पर्यावरण प्रदूषण निबंध । Environment Pollution Essay In Marathi

पर्यावरण प्रदूषण निबंध । Environment Pollution Essay In Marathi

प्रस्तावना :

आपण मनुष्य जन्माला आल्या पासून मरेपर्यंत ज्या वातावरणामध्ये जगतो म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या परिसराला पर्यावरण असे म्हटले तरी चालेल माणसाचा आणि पर्यावरणाचा संबंध हा खूप जुना आहे.

पर्यावरण प्रदूषण निबंध । Environment Pollution Essay In Marathi

जेव्हा पासून या सृष्टीवर सजीव अस्तित्वामध्ये आले तेव्हा पासून ह्या पर्यावरणाचा महत्व पूर्ण घटक झाले. आणि असाच सजीव घटांमुळे पर्यावरण तयार झाले. पर्यावरणा मधील प्रत्येक सजीव हा एकमेकांवर अवलंबून आहे.

उदाहरणात :-

गवत -> किडे, डास -> बेडूक -> साप -> गरुड.

या पर्यावरणा मधील एक घटक जरी घेतला तर त्या घटकावर दुसरा जीव अवलंबून असतो. वरील उदाहरणांमध्ये दिसेल की गवतावर दुसरा जीव म्हणजेच किडे, डास आपली उपभोगता करतात व त्यांच्यावर बेडूक अवलंबून असतो व बेडकावर साप व सापावर गरुड अवलंबून असतो व ही साखळी असंच पुढे वाढत जाते.

याचाच अर्थ असा की या पर्यावरणातील प्रत्येक घटक हा खूप महत्त्वाचा आहे. या पर्यावरणातून मानवाला अनेक चांगल्या गोष्टी प्राप्त होत असतात व त्या सर्वांचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो.

असे म्हणतात, कि या पृथ्वी वर जर कोणी बुद्धिमान प्राणी असेल तर तो म्हणजे फक्त मानवच. कारण माणसाचे आपल्या बुद्धिमत्तेचा हवा तसा वापर उपयोग करून या पर्यावरणातील घटकाचा स्वतःला पाहिजे तसा उपयोग करून स्वतःचा विकास करून घेतला आहे.

परंतु त्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात झाला आहे. व त्याची परतफेड देखील आपण करू शकलो नाही. या पर्यावरणाने आपल्याला सर्व काही दिले व त्या बदल्यात त्याने मानवाकडे कधीच कुठल्या गोष्टीची मागणी केली नाही.

  • 1) पर्यावरणाची व्याख्या :

पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर, ज्या मध्ये आपण वावरतो, लहानाचे मोठे होतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी, झाडे- झुडुपे, पक्षी- प्राणी, डोंगर, नद्या, जमीन, पाणी आणि वायू या सर्व घटकांना मिळून पर्यावरण तयार होतो.

या सर्व गोष्टींचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करून घेत असतो म्हणून पर्यावरण हे आपल्या साठी खूप गरजेचे आहे.

  • 2) पर्यावरणात मिळणाऱ्या गोष्टी :

मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा यांची पूर्तता ही पर्यावरणामुळे होते. याच पर्यावरणा मधून आपल्याला जीवनाश्यक गोष्टींची पूर्तता होते. अन्न, पाणी व देखील आपल्या पर्यावरणा मधून प्राप्त होतो.

पर्यावरणातील अनेक घटकांचा उपयोग करून आर्थिक मदत देखील होते. इंधन, कोळसा, तेल, धातु इत्यादी. विविध प्रकारचे दगड याच पर्यावरणा मधून मिळतात.

अन्न आणि पाणी शिवाय काही दिवस जगू शकतो पण संपूर्ण सजीव सृष्टीला व मानवी जीवनाला जगण्यासाठी जो प्राणवायू लागतो त्या ऑक्सीजन याच पर्यावरणातील झाडांपासून मिळतो. म्हणून झाडे ही पर्यावरणातील सर्वात महत्वाची समजली जातात.

तसेच अनेक झाडांपासून रबर, फळे व अन्य औषधी सुद्धा तयार होतात. व लाकडांपासून दरवाजे, खिडक्या इत्यादी अनेक शोभेची सामान, कपाट हे याचं झाडांपासून मिळते.

आणि काही झाडांना उपयोग इंधन म्हणून उपयोग करतात कागद बनविण्यासाठी सुद्धा झाडेच उपयोगी पडतात.

अशा प्रकारे या पर्यावरणातील प्रत्येक घटकांचा उपयोग कुठल्या न कुठल्या स्वरूपाने आपल्या जीवनात होतो. व पर्यावरण ते आपल्या पर्यंत पोहोचविण्याचे काम करत असते.

  • 3) पर्यावरणाचा ऱ्हास :-

आजच्या या आधुनिक जगामध्ये मानव हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना दिसू लागला आहे. त्यामध्ये माणसाच्या गरजा, आशा, अपेक्षा खूपच वाढू लागल्या आहेत. स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो या पर्यावरणाला नुकसान पोहोचवत आहे.

अलीकडे वाढती लोकसंख्या त्यामुळे औद्योगीकरण कारखाने यामुळे या पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. कारखान्यांमधून निघणारे घाण तेल किंवा विषारी पाणी किंवा घटक असलेल्या सांडपाणी नद्या, नाल्यांमध्ये सोडून जल- प्रदूषण केलेले आहे.

तेच पाणी पुढे ग्रामीण भागातील लोक पिण्यासाठी, सांडपाण्यासाठी वापरतात त्यामुळे साथीच्या आजाराचे संकट समोर आले आहे.

वाढत्या शहरी करणामुळे वृक्षतोड केली जात आहे, त्यामुळे अनेक प्रकारचे प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग यांसारख्या समस्या आणि नैसर्गिक आपत्ती, त्सुनामी, भूकंप त्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

व वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली व तापमान वाढले त्यामुळे वाढता दुष्काळ, पावसाची अनियमितता व ऋतुचक्र देखील बदलले व पर्यावरणाचे संतुलन खराब झाले.

त्यामुळे जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि भूमी प्रदूषण अश्या या प्रदूषणाच्या समस्या उद्भवत आहेत. व अनेक नवनवीन रोग यांसारख्या समस्यांचे संकट समोर येत आहे.

आपल्या सर्व गरजा पूर्ण करणाऱ्या पर्यावरणाला मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करण्याच्या मार्गावर जात आहे.

  • 4) जंगली जन जीवन धोक्यात :-

या पर्यावरणामध्ये अनेक वेगवेगळ्या जातीचे, प्रकारचे प्राणी गुण्या- गोविंदाने राहतात. ज्या प्रमाणे मानवाला राहण्यासाठी अन्न, पाणी आणि निवारा लागतो.

त्या प्रमाणेच या पशु- पक्ष्यांना ही राहण्यासाठी घर लागते आणि जंगल हेच त्यांचे निवास स्थान आहे. काही प्राणी हे पाण्यामध्ये राहतात तर काही पशु पक्षी झाडांवर राहतात पण आज मानव वृक्षतोड, जंगल तोड करून नव्याने शहरे निर्माण करत आहे

त्यामुळे अनेक प्राण्यांच्या आयुष्य धोक्यात आले काही व काही पक्ष्यांची घरे नष्ट होऊन अनेक पक्ष्यांच्या जाती तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

आणि या वृक्षतोडीमुळे काही प्राणी जंगल सोडून मानवी वस्ती मध्ये येताना दिसत आहेत व मानवावर हल्ला केल्याचे बातम्या ऐकायला येत आहेत.

  • 5) जागतिक पर्यावरण दिवस :-

अलीकडे वाढत्या पर्यावरणाचा ऱ्हास याला लक्षात घेऊन व पर्यावरणाचे महत्त्व सर्वांना पटवून देण्यासाठी भारत सरकारने दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला आहे.

मानवाला या पृथ्वीवर आपले जन- जीवन नीट चालू ठेवायचे असेल तो त्याला पर्यावरणाची मौलिकता टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे बाब आहे. म्हणून या दिवशी सर्व लोकांमध्ये पर्यावरणा बद्दल जागृकता निर्माण केली जाते आणि पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले जाते.

असे केल्याने पर्यावरणाचा ऱ्हास, त्यातील घटकांचे नुकसान होऊ नये व भविष्यात येणाऱ्या पिढीला ही पर्यावरणातील सर्व गोष्टींचा उपभोग व्हावा या उद्देशाने भारत सरकारने ५ जून हा जागतिक ‘ पर्यावरण दिन’ म्हणून घोषित केला आहे. असे केल्यावर समाजामध्ये व लोकांमध्ये पर्यावरणा बद्दल आपुलकी वाटावी पर्यावरणाचे महत्त्व सर्व जनतेला कळावे.

जेव्हा या पृथ्वीवरील सर्व देश एकत्र व देशातील नागरिक एकत्र येऊन पर्यावरणा बाबतीत जागरूक होतील. सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व कळेल तेव्हा आपली पृथ्वी खऱ्या अर्थाने सुजलाम्- सुफलाम् होवू शकेल.

  • 6) पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी काय करावे ?

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्या देशातील एकतृतीयांश जनता शेतीवर अवलंबून आपले जीवन जगत आहे व शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.

अधिक उत्पन्न काढण्यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा व औषधांचा वापर बेसुमार केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीचा कस नष्ट होतच आहे पण त्याचा दुर्भाव मनुष्याच्या आयुष्यावर होऊन पर्यावरणाला धोखा होत आहे

मग शेतकऱ्यांनी ते रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर करावा त्यामुळे जमिनीची नापिकता कमी होऊ पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास आळा बसेल.

आणखी म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, जंगल तोड थांबवली पाहिजे त्यामुळे वन्य प्राण्यांचे जीवन संपुष्टात येणार नाही. व पावसाचे प्रमाण वाढून पर्यावरणाला मदत होईल.

प्रदूषणामुळे होणारे नुकसान होऊ नये म्हणून प्रदूषण कमी करण्याच्या मार्गावर लागले पाहिजे .

अर्थात सर्वांनी मी या पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. याचे भान ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती बेजबाबदारपणे वागल्यास त्याचे नुकसान संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागले तसेच पर्यावरणामधील

एखाद्या घटकाचे अस्तित्व नष्ट झाल्यास त्यावर अवलंबून असणाऱ्या दुसऱ्या घटकाचे आयुष्य आपोआप धोक्यात येते व त्याचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर व पर्यावरणावर होतो.

माणूस जरी या सजीव सृष्टी मधील इतर सजीवां पेक्षा बुद्धिमान असला तरी तो या पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे हे न विसरता आपल्या पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.

व या पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन वृक्ष लागवड करून त्याचे योग्य रीतीने संवर्धन केले पाहिजे. व इतरांनाही प्रोत्साहित करावे.

पर्यावरण वाचवा ! जीवन वाचवा ! देश वाचवा ! हा विचार करून आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करून त्यातील मिळणाऱ्या घटकांचा उपयोग योग्य तऱ्हेने करावा.


 ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !