ग्रामसुधार मराठी निबंध । Essay on Gramsudhar in Marathi

ग्रामसुधार मराठी निबंध । Essay on Gramsudhar in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” ग्रामसुधार मराठी निबंध । Essay on Gramsudhar in Marathi” घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

ग्रामसुधार मराठी निबंध । Essay on Gramsudhar in Marathi

ग्रामसुधार मराठी निबंध :

भारत देशा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो.  अनेक खेड्यांचा मिळून भारत देश बनला आहे. भारतीय संस्कृती आणि संस्कृती चे घर हे शहरी भागात नसून भारतातील सात लाख खेड्यांमध्ये दिसून येते.

एक गावे म्हणजे भारताचा आत्मा आहे. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त गोष्टीसाठी आपल्या गावांचा आधार घ्यायला लागतो. भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो भारताला कृषिप्रधान करण्यामागे या गावांचा चा मोठा वाटा आहे.

कारण शेती ही शहरी भागांमध्ये न करता गावांमध्ये केली जाते. भारत देशाला विकसनशील करण्यासाठी गावांचा मोठा वाटा असला तरी गावाची प्रगती शहरांपेक्षा खूपच कमी असल्याचे पाहायला मिळते. काही गावे हे तर पूर्णता अशिक्षित असल्याचे पहायला मिळतात. त्यामुळे फार  काळापूर्वी गांधीजी म्हणाले होते,” खेड्याकडे चला.”

” जर आपल्याला देशाची प्रगती हवी असेल तर, गावांची सुधारणा केली पाहिजे. कारण हे आपल्या देशाचे जीवन आहे आणि आत्मा सुद्धा आहे.” यासाठी प्रत्येक गावातील  ग्राम सुधारणा होण्याची गरज आहे.

ग्राम सुधारणा ही काळाची गरज बनत चालली आहे. कारण आपल्यातील बहुतांश जनता ही गावांमध्ये आपले वास्तव्य करत असते. आज शिक्षण प्रणालीला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते परंतु गावी भागामध्ये बहुतेक लोक निरक्षर असल्याचे आजही पहायला मिळतात. याचा परिणाम असा की गावांमध्ये चालत आलेल्या जुना रूढी याला गावातील जनता बळी पडत आहे.

त्यामुळे खेड्यातील भागांमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा करणे गरजेचे आहे.  गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असतो परंतु आजच्या आधुनिक काळामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करता येते याचे ज्ञान गावातील लोकांना अद्यापही माहिती नाही.

त्यामुळे गावातील लोकांना आधुनिक साधन आणि शेती विषयी योग्य शिक्षण दिल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो फक्त शेतकऱ्यांनाच न होता संपूर्ण देशाला याचा फायदा होईल. यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल जेणेकरून भारतात जास्त उत्पन्न मिळवले जाईल. तसेच ग्राम सुधारणा करण्यासाठी दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे खेड्यामध्ये  आरोग्य, औषध आणि करमणुकीचे योग्य साधने उपलब्ध करून देणे होय.

ग्राम सुधारणा करण्यासाठी आपल्याला गावांमधील योग्य करमणुकीचे साधने, ज्ञान वाढवण्यासाठी लागणारे भंडार आणि लोकांचे वैयक्तिक जीवन सुखी राहण्यासाठी रिता आवश्यक असलेला औषध उपचार असणे गरजेचे आहे.

प्रत्येक गावांमध्ये किमान एक तरी दवाखाना, ग्रंथालय, बगीच्या, विजेची योग्य सोय, पाणीपुरवठा, चांगले रस्ते आणि इंटरनेट ची गरज  याची माहिती लोकांना करून देऊन हे सुविधा उपलब्ध करून देणे. जेणेकरून  गावातील लोकांना करमणुकीच्या साधनांचा सोबत ज्ञान सुद्धा मिळेल.

गावा मध्ये कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने गावांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजे. जसं की पाणी आडवा पाणी जिरवा, स्वच्छ भारत अभियान, झाडे लावा झाडे जगवा, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी उपक्रमाच्या माध्यमातून गावांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्ते, तलाव हे लवकरात लवकर दुरुस्त करून घेत आहे याची व्यवस्था केली पाहिजे.बहुतेक गावांमध्ये आजही जुन्या हानिकारक परंपरा चालत आलेल्या आहेत.  अशा परंपरा बंद करण्यासाठी गावातील लोकांना जागृत केले पाहिजे.

मृत्यू भोज किंवा लग्न अशा कार्यक्रमासाठी पाण्यासारखा पैसा पाहिला जातो या पैशाचा उपयोग सदकामासाठी केला पाहिजे, याचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. यासाठी गावात गावामध्ये सहकारी बँकेची स्थापना करणे आवश्यक आहे.

एवढेच नव्हे तर ग्रामविकास करण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असलेला भाग म्हणजे गावाची पंचायत असते. त्यामुळे गावाची ग्रामपंचायती सुसज्ज असणे खूप महत्त्वाचे आहे. अशा ग्रामपंचायतीमध्ये खेड्यातील पूर्ण लहान समस्येचे निराकरण करण्याची क्षमता असायला हवी.

ग्रामीण दरिद्री आणि बेरोजगार समस्येवर मात करण्यासाठी गावांमध्ये लघु उद्योगाची स्थापना करणे गरजेचे आहे.  जेणेकरुन तरुण पिढी गावाकडे आकर्षित होईल याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.

पंचवार्षिक व सामुदायिक विकास योजनांमध्ये गाव सुधारणांना “Essay on Gramsudhar in Marathi”  याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. वास्तविक पाहता गावांमध्ये बरीच सुधारणा होणे अजूनही बाकी आहे. म्हणूनच ग्राम सुधारणा करण्यासाठी देशव्यापी प्रयत्न केले पाहिजे. खरंच ! खेड्यांचा विकास झाला तर भारताचा विकास नक्कीच होईल. जेव्हा भारतातील गावे चमकतील, तेव्हा भारताचे भाग्य चमकेल.

तर मित्रांनो ! ” ग्रामसुधार मराठी निबंध । Essay on Gramsudhar in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा.

” ग्रामसुधार मराठी निबंध । Essay on Gramsudhar in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment