हरिश्चंद्रगड किल्ल्याचा इतिहास । Harishchandragad Fort History In Marathi

हरिश्चंद्रगड किल्ल्याचा इतिहास । Harishchandragad Fort History In Marathi

हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्र राज्यातील ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा सर्वांत मोठा डोंगर आहे.

आज आपण याच हरिश्चंद्रगड किल्ल्याची इतिहास आणि माहिती बघणार आहोत.

चला तर मग बघुया ” हरिश्चंद्रगड किल्ल्याची माहिती | Harishchandragad Fort History In Marathi “.

हरिश्चंद्रगड किल्ल्याचा इतिहास । Harishchandragad Fort History In Marathi

हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक आहे. हरिश्चंद्रगड किल्ल्या जवळील शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.

हरिश्चंद्रगड किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची ही सुमारे 4000 फूट येवढी आहे. हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारामध्ये येतो. हरिश्चंद्रगड किल्ल्याची चढाई मध्यम प्रकारामध्ये येते. या किल्ल्याची सध्याची अवस्था ही व्यवस्थित आहे.

  • हरिश्चंद्रगड किल्ल्याचा इतिहास :

मोगल आणि मराठा साम्राज्याची पार्श्वभूमी ही याच हरीश्चंद्रगड किल्ल्याच्या इतिहासा सोबत निगडित आहे. हरिश्चंद्रगडाला सुमारे दोन ते चार हजार वर्षां पूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे.

तर साडेतीन हजार वर्षां पेक्षा जास्त प्राचीन असलेल्या चारी बाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगड किल्ल्याचा उल्लेख हा प्राचीन अग्नीपुराणात आणि मत्स्यपुराणात बघायला मिळतो.

असे म्हणतात की, सुरुवातीला हरिश्चंद्रगड हा कोळी महादेव या समाजाकडे होता व पुढे तो मोगलांनी घेतला त्यानंतर इ.स. 1747- 1748 च्या दरम्यान मोगल आणि मराठा यांच्यात झालेल्या लढाईत मोगलांचा पराभव होऊन मराठ्यांनी हा किल्ला जिंकला.

आणि हरिश्चंद्रगड किल्ल्याचे किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पुढे 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

हरिश्चंद्रगड किल्ल्याच्या आसपास च्या शिखरांची नावे ही हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास असल्याने या किल्ल्याचा संदर्भ हा राजा हरिश्चंद्र यांच्या जोडला आहे. हरिश्चंद्रगडाच्या लेण्यांमध्ये चांगदेवांनी तपश्चर्या केली आहे.

  • हरिश्चंद्रगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व :

महाराष्ट्रात आढळणाऱ्या सर्व किल्ल्यांपैकी हरिश्चंद्रगड हा किल्ला खूप वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये जशी तटबंदी आढळते त्याप्रमाणे हरिश्चंद्रगड या किल्ल्याला तटबंदी आढळत नाही.

हरिश्चंद्र गड किल्ल्यावर प्राचीन लेण्या आहेत व याच लेण्यांमध्ये चांगदेवांनी तपश्चर्या केली होती. तसेच हरिश्चंद्रगडावर सुमारे 12 व्या शतकापेक्षा अधिकच्या काळातील शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे.

तसे सह्याद्री पर्वतातील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून या हरिश्चंद्रगडाची ओळख आहे. येथील मंदिर कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच या जमातीची ओळख आहे.

संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व कोळी महादेव जमातीचे प्रतीक म्हणून या मंदिराला ओळखले जाते. तसेच इंग्रज, सावकार, जमीनदार यांच्या विरुद्ध असणाऱ्या लढ्याचे प्रतिक म्हणजे हाच हारीचंद्रगड किल्ला होय.

महादेव मंदिराच्या प्रांगणात एक भिंत आहे. व ह्या भिंती समोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरा वरून वाहत येतो आणि या ओढ्यालाच ‘ मंगळ गंगेचा उगम ‘ असे म्हणतात.

  • हरिश्चंद्रगड किल्ल्याचे पौराणिक महत्त्व :

हरिश्चंद्र किल्ल्यावर हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी शिखरे आढळतात. त्यामुळे या हरिश्चंद्रगड किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्र यांच्याशी जोडलेला आहे.

  • हरिचंद्रगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

हरिश्चंद्रगड ह्या किल्ल्यावर पर्यटकांना पाहण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.

  • १. हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :

हरिश्चंद्रगडावर पर्यटकांना पाहण्यासाठी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची उंची तळापासून साधारणतः सोळा मीटर आहे.

  • २. मंगळगंगेचा उगम :

मंदिराच्या प्रांगणात एक भिंत आहे. आणि याच भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. व या पुलाच्या खालून एक ओढा वाहतो त्यालाच मंगळगंगेचा उगम म्हणतात.

  • ३. केदारश्वराची गुहा :

मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागतो. याला केदारेश्वराची गुहा असे म्हणतात. या गुहेत एक मीटर उंच आणि दोन मीटर लांब असे शिवलिंग आहे व यात कंबरे पर्यंत पाणी भरलेले आहे.

  • ४. तारामती शिखर :

हरिश्चंद्रगडावर तारामाती हे सर्वात उंच शिखर आहे. या शिखराची उंची साधारणत 4850 फूट येवढी आहे आणि या शिखराच्या आत मध्ये एकूण सात लेणी आहेत.

त्या सात लेण्यांपैकी एका लेणीच्या गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य मूर्ती आहे. ह्या गणेश गुहेच्या बाजूलाच आणखी एक गुहा आहे. या गुहेत राहण्याची सोय आहे.

  • ५. कोकणकडा :

पर्यटकांचे सर्वात आवडतीचे आणि आकर्षणाचे ठिकाण म्हणजे हे कोकणकडा होय. अर्ध्या किलो मीटर पसरलेला वाटीसारखा अर्धगोल आकाराचा हा कोकणकडा आहे.

या कड्याची सरळधार ही 1700 फूट येवढी आहे. पायथ्यापासून कड्याची उंची ही साधारणता 4500 फूट भरते.

  • हरिश्चंद्रगडावर जाण्याच्या वाटा :

हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी पुण्यातून जिन्नर ह्या तालुक्यातील खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने पर्यटक याच मार्गाने हरिश्चंद्रगडावर जातात.

तसेच आणखी एक मार्ग म्हणजे पुणे पासून आळेफाटा मार्गे जाता येते किंवा कल्याण मुरबाड- माळशेज घाट मार्गे खुबीकाटक जाता येते. व तेथून पाच किलो मीटरच्या अंतरावर खिरेश्वर गाव आहे व या गावापासून एक ते दोन किलो मीटरच्या अंतरावर हरिश्चंद्रगड किल्ला लागतो.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment