मी पंतप्रधान झालो असतो तर मराठी निबंध । If I Become A Prime Minister Essay In Marathi
नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.
आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी पंतप्रधान झालो असतो तर मराठी निबंध ” ( If I Become A Prime Minister Essay In Marathi ) घेऊन आलोत.
आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.
मी पंतप्रधान झालो असतो तर मराठी निबंध । If I Become A Prime Minister Essay In Marathi
लहानपणा पासून माझे स्वप्न आहे की, मी मोठे होऊन पंतप्रधान व्हावे. जर मी पंतप्रधान झालो तर, सर्वप्रथम मी माझ्या देशाला आत्मनिर्भर देश बनवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करीन.
देशातील जनता आत्मनिर्भर झाली तर देशाचा विकास हा नक्कीच होईल. ” आत्मनिर्भर ” म्हणजे स्वतःवर अवलंबून राहणे त्यामुळे संपूर्ण देश स्वतःवर अवलंबून राहील. कोणी कोणाकडे कशाची भीक मागणार नाही. त्यामुळे मी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करेन.
मी पंतप्रधान झालो तर देशातील सर्व नागरिकांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रेरित करेन ज्यामुळे भारत एक महान शक्ती बनेल व जगातील कुठलाही देश माझ्या देशावर हल्ला करण्याच्या विचार करणार नाही.
मी पंतप्रधान झालो तर, मी माझ्या देशातील सर्व गरिबी नष्ट करण्यासाठी प्रयत्न करेन. कारण आपल्या देशातील बहुतांश जनता ही गरिबी सहन करत आहे, काही परिवारांना एक वेळेचे पोटभर जेवण सुद्धा मिळत नाही त्यामुळे मी देशातील प्रत्येक कुटुंबातील एका तरी सदस्याला योग्य रोजगार मिळावा व त्यांचे परिवाराला पोटभर जेवण मिळेल. याकडे पूर्णता लक्ष देईन.
त्याबरोबरच मी देशातील वाढलेली महागाई नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करेन त्यासाठी मी माझ्या देशातून बाहेर निर्यात होणाऱ्या मालमत्तेवर बंद घालीन. देशातील जास्त माल हा देशांतील लोकांना वापरता येईल.
मी पंतप्रधान झालो तर, विशेषता मुलींच्या शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष देईन. आपल्या देशातील स्त्री- भ्रूणहत्या पूर्णता थांबवण्यासाठी प्रयत्न करेन. त्यासाठी मी देशात ” मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ! ” हा विचार लोकांच्या मनात रुजवण्यासाठी प्रयत्न करेन. जनतेला मुलींचे महत्व समजावून सांगेन.
जर मुलगी शिकली तर ती तिझ्या सोबत सर्व कुटुंबाची प्रगती होईल, त्यामुळे मी विशेषता मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देईन. त्या सोबतच देशातील स्त्री- पुरुष भेदभाव दूर करून स्त्री- पुरुष समानता आत्मसात आणेल.
तसेच मी पंतप्रधान झालो तर, देशाच्या सार्वजनिक व्यवस्थेकडे पूर्णता लक्ष देईन आणि गरिबीनी ग्रासलेल्या लोकांना अन्न- धान्य पुरवठा आणि वस्तू अनुदानित दराने पुरवठा करेन ज्यामुळे देशातील गरिबीला आळा घालण्यास मदत होईल. मी देशाची कर प्रणाली अधिक उत्तम आणि तर्कसुद्ध बनवण्याचा प्रयत्न करेन.
तसेच, मी पंतप्रधान झालो तर, मी देशातील शिक्षण प्रणालीकडे विशेषण लक्ष देईन. त्यातल्या त्यात परीक्षा यंत्रणेवर जास्त लक्ष देईन. जेणेकरून विद्यार्थी कॉपी वर अवलंबून राहणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची खरीखुरी योग्यता सहजपणे समजू शकेल आणि याचा फायदा त्यांना भविष्यामध्ये होईल.
तसेच, विद्यार्थ्यांना जातीच्या आधारावर प्रवेश देणाऱ्या आणि पैश्यासाठी शिक्षणाचा बाजार करणाऱ्या वर्गा वर कडक कारवाई करेन. व विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर व्यवसायिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याकडे माझे विशेष लक्ष असेल.
मी पंतप्रधान झालो तर, महत्त्वाचे म्हणजे देशातील लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी विशेष प्रयत्न करेन. त्याप्रमाणेच कृषी क्षेत्र, उद्योगधंदे, खाणकाम, उत्पादन क्षेत्र इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रांकडे लक्ष देऊन देशाचा विकास आणि प्रगती याची काळजी घेईन. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी लोकांचे नैतिक स्तर उंचावून त्यांना देशभक्त बनवण्या करिता प्रयत्न करेन.
यासाठी मी बालकांकडे लक्ष देईन कारण लहान मुले ही देश्याचे उद्याचे भविष्य असतात त्यामुळे मुलांना योग्य ते वळण लावून त्यांना देशाचे आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी अनेक उपक्रम, कार्यक्रम राबवेल.
विविध उपक्रमांतून देशाची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करेन. जसे की, ” पाणी वाचवा, पाणी जिरवा “, ” झाडे लावा, झाडे जगवा “, ” स्वच्छता अभियान “, ” मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ! ” असा उपक्रमांतून आणि योजनातून जनजागृती करेन.
मी पंतप्रधान झालो तर, देशातील जाती धर्म, प्रांतवाद मादक पदार्थांचे सेवन, हुंडाबंदी, मदयपान, दहशतवाद, अंधश्रद्धा इत्यादी दुष्कर्मांचा नाश करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या देशात असलेल्या सर्व वाईट गोष्टींवर बंदी घालण्याचा प्रयत्न करेन.
विशेष म्हणजे मी पंतप्रधान झालो तर महिला सशक्तिकरण याकडे सर्वाधिक लक्ष देईन. स्त्रियांना पुरुषां बरोबरीचा हक्क देण्यासाठी मी माझ्या तऱ्हेने पूर्ण लक्ष घालेन. मी पंतप्रधान झालो तर, महत्त्वाचे म्हणजे देशातील भ्रष्टाचार कमी करण्यास प्रयत्न करेन.
थोड्या पैश्या साठी जे लोक आपल्या देशाला विकतात, त्यासाठी गुप्त माहिती दहशतवाद्या पर्यंत पोहोचवतात यांना आळा घालण्याचा प्रयत्न करेन.
भारतात आज भ्रष्टाचार, काळाबाजार खूप वाढला आहे. गरीब जनतेला त्यांचा पूर्ण हिस्सा, हक्क मिळत नाही. त्यामुळे मी भ्रष्टाचार आणि काळा बाजार मिटवण्यासाठी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेन.
अशा प्रकारे मी पंतप्रधान झालो तर मी मनापासून माझ्या देशाची सेवा करेन.
तर मित्रांनो ! ” मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध ” ( If I Become A Prime Minister Essay In Marathi ) वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
या निबंधामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- तानसा अभयारण्य माहिती
- माझा आवडता पक्षी पोपट निबंध
- मी चित्रकार झालो तर मराठी निबंध
- पन्हाळा गड किल्ल्याची माहिती
- महाराष्ट्रातील अभयारण्ये माहित
धन्यवाद मित्रांनो !