ज्ञानगंगा अभयारण्य माहिती । Dnyanganga Abhayaranya Information In Marathi

ज्ञानगंगा अभयारण्य माहिती । Dnyanganga Abhayaranya Information In Marathi

ज्ञानगंगा अभयारण्य माहिती । Dnyanganga Abhayaranya Information In Marathi : महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आपल्याला अभयारण्याचा परिसर बघायला मिळतो.

त्यातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले हे ज्ञानगंगा अभयारण्य जैवविविधतेने भरलेले आहे.

आज आपण याच ज्ञानगंगा अभयारण्य माहिती बघणार आहोत. ( Dnyanganga Abhayaranya Information In Marathi )

ज्ञानगंगा अभयारण्य माहिती । Dnyanganga Abhayaranya Information In Marathi

चला तर मग बघुया, काय आहे ज्ञानगंगा अभयारण्य माहिती Dnyanganga Abhayaranya Information In Marathi .

ज्ञानगंगा हे अभयारण्य महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात येते. बुलढाणा- खामगांव या राज्य मार्गात लागून असलेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ 205 चौरस किलो मीटर येवढे आहे.

ज्ञानगंगा अभयारण्याच्या क्षेत्रात असलेले बोथा हे गाव खूप जुने वनग्राम आहे. तसेच ते खामगाव, मोताळा आणि चिखली या तालुक्यात सुद्धा वसलेले आहे. या अभयारण्यातून ज्ञानगंगा नावाची नदी वाहत असल्याने या अभयारण्यास ज्ञानगंगा अभयारण्य नाव देण्यात आले.

निसर्गाने नटलेल्या ज्ञानगंगा या नदी वर माटरगाव या गावाच्या जवळ एक धरण बांधले गेले असून या धरण्यास ” ज्ञानगंगा धरण ” म्हणून ओळखले जाते.

बुलढाणा जिल्ह्यातीच्या सर्व भागातील वन्य प्राण्यांना अभय आणि संरक्षण व संवर्धनाच्या भूमिकेतून महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या निर्णयातून 9 मे 1997 मध्ये ज्ञानगंगा या अभयारण्याची स्थापना करण्यात आली.

  • ज्ञानगंगा अभयारण्यातील जैवविविधता :

ज्ञानगंगा हे अभयारण्य महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात स्थित आहे. ज्ञानगंगा नदीच्या परिसरात वसलेले हे अभयारण्य जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात येते. म्हणून या अभयारण्यात जैवविविधता बघायला मिळते.

या अभयारण्यातील हवामान हे उष्ण- मध्यम- थंड असल्याने येथे विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात त्यात आपल्याला साग, धावडा, मोहा, आवळा, मोईन, बिजा, अंजन, सालई, बेहडा, बेल, अशा प्रकारचे मोठे झाडे आढळतात.

तसेच हिवर, आपटा, खैर, पळस, लोखंडी आणि अमलतास अशा लहान प्रकारची झाडे आढळतात. तर वेलीमध्ये पिवळ वेल आणि धामण वेल या वेलींचा समावेश होतो. निगुडी, आमटी, रायमोनीय, बोराटी, भराटी, अशा प्रकारच्या झुडपांचा समावेश ज्ञानगंगा अभयारण्यात होतो.

  • ज्ञानगंगा अभयारण्यातील प्राणी जीवन :

जंगल परिसर आणि तेथून वाहणारी ज्ञानगंगा नदी यामुळे अभयारण्याच्या परिसरात वन्य प्राणी जीवन आढळते.

ज्ञानगंगा अभयारण्या सर्वात जास्त अस्वल या वन्य जीवाचा संचार आढळतो तसेच येथे बिबट्या, वाघ, हरिण, काळवीट, रानमांजर, तरस, लांडगा, रानडुक्कर, चौसिंगा, माकड, नीलगाय, कोल्हा असे विविध प्रजातींच्या वन्य प्राण्यांचा समावेश होतो.

तसेच ज्ञानगंगा अभयारण्यात सरपटणाऱ्या प्राण्या पैकी साप, मण्यार, धामण, नाग, सरडा, अजगर आणि घोरपड इत्यादी प्राणी आपल्याला आढळतात. ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसरात प्राण्यांसोबत पक्षांचाही संचार आहे.

त्यामध्ये घुबड, कबूतर, मोर, पोपट, पाणकोंबडी, खंड्या, सुगरण, सुतार पक्षी, तितर, टकाचोर, धोबी अशा किती तरी पक्ष्यांचे वास्तव्य ज्ञानगंगा अभयारण्यात आढळते. अशा प्रकारचे प्राणी जीवन आणि पक्षी जीवन या ज्ञानगंगा अभयारण्यात आपल्याला बघायला मिळते.

  • ज्ञानगंगा अभयारण्यातील पर्यटन :

ज्ञानगंगा या अभयारण्यात ग्रास लँड, लाख सिरा, धरण परिसर आणि ब्रिटिश कालीन तलाव असल्याने ही जंगलातील महत्त्वाची ठिकाणे बनली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने अनेक पर्यटक ज्ञानगंगा अभयारण्याचा परिसर बघण्यासाठी येतात.

छोटे- छोटे धबधबे, पाण्याचे निर्झर आणि आजू बाजूला पसरलेल्या विस्तीर्ण गवत यामुळे अभयारण्यातून फिरताना दिसणारे निसर्ग पर्यटकांना आकर्षित करते.

ज्ञानगंगा अभयारण्याचा जंगलातून फिरताना रस्त्याच्या कडेला गवतात नीलगाय बघायला मिळतात. बोथा या ठिकाणी वन विभागाने निर्णय केलेले नक्षत्र निसर्ग प्रेमींना पाहण्या सारखे ठिकाण आहे.

या ठिकाणी वनविभागाने दुर्मिळ जातींच्या झाडांची लागवड केलेली आहे. तसेच बांबू पासून बनविलेल्या कुटी येथे बांधलेल्या आहेत. तसेच लहान मुलांसाठी बांधलेले झोके, वनकुटी, टेहळणी मनोरा पाहण्या सारखे आहेत. यामुळे ज्ञानगंगा हे अभयारण्य पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

  • ज्ञानगंगा अभयारण्यात जाण्याचा मार्ग :

ज्ञानगंगा अभयारण्याला भेट देण्याचे योग्य काळ हे 1 ऑक्‍टोबर ते 15 जून हा आहे. या अभयारण्यात जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. या अभयारण्याच्या जवळचे बस स्थानक खामगाव, बुलढाणा हे आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment