गडद किल्ल्याची माहिती । Gadad Fort Information In Marathi
गडद किल्ल्याची माहिती आणि गडद गणपती । Gadad Fort Information In Marathi सह्याद्रीच्या डोंगर रागांमधील मुरबाड तालुक्यातील सोनावळे गावाजवळील प्राचीन गणेश लेणी किंवा गणेश गडद या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुहा आहेत.
आमच्या या वेबसाईटवरती तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती आणि निबंध वाचायला मिळतील. आत्ता आपण पाहूया ( Gadad Fort Information In Marathi )
आज आपण याच गडदच्या गुहांची किंवा गडद गणपतीची माहिती बघणार आहोत. ( Gadad Fort Information In Marathi )
गडद किल्ल्याची माहिती आणि गडद गणपती । Gadad Fort Information In Marathi
Table of Contents
-
गडदचा किल्ला, गडद गणपती ठिकाण :
सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगा मधील मुरबाड तालुक्यातील सोनावळे या गावाच्या जवळपास आपल्याला गडदच्या गुफा आणि गडद गणपतीचे ठिकाण बघायला मिळते.
निरनिराळे दगड, झाडी आपल्याला या ठिकाणी आढळते तर जैक्पर, कार्थेलियम व क्वार्टझ अशा प्रकारचे उपयुक्त दगड गडदच्या डोंगरावर आढळतात.
गडदच्या किल्ल्याच्या ठिकाणी वीस ते पंचवीस घरांची वस्ती आहे. गडदचा किल्ला हा उंच डोंगरावर असल्याने हा किल्ला चढताना सावधगिरी बाळगावी लागते. उन्हा मध्ये तर गडदचा कडा ह्या वेगळाच दिसतात.
विविध गुहा गदडच्या किल्ल्याच्या ठिकाणी पाहायला दिसतात. गडदच्या किल्ल्याच्या ठिकाणी भरपूर झाडी असल्याने जमिनीवर झाडांच्या पानाचे आंथरूण घातलेले दिसेल या पानावरुन चालताना येणारा आवाज अनुभवायची वेगळीच मज्जा आहे.
गडदच्या माथ्यावरुन खाली पाहिले असता अंगावर काटे उभा राहतात. निसर्गाचे खरे रूप पाहायचे असेल तर गडदच्या किल्ल्याला नक्कीच भेट दिली पाहिजे.
-
गडदचा किल्ला, गडद गणपती इतिहास :
सातव्या शतकात खोदलेल्या गडद इथल्या भव्य लेण्यांद्वारे तात्कालिन संस्कृतीची ओळख होण्यासाठी मोठी मदत होते. 1870 मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या गडदच्या लेण्यांची नोंद घेतली.
गणेश लेणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दगडी गुहेत विविध दालणे असून त्यामध्ये विविध हिंदू देवी देवतांची शिल्पे कोरण्यात आली आहेत.
मध्यभागी मुख्य सभागृह आहे आणि शेजारीच छोटीशी तीन- चार दालने असे या गडदच्या किल्ल्यातील लेण्यांचे स्वरूप आहे. पावसाळ्यात या लेण्यांच्या वरच्या भागावरून जोराने कोसळणारा धबधबा पर्यटकांना गडदकडे आकर्षित करतो.
-
गडदचा किल्ला, गडद गणपती रचना :
गडदचा किल्ला हा उंच डोंगरावर स्थित आहे. गडदचा बहिरी दैवत 1265 मीटर उंचीवरील कड्या मध्ये दुर्गम जागी आहे. गडदच्या किल्ल्याला उंची तर आहेच पण सोबतच गडावर साहस, अरुंद, चिचोळी वाट आहे.
गडद किल्ल्याच्या कड्यावर खोदलेल्या छोट्या पाणवठ्यावर एका भक्कम झाडाचे खोड आहे. व त्यावर एक टांगलेला वेल दिसतो. या वेलाला लोंबकळत अक्षरक्ष: देवाचे नाव घेताच आपल्या येथे असलेल्या गुहेत प्रवेश करायला लागतो.
जर येते प्रवेश घेणाऱ्या एखाद्या पुरुषाच्या घरी स्त्री ही ऋतुमती असेल तर त्या पुरुषाला देवाच्या दर्शनाकरिता त्या ठिकाणी आला तर त्याचा अपघात होतो अश्या कथा सांगितल्या जातात. गडद किल्ल्यावर दाट झाडी असल्याने येथील रस्ते चटकन लक्षात येत नाहीत.
गडावरून आपली नजर खाली गेली की डोळे नुसते गरगरतात. या किल्ल्यावर चढण्यासाठी मार्ग हा खूप कठीण आहे. इतर गडांप्रमाणे या गडाच्या किल्ल्याला पायऱ्या नाहीत.
-
निसर्गनिर्मित गुहा :
गडदच्या किल्ल्या वरती आपल्याला चाळीस फूट लांब तर वीस फूट रुंद आणि आठ फूट उंच अशी जागा आढळते. या जागेच्या तोंडा जवळच एक भक्कम वेल बांधलेला आहे. व त्याच्या समोरच शेंदराने माखलेला भैरव आहे.
या भैरवाच्या आसपासच्या परिसरात लहान- मोठे दगड त्याच अवस्थेत दिसतात ज्याप्रमाणे भैरव आहे. व तिथेच बाजूला एका शेजारी एक अशी दोन टाकी आहेत.
व तिथे एक गुहा आहे व त्या गुहाच्या थोड्या अंतरावर आणखी एक गुहा आहे. असे म्हणतात की, गडाद वरच्या गुहा ह्या निसर्ग निर्मिती आहेत. जत्रेचा उत्सव असतो तेव्हा गावातील लोक आपल्या खांद्यावर वजनदार मेंढरू घेऊन वर गुहे पर्यंत चालत जातात.
गडादच्या किल्ल्यांवरील पाण्याच्या टाकीत जुन्या घडणीची मजबूत आणि मोठ्या आकाराची स्वयंपाकाची भांडी आहेत. या भांड्यांची आज पर्यंत एकदाही चोरी झालेली नाही.
-
पर्यटन :
गडदचा किल्ला हा नैसर्गिक रित्या परिपूर्ण असल्याने येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विविध प्रकारच्या वनस्पती आणि धबधबे हे पर्यटकांना आकर्षित करतात.
गावापासून गडदच्या लेण्यांपर्यंतच्या प्रवासात आढळणारे निसर्ग श्रीमंतीची ओढ लावणाऱ्या या निसर्गाने हे ठिकाण पर्यटकांसाठी मुख्य बनले आहे. अशा या निसर्गाने नटलेल्या अवघड जागी पुन: पुन्हा जावेसे वाटते.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- ज्ञानगंगा अभयारण्य माहिती
- धोडप किल्ला मराठी माहिती
- चांदोली अभयारण्य मराठी माहिती
- चंदन वंदन किल्ला ची माहिती
- दौलताबाद किल्ल्याचा इतिहास
धन्यवाद मित्रांनो !