रोज सकाळी उठल्यावर १०-१५ मिनिटं नियमित चालावं. रात्री जेवल्यानंतर १०-१५ मिनिटं चालावं. म्हणजे जेवण पचन होऊन शरीराची चरबी कमी होण्यास मदत होईल. अर्थात रोज ३०-४५ मिनिटं चालल्याने शरीरातील शर्करेचं प्रमाण कमी होईल.
-
पळणं :-
ज्या लोकांना रोज सकाळी पळणं जमत असेल तर ते त्यांच्यासाठी उत्तम ठरेल. सुरवातीला हळु- हळू वेगाने पळत नंतर वेग वाढवावा.
नियमित पळण्याने हृदयाची गती वाढते व शरीराला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा होतो. त्यामुळे आठवड्यातून तीन ते चार दिवस नियमित पाळावे.
-
डान्स :-
काही लोकांना माहिती नसेल व डान्स हा एक प्रकारचा व्यायामाचा प्रकारच आहे डान्स मुळे शरीरातील जास्त असलेल्या चरबीचे प्रमाण कमी होते. व घामातून शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी होते.
-
पोहणे :-
ज्या लोकांना पोहायला येते, त्या लोकांनी आठवड्यातून तीन- चार वेळा पोचलेच पाहिजे. पोहण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. हृदयविकार कमी होतो.
-
सूर्यनमस्कार :-
कुठल्याही प्रकारचा व्यायाम करण्यास जमत नसेल तर सूर्यनमस्कार हा केलाच पाहिजे. या व्यायाम मध्ये १२ प्रकार केला जातो सोबतच त्याचे फायदेही खूप आहेत ते खालील प्रमाणे :-
सूर्यनमस्कारी सुरुवात होते ते उध्वे नमस्कारासान पासून सूर्यनमस्कार करताना सूर्याचे नाव घ्यावे सूर्यनमस्काराला सुरुवात करावी.
१) उध्वे नमस्कारासान :-
या प्रकारांमध्ये स्तब्ध उभाराहून, पायाचा टाचा मध्ये ४५% कोन करून उभे रहावे. हात नमस्कार स्थितीमध्ये छातीजवळ ठेवून मान सरळ, ताठ ठेवून रहावे.
श्वास घेऊन नमस्कार स्थितीमध्ये असलेले हात तसेच पुढे घेऊन आकाशाकडे पाहत मागे वळावे. हात दोन्ही कानाशी चिटकलेल्या असतील अशा प्रकारे. या सूर्यनमस्काराने पोटाचे विकार कमी होतात. व उंची वाढण्यास मदत होते.
२) हस्तपादासन :-
या प्रकारामध्ये कानाशी चिटकलेले हात तसेच ठेवून कंबरेपासून समोर वाकावे. व हात जमिनीवर टिकावे गुडघे वाकले न पाहिजे या पद्धतीने करावे, व श्वास सोडावा.
या सूर्यनमस्काराने अतिरिक्त चरबी कमी होऊन पोट पातळ होते.
३) दक्षिणपादप्रसरणासन :-
या प्रकारामध्ये डावा पाय पुढे घेऊन दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून उजवा पाय लांब मागे तणावा व छाती उंच करून वर आकाशाकडे पहावे. या सूर्यनमस्काराने हृदय विकार, फुप्पुस विकार दूर होतात.
४) द्विपादप्रसरणासन :-
या प्रकारामध्ये दोन्ही पाय मागे घेऊन हात पुढे घेऊन कंबर वर उचलावी आपल्या शरीराचा भार हात पायांवर ठेवावा. या सूर्यनमस्काराने पोट, अन्ननलिका यांना लाभ मिळतो.
५) भुजान्वासन :-
या प्रकारामध्ये गुडघे जमिनीवर टेकावे व हनुवटी ही जमिनीवर टेकून हात पुढे करावे. या सूर्यनमस्काराने पाठीचा कणा व मान या अवयवांना लाभ मिळतो.
६) साष्टांग प्रणिपातासन :-
या प्रकारामध्ये संपूर्ण हात, पाय, छाती जमिनीला टेकवावे व पोट आज ओढून घेत श्वास सोडावा. या सूर्यनमस्काराने छाती रुंद होते व पचनशक्ती वाढते.
७) भुजंगासन :-
या प्रकारामध्ये पाय जमिनीवर ठेवून म्हणजे झोपून हात कोपऱ्यातून दुमडून जमिनीवर ठेवावे व मानेपासून वर पहावे. म्हणजे छातीपासून वरच्या भागाचे ओझे हातावर पडले पाहिजे. या सूर्यनमस्काराने स्त्रियांचे गर्भाशय व मासिक पाळीचे विकार दूर होतात. मुत्राशयाचे विकारही दूर होतात.
८) भूधरासन :-
या प्रकारांमध्ये हात, पाय जमिनीवर ठेवून कंबर पासून चा भाग वर उचलावा व डोळी दोन्ही हाताच्या मध्ये खाली करावे. या सूर्यनमस्काराने पोटाचे विकार कमी होतात.
९) भुजान्वासन :-
या प्रकारामध्ये गुडघे व डोके जमिनीवर ठेवून नितंब आपल्याला टाचांवर ठेवावे व हात पुढे घ्यावे. या सूर्यनमस्काराने, मान, पाठीचा कणा, व श्वसनलिकेला लाभ मिळतो.
१०) दक्षिणपादसंकोचनासन :-
या प्रकारांमध्ये उजवा पाय समोर घेऊन दोन्ही हाताच्या मध्ये ठेवावा. व डावा पाय मागे लांब ताणावा, व छाती उंच करून वर आकाशाकडे पाहावे. या सूर्यनमस्काराने मान, छाती व पोटाचे विकार नाहीसे होतात.
११) हस्तपादासन :-
या प्रकारामध्ये कंबरेपासून खाली वाकावे व हात जमिनीवर टेकावे, गुडघे वाकले न पाहिजे या पद्धतीने करावे. या सूर्यनमस्काराने उंची वाढते पोट पातळ होते.
१२) नमस्कारासन :-
या प्रकारामध्ये सरळ ताट उभा राहून, हात जोडलेल्या अवस्थेमध्ये छातीजवळ ठेवून उभा रहावे. या सूर्यनमस्काराने मन शांत होण्यास मदत करते.
-
योगा :-
योगा ही एक प्रकारचा व्यायामच समजला जातो. मानसिक ताण दूर करण्यासाठी योगा महत्त्वाचा ठरतो. एकाग्रता, मान- शांती वजन कमी करण्यासाठी रक्तदाब नियमित ठेवण्यासाठी योगा महत्त्वाचा ठरतो.