दूरदर्शनचे फायदे व तोटे निबंध मराठी । Doordarshan Che Fayde Tote Marathi Nibandh
नमस्कार मित्रांनो आजच्या ” दूरदर्शनचे फायदे व तोटे निबंध मराठी । Doordarshan Che Fayde Tote Marathi Nibandh “ या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी दूरदर्शनचे फायदे व तोटे या विषयावर निबंध मराठी घेऊन आलोत.
दूरदर्शनचे फायदे व तोटे निबंध मराठी । Doordarshan Che Fayde Tote Marathi Nibandh
मित्रांनो आधुनिक काळाने खूप मोठी प्रगती केली आहे आपल्या आजूबाजूला विज्ञान आणि तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे मनुष्याला बहुतांश सुख सुविधा प्राप्त झाले आहे. मानवी जीवन अधिक सुखी आणि सोयीस्कर कसे करता येईल यासाठी सगळ्या सुविधा प्राप्त झाल्या आहेत.
पूर्वीच्या काळामध्ये मानवाच्या केवळ अन्न , वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा होत्या. परंतु आजच्या काळामध्ये मूलभूत गरजांमध्ये देखील भर घातली आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासोबत मोबाईल, इंटरनेट ,दूरदर्शन, दळणवळणाची साधने इत्यादी मानवाच्या मूलभूत गरजा बनल्या आहेत.
मनुष्याचा बौद्धिक स्तर वाढत गेल्या त्याप्रमाणेच मनुष्याच्या गरजा देखील वाढत गेल्या. आज आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा आणि सोय उपलब्ध असून सुद्धा मनुष्य संतुष्ट नाही.
मनुष्याने स्वतः सुखासाठी आणि सोयीसाठी वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावला. यामध्ये मनोरंजनासाठी साधने हा मनुष्याचा लावलेला एक प्रकारचा शोध आहे. दूरदर्शन ही मानवाने लावलेला एक प्रकारचा शोध असून आजच्या काळामध्ये दूरदर्शन हे एक उत्कृष्ट मनोरंजनाचे साधन बनले आहे. आज आपला समाजामध्ये एकही असे घर नसेल ज्या घरामध्ये दूरदर्शन नाही. प्रत्येक घराचा महत्त्वाचा सदस्य होण्याची भूमिका दूरदर्शन बजावत आहे.
इंग्लंडच्या बेसर्ड नामक शास्त्रज्ञाने १९२५ मध्ये याचा शोध लावला. भारतात दूरदर्शन १९५७ मध्ये आले. आणि एवढ्या कमी वेळामध्ये दूरदर्शन ने संपूर्ण जगाला व्यापले आहे आज गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाकडे आपल्याला दूरदर्शन पाहायला मिळते.
दूरदर्शन म्हणजे ज्याला Television किंवा Tv या नावाने ओळखले जाते. दूरदर्शन म्हणजे दूरचे दर्शन करीवणारा. दूरदर्शन आणि संपूर्ण जगाला व्यापले आहे दूरदर्शन च्या माध्यमातून आपण घरबसल्या जगभरातील कोणत्याही ऐतिहासिक ,धार्मिक ठिकाणाची किंवा देशाची माहिती प्राप्त करू शकतो.
विशेषता मनोरंजनाचे साधन म्हणून दूरदर्शन खूपच लोकप्रिय झाले आहे. साह्याने विविध चित्रपट ,मालिका, बातम्या, कार्टून्स किंवा इतर कार्यक्रम यांचे दर्शन होते. दूरदर्शन आणि स्त्रियांना तर अधिकच आकर्षित केले आहे.
दूरदर्शनाच्या साह्याने प्रसारित होणारे विविध चित्रपट, मालिका पाहण्यासाठी सर्वसामान्य मनुष्य अधिकच उत्साहात असतात.
दूरदर्शन मध्ये विविध चायनल असतात जसे की मालिकेचे चैनल, चित्रपटाचे चॅनल, कार्टूनचे चॅनेल, बातम्यांचे चैनल, भक्ती गीतांचे चॅनल, भजन कीर्तने या सर्व प्रकारच्या गोष्टी दूरदर्शन माध्यमातून पाहणे आणि ऐकणे शक्य झाले आहे. जगभरामध्ये रोजच्या रोज घडत असणाऱ्या घडामोडी सुद्धा दूरदर्शनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात.
दूरदर्शनचे बरेचसे फायदे आहेत जसे की दूरदर्शनाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला जातो दूरदर्शन मध्ये विविध असे चॅनेल आहेत जे विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट दृष्ट्या शिक्षण उपलब्ध करून देतात. स्त्रियांसाठी स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या कृती देखील दूरदर्शनाच्या माध्यमातून दाखवल्या जातात ज्ञानापासून ते स्वयंपाकापर्यंतच्या सर्व गोष्टी दूरदर्शनाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवल्या जातात इतकेच नसेल तर वेगवेगळ्या देशातील संस्कृती, सभ्यता, धर्म देखील दूरदर्शनच्या माध्यमातून कळते.
मनोरंजनाचे विविध कार्यक्रम दूरदर्शन वर दाखवले जातात जसे की गायन, नृत्य, एक्टिंग, चित्रकला ज्या मधून विद्यार्थ्यांमध्ये देखील नवीन कौशल्य निर्माण करण्याची वृत्ती निर्माण होते.
दूरदर्शन वर २६ जानेवारी, १५ ऑगस्टच्या कार्यक्रमांचे थेट प्रसारण केले जाते. दिल्ली येथील लाल किल्ल्यावर केले जाणाऱ्या 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी चे झेंडा ध्वजंचे थेट दर्शना सर्वसामान्य जनतेला दिले जाते. या व्यतिरिक्त शेतीविषयक, घरगुती चिकित्साविषयक, पशु जगत, गीत, संगीत, शास्त्रीय शोध, चित्रपट, सणांची माहिती, मुलांचे कार्यक्रम, योगाभ्यास इ. सर्व काही दाखविले जाते. देशभरामध्ये खेळले जाणारे वेगवेगळे खेळ दूरदर्शनाच्या माध्यमातून दाखवले जातात तसेच प्रसिद्ध व्यक्ती खेळाडू यांच्या मुलाखतीत दाखवल्या जातात.
आपल्या भारत देशातील वेगवेगळ्या भागामध्ये साजरे केले जाणारे वेगवेगळे सण उत्सव याचे देखील दर्शन दूरदर्शनाच्या माध्यमातून होते. अशाप्रकारे दूरदर्शन सर्वसामान्यांसाठी मनोरंजनाचे साधन तर आहेत त्यासोबतच दूरदर्शनातून वेगवेगळी कौशल्य आणि चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात.
परंतु मित्रांनो ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणेच दूरदर्शनाचे फायदे तर आहेतच सोबतच दूरदर्शनचे काही तोटे देखील आहेत. सतत दूरदर्शन कडे पहात राहिल्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. डोळ्याचे विकार, पाठीचा कणा दुखणे कंबर दुखणे यांसारखे आरोग्याचे विकार दूरदर्शन पाहण्याने होतात.
दूरदर्शन मुळे शारीरिक नुकसान तर होते सोबतच मानसिक स्थिती सुद्धा खराब होती. आजच्या काळामध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे. चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे गुन्हेगारी, मारहाण होऊन यांची नक्कल आजची तरुण पिढी करत आहे. चित्रपटांमधून दाखवली जाणाऱ्या अश्लीलतेला आजची तरुण पिढी बळी पडत आहे.
लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. मुले टीव्ही मध्ये दाखवले जाणारे जाहिराती, स्टंट यांची नक्कल करायला पाहतात.
अशाप्रकारे दूरदर्शनाचे वेगवेगळे तोटे आहेत.परंतु आपण दूरदर्शनचा वापर केवळ मनोरंजनासाठी शिक्षणासाठी आणि कौशल्य वाढविण्यासाठी केला असल्यास दूरदर्शन नक्कीच आपल्यासाठी वरदान ठरेल अन्यथा दूरदर्शन एक शाप ठरेल.
तर मित्रांनो, ” दूरदर्शनचे फायदे व तोटे निबंध मराठी | Doordarshan Che Fayde Tote Marathi Nibandh” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
ये देखील अवश्य वाचा :
- 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन मराठी निबंध । 15 August Essay in Marathi
- होम इन्शुरन्स घेण्याचे फायदे । Home Insurance ghyayche Fayade
- Loans For Students । शैक्षणिक कर्ज संपूर्ण माहिती
- सर्व फळांची नावे आणि माहिती मराठी । All Fruit Name in Marathi
- निरोगी अन्न खाण्याचे फायदे । Importance Of Healthy Food in Marathi