मी चित्रकार झालो तर मराठी निबंध । Mi Chitrakar Zalo Tar Marathi Nibandh

मी चित्रकार झालो तर मराठी निबंध| Mi Chitrakar Zalo Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईट वर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” मी चित्रकार झालो तर “ ( If I Were A Painter Essay In Marathi ) या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईटवरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी चित्रकार झालो तर मराठी निबंध । Mi Chitrakar Zalo Tar Marathi Nibandh

तर मित्रांनो ! चित्र काढायला कोणाला आवडत नाही , नवनवीन चित्र काढणे रंग भरणे नवीन आकार शिकणे हे प्रत्येकालाच आवडते. चित्र काढणे हा एक छंद आहे जो प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी जोपासतो.

मला ही लहानपासूनच चित्र काढण्याची खूप आवड आहे चित्र काढणे ही माझी आवडत नसून माझा जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू होता. त्यामुळे चित्र काढत असताना मला ना अभ्यासाचे भान राहत ना जेवणाचे भान राहत नाही तेवढ्यात ” रवी, परीक्षा जवळ आलीय ! अभ्यासाचे पुस्तक हातात घे ! सारखं रंग- ब्रश आणि चित्रकला घेऊन बसतो. काय करावे या मुलाला, काही कळत नाही. असे म्हणत आई माझ्यावर कडाडली “.

पण मी मात्र चित्र काढण्यात अतिशय मग्न ! माझे मन सतत चित्रकलेतच रमते. मला भविष्यात खूप चित्रे काढायची चित्रकलेतील नवनवीन कला शिकायच्या आहेत, त्यामुळे मलां चित्रकार व्हायला आवडेल.

मी चित्रकार झालो तर सर्व प्रथम आई- बाबांचे सुंदर चित्र काढीन करणं आई बाबा ने मला या सुंदर जगात आणले व हे सुंदर जग दाखवलं. कदाचित, आई बाबा मुळे चित्रकला हा गूण माझ्याात आला असावा.

त्यानंतर निसर्ग चित्र काढीन, कारण या पृथ्वी- तलावर निसर्गा इतके सुंदर दुसरे काहीच नाही. निसर्गातील सुंदर झाडे ,पशुपक्षी , नद्या आणि हिरवी गार डोंगर मनाला मोहित करणारे असतात. निसर्गातील हे दृश्य बघितले की बघतच बसावेसे वाटते. म्हणून मला निसर्गाची अशी सुंदर चित्रे काढायची आहेत.

स्वच्छ आकाश, सुंदर निसर्ग. डोंगरातून वाहणाऱ्या नद्या यांचे चित्र काढायचे आहे.

जर मी चित्रकार झालो तर मला पृथ्वीवर उगवणाऱ्या सर्व वनस्पती, झाडे- झुडुपे, वेली यांची चित्रे काढायला आवडतील.

त्यासाठी मी चित्रकलेचे सर्व ज्ञान घेईन. विविध आकार, रंग, रेषा, बिंदू यांचे मार्गदर्शन घेऊन चित्र काढेल. मला अधिक चांगल्या तऱ्हेने चित्र काढता यावी. यासाठी मी विविध चित्र प्रदर्शने पाहिल व चित्रकलेतील सर्वोत्तम ज्ञान घेईल.

एक उत्कृष्ट चित्रकारांमध्ये तर्कशुद्ध बुद्धी आणि बारीक निरीक्षण हे गुण अति महत्त्वाचे असतात, त्यामुळे मी माझ्यातील या गुणांची चांगली जोपासना करेन.

माझ्या आयुष्यातील कुठलाही प्रवास असू दे मी त्या प्रवासाच्या वेळी मी बारकाईने निरीक्षण करून सर्व प्रवास एका चित्रा मध्ये कैद करेन.

तसेच निसर्गातील विविध प्राण्यांचे हुबेहूब चित्र काढणे आणि म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याचे हुबेहूब चित्रामध्ये काढणे हा चित्रकलेतील जरा कठीण टप्पा असतो, त्यामुळे मी विविध चित्रकारांच्या चित्रे तील कला जोपासेल तरी सुद्धा मला तसे चित्र काढायला जमले नाही तर मी त्या साठी चित्रकलेचे तास लावेन व अतिशय उत्कृष्ट चित्रे काढण्याचा प्रयत्न करीन.

चित्रकला हा माझा छंद नसून ते माझे जीवनाचे ध्येय आहे. त्यामुळे चित्र काढण्यासाठी मी पाहिजे तेवढे कष्ट घेण्यासाठी तत्पर राहीन.

मी चित्रकार झालो तर मोनालिसा सारखे एक तरी गुढ चित्र काढीन, जे जगात प्रसिद्ध होईल. आपल्या देशातील महान पुरुषांची चित्रे मी काढीन. शिवाजी महाराजांचे हुबेहूब चित्र काढणे ही माझ्या जीवनातील स्वप्न होते, आणि मी चित्रकार झालो तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण करीन.

तसेच आपल्या देशातील इतिहास कालीन घटना मी चित्रांमध्ये जिवंत करीन. अजंठा- वेरूळ लेण्यांतील चित्रे मी पुन्हा रंगवीन आणि त्या चित्रांना मूळ स्वरूपात आणीन.

आपला इतिहास कालीन वारसा अलीकडे लुप्त होत चालला आहे, त्याला मी चित्रांच्या रूपात पुन्हा जिवंत करीन. मी चित्रकले मध्ये माझ्या सर्व कुटुंबीयांची चित्रे काढेन.तसेच देशातील प्रसिद्ध समाज सुधारक यांची चित्रे काढेल.

तसेच मी आपल्या देशासाठी शहीद झालेल्या जवानांची चित्र काढेन. आपल्या देशातील सेलिब्रिटी यांचीसुद्धा चित्रे काढेल.

आपल्या देशातील काही मोठ्या लोकांचे मेणाचे पुतळे लंडन सारख्या देशात म्युझियम मध्ये बघायला मिळतात. मी चित्रकारी बरोबरच मूर्ति कला ही शिकेन आणि माझे स्वतःचे म्युझियम आपल्या देशात काढीन.

मी चित्रकार झालो तर माझे चित्र फक्त चित्र नसून ते जिवंत चित्र असेल. जो कोणी माझे चित्र बघेल त्यांना ते खरोखरचे चित्र वाटेल. मी लहान मुलांची आणि प्राण्यांचा लहान- लहान पिल्लांची चित्रे काढेन. ते चित्रे बघून कोणालाही त्या मुलांच्या गालाला आणि प्राण्यांच्या पिल्ल्यांना हात लावण्याची इच्छा होईल. अशाप्रकारे मी सजीव चित्रे काढण्याचा प्रयत्न करीन.

आणि माझ्या चित्रकलेचा शेवटचा टप्पा म्हणजे माझे स्वतःचे चित्र ! कारण स्वतःचे चित्र काढण्यामध्ये जो आनंद असतो तो खूप अनमोल असतो. म्हणून मी चित्रकार झालो तर मी माझे स्वतःचे चित्र नक्कीच काढेल.

चित्रकलेला मी माझं करिअर बनवणार आहे त्यासाठी लागणारे सर्व कष्ट मी घ्यायला तयार आहे.

मी या जगात एक चित्रकार म्हणून ओळखले जावे हे माझे ध्येय आहे. त्यासाठी मी खूप प्रयत्न करेन. माझ्या चित्रकलेला बघून सर्वांनी मला ओळखले जावे, हे माझे सप्ना आहे. त्यासाठी मी खूप प्रयत्न करेल व नक्कीच चित्रकार बनेन.


तर मित्रांनो ! “ मी चित्रकार झालो तर मराठी निबंध “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” मी चित्रकार झालो तर मराठी निबंध ” यामध्ये आमच्या कडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

 

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment