धोडप किल्ला मराठी माहिती । Dhodap Fort Information In Marathi

धोडप किल्ला मराठी माहिती । Dhodap Fort Information In Marathi

धोडप किल्ला मराठी माहिती । Dhodap Fort Information In Marathi धोपड हा महाराष्ट्र राज्यात असलेल्या नाशिक या जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

आज आपण याच किल्ल्या बद्दल ची माहिती बघणार आहोत. ( धोडप किल्ला मराठी माहितीDhodap Fort Information In Marathi )

चला तर मग बघुया ” Dhodap Fort Information In Marathi  ”

धोडप किल्ला मराठी माहिती । Dhodap Fort Information In Marathi

धोडप हा किल्ला महाराष्ट्रातील किल्ल्यांमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला आहे. धोडप किल्ला चांदवड पासून उत्तर पश्चिमेला सुमारे 28 किलो मीटरवर आहे. धोडप किल्ला म्हणजेच चांदवड रांगेतील सर्वात उंच व महत्त्वाचा डोंगर आहे. धोडप हा शिवलिंगा प्रमाणे दिसणारा ऐतिहासिक किल्ला आहे.

या धोडप किल्ल्यावर सोनारवाडी, अलंग आणि गोवळवाडी अशा तीन आदिवासी जमातीच्या वस्त्या आजही अस्तित्वात आहेत. धोडप किल्ल्याची उंची ही सुमारे 1,566 मीटर म्हणजे 5,141 फूट येवढी उंच अशा हा धोडप किल्ला आहे.

सर्वात जास्त उंची सोबतच 945 हेक्टर येवढ्या मोठ्या परिसरात हा किल्ला पसरलेला आहे. कळवण, चांदवड आणि दिंडोरी अशा तीन तालुक्यांच्या क्षेत्रात हा धोडप किल्ला पसरलेला दिसेल.

  • धोडप किल्ल्याचा इतिहास ( Dhodap Fort History in Marathi ) :

धोडप या किल्ल्याला बर्बन निजामशहाच्या काळात ” धोडपावनकी ” या नावाने सुद्धा ओळखले जात असत. ब्रिटिशयाच्या काळात ह्या किल्ल्याला ‘ धरप ‘ असे म्हणत.

धोडप हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारामध्ये येतो तर ह्या किल्ल्याची स्थापना ही 1046 मध्ये झाली असावी. धोडप किल्ल्याची सध्याची अवस्था ही जीर्ण असल्याचे दिसून येते. इ.स. 1635 मध्ये हा धोडप किल्ला मुगल सरदार अल्लाह दी बनला स्वाधीन झाला होता.

मुस्लिमांचा राज्यानंतर हा धोडप किल्ला मराठ्यांच्या हाती गेला व मराठी साम्राज्यांनी या किल्ल्याला नाशिकच्या महत्त्वाच्या किल्ल्यांमध्ये सामील केले.

धोडप किल्ल्यावरील एक महत्त्वाची घटना म्हणजे राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामुळे धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. धोडप या किल्ल्याच्या ठिकाणीच राघोबा दादा आणि पेशवे यांच्या मध्ये दिलजमाई झाली होती.

त्यानंतर पुढे इ.स. 1818 मध्ये हा धोडप किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज यान मराठ्यांवर आक्रमण करून हा किल्ला जिंकून घेतला व या ब्रिग्ज याने ” खडकाळ स्वरूपातला मोठा डोंगर, जो चांदोर रांगेतील मजबूत बांधणीचा किल्ला आहे “. असे म्हणत ब्रिग्ज याने धोडप किल्ल्याचे वर्णन केले आहे.

धोडप या डोंगरात उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये नेत्रावती आणि कोलधी या नद्यांचा समावेश होतो.

  • धोडप किल्ल्याचा इतिहास निर्देश :

सुरूवातीला हा धोडप किल्ला इ.स. 1550 मध्ये बुन्हाण निजामशहा याच्याकडे होता. कित्येक वर्षे त्याचे धोडप किल्ल्यावर राज्य केले.

त्यानंतर इ.स. 1635 मध्ये अल्लावदी खानने हा किल्ला जिंकला व पुढे पेशव्यांच्या कारकिर्दीत पेशव्यांनी हा किल्ला पेशव्यांनी घेतला. रघुनाथ पेशवे यांनी इ.स. 1778 मध्ये धोडपच्या किल्ल्यातच आश्रय घेतला होता. व पुढे इ.स. 1818 मध्ये इतर गडाप्रमाणेच हा धोडपचा किल्ला सुद्धा इंग्रजांनी त्यांच्या ताब्यात घेतला.

  • धोडप किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :

धोडप किल्ल्यावरील काही ठिकाणी ही पर्यटकांना बघण्यासाठी महत्त्वाची आहेत.

धोडप किल्ल्यापासून चांदवड, इंद्राई, साडेतीन रोडगा, राजदेहेट, कांचन, मंचन, विखारा, कन्हेरा, खळ्याजवळ्या, सप्तशृंगी, अहीवंतगड, अचला अशी सातमाळा पाहायला मिळते. दक्षिणेकडील विस्तृत प्रदेश सुद्धा बघायला मिळतो. धोडप किल्ल्याहून साल्हेर सालोटा तसेच चौल्हेरचे सुद्धा दर्शन होते.

धोडप किल्ल्याची उंची जास्त असल्याने या ठिकाणाहून 25 किल्ले दिसतात. धोडप किल्ल्यावर सुळका आहेत. आणि या सुळक्याच्या मागील बाजूस एक मोठी मानवनिर्मित गुहा व काही पाण्याची टाकी आहेत. आणि या सुळक्याला फेरी सुद्धा मारता येते.

  • धोडप किल्ल्यावर जाण्याचा मार्ग :

धोडप हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. नाशिक पासून या किल्ल्याला जाण्यासाठी बसेस आणि खाजगी वाहनांची सेवा उपलब्ध आहे. तसेच आणखी एक मार्ग म्हणजे धोडप किल्ल्याच्या पायथ्याला धोडांबे नावाचे गाव आहे. व हे गाव नाशिकला गाडीमार्गाने जोडले आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment