गौताळा अभयारण्य माहिती । Gautala Abhayaranya Information In Marathi
गौताळा अभयारण्य माहिती । Gautala Abhayaranya Information In Marathi : महाराष्ट्रातील जवळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पसरलेले हे गौताळा अभयारण्य आहे.
जैवविविधतेने अतिशय श्रीमंत असलेले हे गौताळा अभयारण्य आज पण याच गौताळा अभयारण्य माहिती बघणार आहोत.
चला तर मग बघुया काय आहे ” गौताळा अभयारण्य माहिती “.
गौताळा अभयारण्य माहिती । Gautala Abhayaranya Information In Marathi
Table of Contents
जवळगांव आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत पसरलेले हे अभयारण्य सुमारे 260 चौरस किलो मीटरच्या क्षेत्रात पसरलेले आहे. 1986 साली महाराष्ट्र शासनाने या अभयारण्याची स्थापना केली.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात वसलेल्या या गौताळा अभयारण्यात सुमारे 17 गावातील वनक्षेत्राचा समावेश होतो.
गौताळा अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्याच्या 19,706**** हेक्टर तर ****** चे 6355***** हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे. कन्नड तालुक्या जवळच्या प्रवेश दारातून आत गेल्यावर पुढे अनेक झाडे, फुलझाडे आहेत या झाडांवर विविध पक्षांचा सहवास असल्याचे दिसतात. व तेथे एक नाला आहे त्या नाल्याला चंदन नाला असे म्हणतात. त्या नाल्या पासून पुढे गेल्यास एक मारुतीचे मंदिर आहे. व या मंदिरासमोर गौताळा या नावाचा तलाव आहे.
आणि याच तलावाच्या नावाने या अभयारण्याला गौताळा अभयारण्य असे नाव देण्यात आले. जैवविविधतेने नटलेले हे अभयारण्य पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण आहे.
-
गौताळा अभयारण्यातील वृक्ष :
गौताळा या अभयारण्यात गौताळा हे तलाव असल्याने येथे जलाशयाचा साठा लाभला आहे. त्यामुळे गौताळा अभयारण्याच्या जंगलात विविध वृक्ष आढळतात.
त्यामध्ये बांबू, पळस, रान शेवगा, कडुलिंब, चिंच, रान पिंपळ, खैर, धावडा, बाभूळ अशा प्रकारची झाडे गौताळा अभयारण्यात आढळतात. तसेच विविध प्रकारच्या वृक्षवेली आणि औषधी वनस्पती या गौताळा अभयारण्यात आढळतात.
-
गौताळा अभयारण्यातील प्राणी जीवन :
घनदाट जंगल आणि जवळच असलेल्या जलाशयाचा साठा यामुळे गौताळा अभयारण्यात लांडगे, कोल्हे, बिबट्या, चितळ, काळवीट, तरस, रानडुकरे, सांबर, हरीण, गवे, भेकर अशा प्रकारच्या 54 प्रजातींचे विविध प्राणी या गौताळा अभयारण्या मध्ये बघायला मिळतात.
प्राण्यांप्रमाणेच गौताळा अभयारण्यात विविध पक्षांचाही संचार आढळतो. मोर, पोपट, सुगरण, सातभाई, दयाळ, बुलबुल, कोतवाल, चंडोल पक्षी अशा प्रकारच्या पक्ष्यांच्या 230 जाती या गौताळा अभयारण्यात आढळतात.
-
गौताळा अभयारण्याचे पौराणिक महत्त्व :
गौताळा तलावाच्या पुढे असणाऱ्या उंच टेकडीवर विविध वृक्षांची दाटी आहे. व या टेकडीवर एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये एक पाण्याची टाकी आहे.
या गुहेत गौतम ऋषींची दगडी मूर्ती आहे. असे म्हणतात की, याच गुहेत गौतम ऋषींनी तपश्चर्या केली होती यावरून या टेकडीला गौतम टेकडी हे नाव पडले असावे.
तसेच गौताळा अभयारण्याजवळ पटणा येथे निकुंभ राजवंशानी बांधलेला 12 व्या शतकातील एक पुरातन मंदिर आहे. चंडिका देवी मंदिरा पासून काही किलो मीटरच्या अंतरावर गणित आणि खगोल तज्ञ भास्कराचार्यांचे मोठे पीठ आहे.
याच ठिकाणी बसून त्यांनी सिद्धांत शिरोमणी या ग्रंथात अनेक गणिती सिद्धांत मांडले आहेत.
पुरातन मंदिरे, महादेव मंदिर, लेणी, केदार कुंड, सीता खोरे आणि धवल तीर्थ धबधबा अशा विविध पौराणिक स्थळांमुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात.
-
गौताळा अभयारण्यातील पर्यटन :
जैवविविधतेने श्रीमंत आणि संपन्न असलेले हे गौताळा अभयारण्य पर्यटनाचे एक महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे.
गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला असलेल्या सात माळ्याचा डोंगरातून नागद नदीचा उगम पावतो. या नदीला आसपासचा परिसर आणि विविध पक्षांचा किलबिलाट यांमुळे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत आहे.
-
गौताळा अभयारण्यात कसे जावे :
गौताळा हे अभयारण्य औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड या गावापासून 15 किलो मीटरच्या अंतरावर आहे. कन्नड गावापासून 2 किलो मीटर गेल्यावर एक फाटा फुटतो.
या फाट्याने सरळ गेल्यास आपण गौताळा अभयारण्याच्या प्रवेश द्वारा जवळ पोहोचतो. या अभयारण्यात वाहनाने किंवा पायी फिरता येते.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- ज्ञानगंगा अभयारण्य माहिती
- धोडप किल्ला मराठी माहिती
- चांदोली अभयारण्य मराठी माहिती
- चंदन वंदन किल्ला ची माहिती
- दौलताबाद किल्ल्याचा इतिहास
धन्यवाद मित्रांनो !