गाय वर मराठी निबंध । Essay On Cow in Marathi Language
प्रस्तावना :
हिंदू धर्मा मध्ये ” गोमाता” म्हणून ओळखला जाणारा एक पाळीव प्राणी म्हणजेच ” गाय”.सर्वांच्या परिचयाची ही गाय भारतामध्ये सर्वत्र आढळते तर भारतातील ग्रामीण भागामध्ये अक्षरश: सर्वांच्या घरात एक पाळीव प्राणी म्हणून गाय सांभाळली जाते.
तसेच गाईला घरगुती प्राणी सुद्धा म्हणतात. भारता सोबत जगातील बहुतांश देशांमध्ये गाई चे अस्तित्व बघायला मिळते.
गाय वर मराठी निबंध । Essay On Cow in Marathi Language
गाईचे वर्णन :
साधारणत सर्वत्र बघितली जाणारी गाय ही पांढऱ्या रंगाची असते व तांबूस रंगाचे असते. गाई चे शरीर वजनदार असते. गाईला चार पाय, एक लांब शेपटी, दोन शिंगे असतात.
गाई चे वजन साधारणतः 500 ते 700 किलो असते. काही गाई त्यांच्या आकार आणि रंगांमध्ये भिन्नता आढळते. गाई मधील नराला बैल तर मादीला गाय म्हणून ओळखले जाते.
प्राचीन काळापासून गाय हा प्राणी बघायला मिळत आहे. आपले ऋषी- मुनी आश्रमात गाय पाळत असत. गाय ही अतिशय उपयुक्त प्राणी आहे.
भारतात हिंदू धर्मामध्ये लोक गाईला गोमाता म्हणतात व गाईची पूजा सुद्धा करतात. गाईपासून मिळणारे दूध हे आरोग्यास खूप पौष्टिक असते. गाय दिवसाला साधारण तीन ते चार लिटर दूध देते. व गाईचे दूध हे बहुउपयोगी मानले जाते. गायीचे मुत्र म्हणजेच गोमूत्र हे अनेक प्रकारे उपयोगात येते. गाईचे वजन हे साधारणतः ५०० ते ७०० किलोपर्यंत असते.
गाईचे वासरू :
गाय वर्षातून एकदा गर्भवती होते आणि एक लहान वासरू ला जन्म देते. गाई आपल्या वासरू ला चालायला आणि पळायला शिकवत नाही तर जन्मानंतर गाईचे वासरू स्वतः चालू व पळू लागते.
गाईचे वासरू हे काही महिन्यानंतर पर्यंत आपल्या आईचे दूध पिते व काही महिन्यानंतर आईसारखे अन्न खाण्यास चालू करते. गाईचा स्वभाव हा खूप शांत असल्याने मोठ्या प्रमाणात गाईला पाळीव प्राणी म्हणून सांभाळले जाते.
गाईचा आहार :
गाईला घरगुती प्राणी असे सुद्धा ओळखले जाते. भारतात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात यातील मनुष्याच्या उपयोगी चे काही प्राणी मोठ्या प्रमाणात पाळले जातात. त्यातील एक प्राणी म्हणजेच गाय आहे.
गाईचा प्रमुख आहार हा गवत आणि चारा आहे. त्याच प्रमाणे काही लोक गाईला कोंडा म्हणून एक प्रकारचे खाद्य सुद्धा आहार म्हणून खायला घालतात. तसेच गाय तृणधान्ये आणि इतर पदार्थ सुद्धा आहार म्हणून खात असते. ग्रामीण भागातील लोक गाईला भाकरी, पीठ, मका सुद्धा खायला घालतात.
मुख्यतः गाईला हिरवे गवत खायला खूप आवडते. दिवसभर शेतात चरून आल्याने सायंकाळच्या वेळी गाय दिवसभर खाल्लेल्या आहारा चे रवंथ करत असते. गाईला विशेष प्रकारचे खाद्य लागत नसल्याने तिला पाहण्यासाठी आर्थिक खर्च जास्त येत नाही. म्हणून गाई मोठ्या प्रमाणात पाळली जाते.
गाईचे उपयोग :
भारता मध्ये सामान्यता सर्वत्र आढळणारी ही गाय विविध प्रकारे आपल्याला उपयोगात फायदेशीर ठरते. आईच्या दुधाला अमृताचा दर्जा दिला जाते. गाईचे दूध हे शरीराला खूप पौष्टिक मानले जाते.
विशेषतः लहान मुलांना गाईचे दूध दिल्यास फायदेशीर ठरते तसेच गाईच्या दुधाचा वापर करून विविध खाद्य पदार्थ बनविले जातात. गाईचे दुध पिल्याने बुद्धी चपळ होतो. म्हणून गाईच्या दुधाला सर्वश्रेष्ठ मानले जाते.
गाईचे दुधापासून काय काय बनवतात ?
संपूर्ण जगभरात गाईच्या दुधापासून वेगवेगळे खाद्य पदार्थ तयार केले जातात. जसे की, मसाला दूध, दही, तूप, ताक, लस्सी आणि लोणी इत्यादी पदार्थ तसेच विविध प्रकारच्या मिठाई, पनीर अशा अजून किती तरी पदार्थ गाईच्या दुधापासून तयार करतात.
गायीचे दूध हे आपल्या आरोग्याला मजबूत आणि निरोगी बनविते. गायीचे दूध पिल्यास प्रतिकार शक्ती वाढली जाते. म्हणून गाईच्या दुधाला अमृत समजले जाते. तसेच गाईचे शेण हे सुद्धा विविध प्रकारे उपयोगात येते मुख्यतः गाईच्या शेणाचा उपयोग हा शेतामध्ये खत म्हणून केला जातो.
ग्रामीण भागातील लोक गाईच्या शेणाच्या चपट्या गोलाकार आकाराच्या भाकऱ्या करून उन्हात सुकवितात व नंतर पावसाळ्यात इंधन म्हणून वापर करतात तसेच ग्रामीण भागातील लोक याला गोवऱ्या असे म्हणतात.
तर काहीजण गाईच्या शेणाचा वापर करून ” गोबर गॅस” सुद्धा तयार करतात. तसेच गाईचे शेण हे झाडांना खत म्हणून घातले जाते. तसेच,
गाईचे गोमूत्र पिण्याचे फायदे :
गाईचे गोमुत्र हे खूप पवित्र मानले जाते. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने गायचे गोमुत्र उपयुक्त ठरते. गाईचे गोमूत्र हे अनेक रोगांवर मात करते. म्हणून आयुर्वेदात गायीच्या गोमूत्रा ला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
गाईचे महत्व ( हिंदू धर्मातील ):
हिंदू धर्मामध्ये गायला फार महत्त्वाचे स्थान आहे. कारण हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता समजले जाते व गाईची पूजा सुद्धा केली जाते. हिंदू धर्मात सर्वात जास्त पवित्र प्राणी असेल तर तो म्हणजेच गाय आहे.
हिंदू धर्मात गाय ही पवित्रतेची, संपन्नतेची आणि मांगल्याचे प्रतीक समजली जाते. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला खूप महत्त्वाचे स्थान आहे. जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथ ” ऋग्वेद” आहे. आणि त्यात गाईचे महत्त्व सांगणारा एक मंत्र आहे तो म्हणजेच असा…..
गाईचे मंत्र :
” माता रुद्रणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्थ नाभि: ।
प्र नू वोचं चिकितूषे जनाय मा गां आनागां आदितीं वधिष्ट ।। “
या मंत्रा मध्ये असे सांगितले आहे कि, जगातला प्रत्येक विचारशील पुरुषांनी गाई स माता, बहीण आणि कन्या असे समजले पाहिजे. गाईची हत्या कधीही करू नये.
प्राचीन काळातील राजे-महाराजे हे त्या काळातील ब्राह्मणांना सोने-चांदी सोबत गाई सुद्धा दान करीत. म्हणून गाईला सोन्या इतकेच मौल्यवान समजले जाते. व गाईची हत्या करणे हे पाप मानले जाते. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी मध्ये ” वसुबारस” या दिवशी गाईला अधिक पवित्र मानून तिची पूजा केली जाते व गायला नैवेद्य दाखविला जातो.
गायीच्या विविध जाती :
गाय हा प्राणी सर्व साधारण सर्वत्र आढळते. पण प्रत्येक ठिकाणानुसार, हवामाना नुसार गाईच्या शरीराची रचना वेगवेगळी असते. काही गाई जास्त दूध देतात तर काही खूप कमी प्रमाणात दूध देतात. यावरून गाईच्या अनेक जाती आढळतात त्या पुढील प्रमाणे आहेत.
१) गीर जातीची गाय :
ही गाय वर्षभरात सरासरी २१०० लिटर एवढे दूध देते. ही गाय मुख्यतः गुजरात राज्यातील जंगल परिसरात आढळते. या गाईचे आयुष्य साधारणता १५ वर्षे एवढे असते.
२) सहिवाल जातीची गाय :
ही गाय वर्षभरात सरासरी २१०० लिटर एवढे दूध देते. या गाईचा दूध देण्याचा कालावधी हा ३०० दिवसाचा असतो व ही या पंजाब राज्यात सर्वाधिक आढळते तसेच पाकिस्तान मध्ये ही या गाईचे वास्तव्य बघायला मिळते.
३) जर्सी गाय :
जर्सी गाय ला विदेशी जातीची गाय सुद्धा म्हटले जाते. या गायीचा आकार विदेशी गाय मधील सर्वात लहान असतो. ही गाय आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते.
कारण ही गाय वर्षभरात सरासरी ४००० लिटर येवढ्या मोठ्या प्रमाणात दूध देते. या गायचा जीवन काळ साधारणत १२ वर्ष असतो.
४) देवणी जातीची गाय :
देवणी या जातीच्या गाई ला देशी गाय म्हणून ओळखले जाते. ही गाय वर्षभरात सरासरी १,११० लिटर दूध देते. ह्या मुख्यतः आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या बीड व नांदेड जिल्ह्यात आढळतात. या गायचा जीवन काळा 14 वर्ष असतो.
५) सिंधी जातीची गाय :
ही गाय मुख्यतः पाकिस्तान व भारतातील हैदराबाद या ठिकाणी आढळते. ही गाय सरासरी २३०० लिटर एवढे दूध देते. या गाईचा जीवनकाळ हा साधारणता १५ वर्षे एवढा असतो.
गोहत्या बंदी :
वर्तमान काळात गोहत्याचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अलीकडे काही लोक गाईची हत्या करून गायीचे मांस खाऊ लागले आहेत.
गायीच्या या मांसाला इंग्रजी भाषेत ‘ बिफ’ असे म्हणतात. तसेच गाईच्या मांसा पासून अनेक वेगवेगळे खाद्यपदार्थ बनविण्याचा लालसे पोटी लोक गाईची हत्या करत आहेत. आणि गाईच्या हाडांपासून वेगवेगळ्या शिल्पकला व कृत्या बनविल्या जातात.
आज भारतात १ करोड ९० लाख गायी आहेत. असे एक रिपोर्ट नुसार बघायला आहे. व दिवसें दिवस ही संख्या कमी होत आहे. गाय ही आपल्याला विविध रूपाने उपयोगी येते. म्हणून गाईची हत्या करणे कायद्याने गुन्हा आहे.
सुलतानी राजवटीत मोहम्मद तुघल कापासूनच्या काळात गोहत्या बंदी हा कायदा काढण्यात आला आणि भारतातील महाराष्ट्र राज्यात 1976 पासून गोहत्या बंदीचा कायदा काढला होता.
तसेच भारतातील अनेक राज्यांत म्हणजेच उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यातही हत्या बंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 1994 मध्ये गोहत्या सोबतच बैलांच्या हात्ये विरोधात सुद्धा कडक कायदा करण्यात आला आहे.
गाईचे महत्व :
गाय ही आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे – म्हणून सर्वांनी गाईचा सन्मान केला पाहिजे. गाय आपल्याला सर्व प्रकारे उपयोगी पडते. खाद्य, औषध तसेच आर्थिक दृष्ट्या ही गाय महत्त्वाची आहे.
आणि हिंदू धर्मात ही गायला अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणून आपण गोहत्या थांबवली पाहिजे. आणि गाईच्या संख्येत वाढ करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य आपण जोपासले पाहिजे.