सायकलची आत्मकथा मराठी निबंध । Cycle Chi Atmakatha Marathi Nibandh

सायकलची आत्मकथा मराठी निबंध । Cycle Chi Atmakatha Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” सायकलची आत्मकथा मराठी निबंध । Cycle Chi Atmakatha Marathi Nibandh “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

सायकलची आत्मकथा मराठी निबंध । Cycle Chi Atmakatha Marathi Nibandh

मी आहे सायकल ! काही लोक मला दुचाकी या नावाने ओळखत असले तरी सर्वसाधारणपणे मला सर्वजण सायकलच म्हणतात.

माझा जन्म कधी झाला हे मला नक्की आठवत नाही पण काही शोधांच्या पुराव्यावरून माझा जन्म 1990 ला फ्रान्स देशातील एम. डी. सिव्हर्क यांच्या हस्ते त्यानंतर 1876 सली एउ.ज.लाॅसन यांनी मला गती मिळावी म्हणून साखळीची दंततबकडी बसवली. माझ्या गतीवर झाला नाही मला खरा वेग आला रबरी टायर यामुळे.

ज्यावेळी माझा नवीन नवीन शोध लावला त्यावेळी माझा प्रचार आणि प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. या जगातील असा एकही देश नाही जिथे माझा वापर केला जात नाही.

लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्याचे लाकडी घोडा असले तरी दुसरे वाहन हे हमखास मीच असते. मुल चालायला लागले किंवा थोडेसे मोठे झाले की, आई-वडील आपल्या मुलाला सायकल हमखास आणून देतात. या मागचे कारण माहिती आहे का?

एकतर माझी किंमत ही खूप माफक असते, त्यात अपघाताची शक्यता तर अगदी कमी! मुले सुरुवातीला मला चालवण्यासाठी पडतील तरी त्यांना थोडेसे खरचटेल थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी सुद्धा होईल. मात्र एकदा तुम्ही आत्मविश्वासाने मला चालवायला शिकलात तर तुमची आणि माझी संगत कायमची जुळते.

असे म्हणतात की मोठे वाहन चालवण्यासाठी सुरुवातीला सायकल यायलाच हवी. त्यामुळे लहान मुलांना सर्वप्रथम सायकल शिकवली जाते.

एकदा का तुम्ही सायकल शिकला, ती घरातील लहान लहान कामे करण्यासाठी आणि बाहेरून कुठलीतरी वस्तूं आणण्याकरिता तुम्ही माझा उपयोग अतिशय सोयीस्कर रित्या करू शकता.

कधी भाजीपाला, कधी दुकानातून दूध, कधी आजोबांच्या औषधाच्या गोळ्या अशी लहान छोटी मोठी कामे माझ्यामुळे पटापट होऊ शकतात.

साठी कार-बाइक चालवायचे असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. परंतु मला चालवण्यासाठी कुठल्याही चालक परवानाची मुळीच गरज भासणार नाही.

लहान मुला मुली पासून ते वयस्कर आजी-आजोबा पर्यंत कोणीही मला सहज रित्या चालू शकतो आणि कधी आडरस्त्यात मी पंक्चर झाले तर, मला सहजरीत्या हातात धरून आणायला काहीही अवघड नाही, कारण मी सडपातळ आणि वजन आणि खूप हलकीफुलकी असते.

इतर वाहनांचा म्हणजे कार बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य आहे. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचे कार्य असेल तर त्यांचा वापर जरूर करावा. पण शाळेला, बाजाराला, घरातील काही लहान गोष्टी आणण्यासाठी एवढ्या वेगाचे आणि कार बाईक ची काय गरज?

अशावेळी तुम्ही सहजरीत्या माझा वापर करणे फायद्याचे ठरू शकते. माझा वापर हा तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने लाभदायक आहे. मी वैयक्तिक आणि सामाजिक दृष्ट्या तुम्हाला लाभदायी ठरते.

कसे ते सांगते. हे पहा, तुम्ही नियमितपणे मला चालवला तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. जर रोज सकाळी घ्या मेपर्यंत मला चालवल्याने तुमची अधिक कार्यक्षम होतात, तसेच तुमच्या माणूस सुद्धा तंदुरुस्त राहतात. च्या शरीरातील जास्त असलेले मी जळून जाते व प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा.

याशिवाय माझे बरेच फायदे आहेत. ते म्हणजे माझी किंमत ही फार कमी असते. त्यामुळे तुमचे पैसे तर वाचतातच. शिवाय गरीब लोकांना सुद्धा मी सहजरीत्या उपलब्ध होऊ शकते.

कधी पडलात माझ्यातील काही भाग खराब झाले तर ते दुरुस्त करण्यासाठी जास्त खर्च लागणार नाही कमी पैशांमध्ये तुम्ही मला पुन्हा दुरुस्त करू शकता.

तसेच मला चालवण्यासाठी महागड्या पेट्रोल-डिझेलची गरज भासणार नाही. त्यात ही तुमचे पैसे वाचतात. यामुळे इंधन बचत होते. वैयक्तिक दृष्ट्या मी तुमच्या सर्वांसाठी लाभदायी आहे त्यासोबत समाजासाठी आणि देशासाठी सुद्धा मी एक प्रकारे सहकार्य करते ते कसे पहा.

आपल्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते त्यामुळे आपल्याच अद्दल परदेशात जाते. याशिवाय त्यांचे भाव देखील गगनाला भिडलेल्या आहेत. पेट्रोल-डिझेल सहजरीत्या खरेदी करणे शक्य नाही.

परंतु आपल्या आसपास असे अनेक वाहने आहे जे असा पेट्रोल-डिझेल यांचा वापर करतात आणि या वाहनातून कार्बन-डाय-ऑक्‍साईड सारखा घातक वायू वातावरणात सोडला जातो त्यामुळे वायू प्रदूषण वाढते. वाढती वाहनांच्या संख्येमुळे वायुप्रदूषण होते त्यासोबत वाहतूक कोंडी सुद्धा होते. शहरात वाहतूक कोंडीच्या समस्या जीवघेण्या ठरत आहेत.

अशा परिस्थितीमध्ये वाहने वापरणे योग्य आहे का? मी आहे की भांडे वापरणे योग्य आहे परंतु ते जास्त अंतर पार करायचे असेल तर आपण कार-बाइक यांसारख्या वाहनांचा उपयोग करू शकतो परंतु शहरातल्या शहरात किंवा जवळच्या भागामध्ये फिरायचे असेल तर आपण अगदी आनंदाने माझा वापर करू शकता. याशिवाय माझ्यामुळे वातावरण दूषित होणार नाही. तसेच पेट्रोल आणि डिझेलची कमतरता देखील भासणार आहे.

जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पॅरिससारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात.

एवढेच नसून आज आधुनिक जग जसे बदलत चालले आहे त्याप्रमाणे या आधुनिक जगात मी देखील बरीच आधुनिक झाले. वेगवेगळ्या रूपांमध्ये मी तुम्हाला भेटू शकते. मुळची मी बिनगिअरची पण आता मला गिअर पण आले शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी केली अन् पर्यटकांसाठी वेगळी.

तुमची जशी आवड तशी माझी निवड !

तर मित्रांनो ! ” सायकलची आत्मकथा मराठी निबंध । Cycle Chi Atmakatha Marathi Nibandh “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स ( Points ) राहिले असतील तर कमेंट ( Comment ) करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment