इंटरनेट नसते तर मराठी निबंध | Internet Naste Tar Marathi Nibandh

इंटरनेट नसते तर मराठी निबंध | Internet Naste Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईट वर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईट वर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” इंटरनेट नसते तर | Internet Naste Tar Marathi Nibandh” या विषयावर मराठी निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

इंटरनेट नसते तर मराठी निबंध | Internet Naste Tar Marathi Nibandh

आजच्या काळात अन्न, वस्त्र, निवास यांच्या बरोबरच इंटरनेट मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये समाविष्ट झाले आहे.

मित्रांनो ! या काळात इंटरनेट हा शब्द माहिती नसणारा असा एक ही व्यक्ती बघायला मिळणार नाही. प्रत्येक व्यक्ती कुठल्या न कुठल्या कारणासाठी इंटरनेटचा वापर करतोच. इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आणि प्रत्येकांच्या आयुष्याची गरज बनला आहे.

आजच्या काळात इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे आणि अतिशय लोकप्रिय नेटवर्क बनले आहे. डिजिटल जगाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास हा इंटरनेट मुळेच शक्य झाला आहे. या इंटरनेटच्या वापरांमुळे आपल्याला प्रत्येक काम सोपे जात आहे.

पण कोणी विचार केला का, जर इंटरनेट नसते तर?  

इंटरनेट नसते तर आपल्या देशाचे काय झाले असते, प्रत्येक नागरिकाचे काय हाल झाले असते,

इंटरनेट नसते तर आज आपल्या देशाने केलेली प्रगती झाली नसती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकासही झाला नसता. आज आपण या इंटरनेटच्या बळावर खूप प्रगती केलीली आहे.

मग हे इंटरनेट नसते तर आपल्या सर्वांचे आयुष्य हे आजच्या सारखे विकसित झालेच नसते. आज आपण प्रत्येक गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर करतोच. दिवसभरातून आपण कित्येकदा इंटरनेट वापरतो हे मोजणे ही शक्य नाही.

आपण इंटरनेटच्या साह्याने आपल्या मित्र, नातेवाईकांशी गप्पा मारतो. विविध माहिती, फोटो, व्हिडिओ एकमेकांना पाठवतो. मग हे इंटरनेट नसते तर आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना कसे बोललो असतो ?

आज आपल्याला प्रत्येक गोष्टींची माहिती ही इंटरनेटच्या मदतीने उपलब्ध होते. गुगलवर किंवा युट्युब वर वेगवेगळ्या गोष्टी शिकणे सहज शक्य झाले.

मग इंटरनेट नसते तर आपल्याला विविध गोष्टींची माहिती कुठून मिळणार ? आपले ज्ञान कसे वाढणार ? त्यामुळे गुगल, युट्युब, फेसबूक, व्हाट्सॲप यांसारखे ॲप आणि सर्च इंजिन तयार झाले नसते.

तसेच आजच्या काळात काही लोक असे आहेत जे इंटरनेटच्या मदतीने पैसे कमवितात. त्याप्रमाणेच काही व्यवसाय, कंपन्या आहेत ज्या इंटरनेट द्वारे चालतात. जर मग इंटरनेट नसते तर सर्व काही ऑनलाईन कामे, पैशांची देवाण- घेवाण जी इंटरनेट मुळे मिनिटांत शक्य झाले त्या सर्व गोष्टी होणे अशक्य होईल.

आपल्याला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण इंटरनेटच्या साह्याने आपल्या कामाची माहिती किंवा जाहिरात जास्तीत जास्त लोकांना सांगू शकतो.

इंटरनेटच्या मदतीने आपण नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. मनोरंजनाचे कार्यक्रम, नविन चित्रपट, नवनवीन व्यवसाय, नोकरी बद्दलच्या माहिती शिक्षणा बद्दलचे सर्व ज्ञान इंटरनेटमुळे सहज शक्य झाले आहे.

आपण घर बसल्या इंटरनेटच्या मदतीने रेल्वेचे तिकीट बुक करू शकतो तसेच काही मिनिटात पैशांची देवाण- घेवाण करू शकतो. जगातील कुठल्याही कोपऱ्यात असलेल्या आपल्या नातेवाईकांशी व्हिडिओ कॉल वर संवाद साधू शकतो. या सर्व काही गोष्ट आज आपल्याला इंटरनेट मुळे शक्य झाल्यात. मग हे इंटरनेट नसते तर यातील एक ही गोष्ट आपल्याला अनुभवता येणार नाही.

आज इंटरनेट नसते तर या प्रश्न ऐवजी इंटरनेट आपली सर्वात महत्त्वाची गरज बनली आहे.

आज संपूर्ण जग इंटरनेटच्या जाळ्यात अडकले आहे. इंटरनेट लोकांच्या जीवनाशी जोडले आहे. इंटरनेट शिवाय कुठलेही काम करणे अशक्य झाले आहे. अशा प्रकारे इंटरनेट नसल्याचा प्रश्न उद्भवण्याची परिस्थिती निर्मांणच  होऊ शकणार नाही, उलट भविष्यात अजून जास्त इंटरनेटची गरज भासणार आहे. व या इंटरनेट मधून अजून नव- नवीन सुविधा मिळणार आहेत.

तर मित्रांनो ! ” इंटरनेट नसते तर मराठी निबंध “ वाचून आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” इंटरनेट नसते तर मराठी निबंध “ यामध्ये आमच्या कडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्कीच कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment