परीक्षा नसती तर मराठी निबंध । If There Was No Exam Essay in Marathi
‘ परीक्षा‘ हा शब्द ऐकताच मनात कशी भीती निर्माण होते ना ? लहानपणापासून प्रत्येक मुलांना परीक्षेची खूप भीती वाटते. जर समजा या भीतिदायक परीक्षाच बंद झाल्या तर काय होईल ?
या परीक्षा नसत्या तर ना सर्व मुलांमध्ये किती आनंदाचे वातावरण असले असते ना ? तरी आपण आज याच विषयावर निबंध बघणार आहोत.
तो म्हणजे ” परीक्षा नसत्या तर……..
परीक्षा नसती तर मराठी निबंध । If There Was No Exam Essay in Marathi
खरेच ! या परीक्षा बंद व्हायला हव्यात ना ? जर या परीक्षाच नसत्या तर सर्व मुलांना सतत अभ्यासात गुंतून बसावे लागले नसते. आणि घरा मध्ये आई– बाबांचा राग ही सहन करावा लागला नसतो.
मुलांना रोज एकच टेन्शन असतंय ते म्हणजे आज शाळेत काय टेस्ट तर नसेल ना जर टेस्ट झाली आणि कमी मार्क्स पडले तर शिक्षक रागावतील का ? या विचारांमध्ये विद्यार्थी गुंतलेले असते.
जर परीक्षा नसत्या तर :
अभ्यासाचे काही टेंन्शनच राहिले नसते ना ! पण या परीक्षांमुळे अलीकडे विद्यार्थी सतत अभ्यासामध्ये बुडून गेलेले आहेत. आज कुठली परीक्षा आहे का, मग मासिक परीक्षा, मग चाचणी परीक्षा,
सहामाही नंतर नऊमाही व सर्वात शेवटी होते ती परीक्षा म्हणजे वार्षिक परीक्षा होते अशा प्रकारे परीक्षांचे लागोपाठ दर्शन चालूच असतात त्यामुळे मुलांना सतत मन तोडून अभ्यासात तर तर्क रहावे लागते.
कारण परीक्षे मध्ये कमी गुण मिळाले तर त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या शिक्षणावर होतो, करण परीक्षेत जर कमी गुण मिळाले तर संपूर्ण वर्षाच्या सरासरी गुण कमी होतात.
आणि आपल्याला माहिती की, अलीकडे एक मार्कांमुळे नंबर मागे जात असतो. अशा या स्पर्धेचा, मुलांच्या कोवळ्या मनावर ताण येतो हो मुले परीक्षार्थी बनतात.
परीक्षेत कोणते प्रश्न येतील आणि परीक्षेसाठी काय विचारले जाते मुले तेवढेच अभ्यास करतात, कोणी मन लावून एखाद्या विषयांमध्ये काय आहे, त्या विषयाचा खोलवर विचार करत नाही.
फक्त परीक्षे पुरत पाठ करतात व परीक्षेमध्ये तेवढेच लिहून येतात. म्हणजे त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान मुलांना येत नाही मग या अश्या प्रकारच्या परीक्षा घेण्याचा काय अर्थ ?
परीक्षा म्हटले की मुलांच्या पोटात भीतीने गोळा येतो. घरच्यांची किरकिरी असते अभ्यास करा, अभ्यास करा मग मुले रात्री जागा ! पहाटे उठा ! असे करून भीतीने अभ्यास करतात आणि ऐण वेळेस परीक्षे मध्ये काहीच आठवण येत नाही.
आजच्या काळात १०वी आणि १२वी च्या परीक्षांना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्यामुळे मुलं रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून अभ्यास करतात.
या वर्षातील मुलांना अभ्यासा व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचे भान राहत नाही ते फक्त अभ्यास ! अभ्यास ! अभ्यासच करत असतात.
आणि एवढे करून सुद्धा परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाही तर आत्महत्या करतात. अलीकडे परीक्षेच्या टेन्शनमुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या खूपच ऐकायला येत आहेत.
खरं तर विद्यार्थी दशेतील मुलांचे हे वय खेळण्याचे बागडण्याचे असते पण मुलं परीक्षा पुढं सर्व काही विसरतात. स्वतःच्या आवडीचा छंद जोपासण्याचा ही वेळ सुद्धा मिळना असा झालय.
अशा या ” जीवघेण्या‘ परीक्षांमुळे मुलांचे बालपण हरवून जात आहे म्हणून ह्या परीक्षाच नकोत !
खरंच ! या परीक्षा नसत्या तर किती बरं झालं असतं ना. परीक्षेपोटी सारखा सारखा अभ्यास करावा लागला नसता, तसेच रात्री जागून अभ्यास करा, सकाळी लवकर उठून पुन्हा अभ्यास करा हा त्रास कायमचा बंद झाला असता.
आणि या परीक्षा नसत्या तर एका परीक्षेपासून नाही तर परीक्षेच्या वेगवेगळ्या संकटा मधून विद्यार्थ्यांची, मुलांची सुटका झाली असती. या परीक्षांमुळे मुलांना मानसिक ताण तसेच शारीरिक त्रास सुद्धा होतो.
परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना कंटाळा येतो त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्वभाव चिडचिडा होतो. परीक्षेचे गुण हे परीक्षकांच्या हातात अवलंबून असतात.
पेपर तपासणारा परीक्षक जर चांगली मनस्थिती ठेवून पेपर तपासत असेल तर काही अडचण नाही पण अलीकडे परीक्षक पेपर तपासताना कंटाळा करतात मुलांना पाहिजे तेवढे गुण देत नाहीत.
त्यांच्या या चुकांमुळे विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात विद्यार्थ्यांचे नुकसान होते काही वेळा परीक्षकांच्या चुकांमुळे विद्यार्थी नापास झाल्याच्या बातम्या सुद्धा कानावर येतात.
परीक्षेत नापास होण्याच्या भीतीमुळे काही विद्यार्थी कॉपी करणे, पेपर चोरणे, परीक्षकांशी दोस्ती करणे अशा गैर मार्गावर जातात मुलांना वाईट वळण लागते.
या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अनिष्ट मालिका निर्माण होते मग एवढ होण्यापेक्षा या परीक्षाच नसतील तर…….. ! आणखी एक म्हणजे विद्यार्थी वर्षभर आतोनात अभ्यास करीत असतात आणि त्या अभ्यासाची चाचणी केवळ तीन तासांमध्ये घेतली जाते.
या तीन तासाच्या परीक्षांसाठी विद्यार्थी अभ्यासा व्यतिरिक्त दुसरे काही करत नाही. अशा या तणाव पूर्ण परीक्षाच नसत्या तर किती मज्जा येईल ना.
सगळीकडे तणावमुक्त आनंदी आनंद वातावरण पसरेल. परीक्षांच्या चिंता नाहीसा होईल, अभ्यासाची कटकट दूर होईल, वेळापत्रकाचे ओझं कमी होईल व सर्वत्र विद्यार्थ्यांमध्ये आनंदमय वातावरण होईल.
परीक्षा नाहीश्या झाल्या म्हणजे गुण, टक्केवारी, पास, नापास अशा गोष्टींची चिंता राहणार नाही. कुणी ‘ हुशार‘ कुणी ‘ ढ‘ असा भेदभाव होणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना समान लेखले जाईल.
व विद्यार्थ्यां मध्ये ही तुच्छ पणा राहणार नाही, हुशार विद्यार्थी बाकीच्या मुलांना कमी न लेखता सर्व बरोबरीचे होतील व विद्यार्थ्यांमध्ये सर्व समान राहतील सर्वजण एकमेकांना समजून घेतील व सर्व सामान्य म्हणून राहतील.
म्हणून मला वाटते की परीक्षा बंद व्हाव्यात. परीक्षा म्हणताच विद्यार्थ्यांना तणाव येतो परीक्षा जवळ येणार म्हणजे सकाळी लवकर उठायचे अभ्यास करायचा.
परीक्षेला जाऊन केलेल्या अभ्यासाच्या मदतीने परीक्षा द्यायची व पुन्हा पुढच्या पेपरचा अभ्यास करायचा अशा क्रम लागोपाठ चालूच असतो. त्या मुळे मुले थोडी चिडचिड होतात.
तेच तेच अभ्यास विद्यार्थ्यांना नकोसा वाटत आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होत आहे की, या परीक्षा मुळे आम्हा विद्यार्थ्यांना एवढा त्रास होतो तर मग या परीक्षाच नसत्या तर ?
अशा विचार परीक्षेला कंटाळलेला प्रत्येक विद्यार्थी करत आहे. काहींच्या मते परीक्षा असायला हव्यात तर काही विद्यार्थ्यांच्या मते या परीक्षा नसाव्यात.
जर एक विचार केला या परीक्षा बंद झाल्या तर काय होईल जर या परीक्षा बंद झाल्या तर विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा आकलन करणे अवघड होईल.
आज आपल्या सभोवती या परीक्षांच्या माध्यमातूनच नोकरी देण्यात येते मग या परीक्षा बंद झाल्या तर नोकरी कोणाला द्यायची सगळे विद्यार्थी समान समजले तर विद्यार्थ्यांच्या गुणांना कसे ओळखावे अशा समस्या समोर येत आहेत.
आणि परीक्षा बंद व्हाव्यात असा विचार करणे चुकीचे ठरेल. आणि या परीक्षा घेणे असेच चालू राहिले तर मुले अभ्यासाला कंटाळून गैरमार्ग वर जातील.
परीक्षा जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढेच त्यामुळे होणारे वाईट परिणाम सुद्धा आहेत. मग अशा परिस्थिती मध्ये करावे तर काय ? अशा प्रश्न सर्व विद्यार्थी पालकांसमोर पडलेला आहे.
या परीक्षा घ्यायच्या का नको काही मुले तर फक्त या परीक्षांच्या भीती मुळे व परीक्षेमध्ये नापास झाल्याने पालक राग करणार या कारणांमुळे शाळा, महाविद्यालय सोडतात व कामाला जातात.
मग या सर्वांचा विचार करून सर्व पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे जर या परीक्षा नसत्या तर………
* ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- वेळेचे महत्व निबंध मराठी
- ध्वनी प्रदूषण एक समस्या निबंध मराठी
- कचऱ्याचे व्यवस्थापन निबंध
- माझे बाबा या विषयावर मराठी निबंध
- संगणक ची माहिती मराठी मध्ये