चंद्र उगवला नाही तर निबंध मराठी । Chandra Ugavala Nahi Tar

चंद्र उगवला नाही तर निबंध मराठी । Chandra Ugavala Nahi Tar

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” चंद्र उगवला नाही तर निबंध मराठी । Chandra Ugavala Nahi Tar Marathi Nibandh “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

चंद्र उगवला नाही तर निबंध मराठी । Chandra Ugavala Nahi Tar

निसर्गामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत जा आपले जेवणासाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यातीलच एक म्हणजे चंद्र होय. चंद्राचे सौंदर्य हे अप्रतिम आहे शब्दात न व्यक्त करणारे आहे.  रात्रीच्या काळोखाला दूर करण्यासाठी चंद्राचा प्रकाश हा खूप महत्त्वाचा ठरतो. अनेक कलाकारांनी कवीने आपल्या कलाकृतीतून चंद्राचे सौंदर्य अतिशय उत्तम अशा शब्दांमध्ये मांडले आहे.

प्रत्येक निसर्गप्रेमी चा किंवा कलाकारांची आवडती गोष्ट म्हणजे चंद्रच असते. रात्रीच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आकाशामध्ये दिसणारे चंद्रा आणि चांदण्याचे चित्र मनाला मोह करणाऱे असते.

जर असा सुंदर आणि मनाला मोहित करणारा चंद्र उगवला नाही तर….?

चंद्र उगवला नाही तर? चंद्रा शिवाय रात्र सुंदर कशी बनणार? चंद्रा सेवा आकाशाच्या सौंदर्याचे काय होईल? रात्रीच्या काळोख्या ला दूर करणारा प्रकाश कोठून येईल?

चंद्र उगवला नाही तर संपूर्ण सृष्टी कधी पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशाचे आणि सुंदरतेचा  अनुभव घेऊ शकणार नाही. चंद्र   प्रकाशाचा आनंद कधीही घेता येणार नाही.

साहित्यामध्ये शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर चंद्र उगवला नाही तर चंद्राच्या सौंदर्याचे साहित्यामध्ये वर्णन कसे केले जाणार. चंद्र नसता तर साहित्य आणि सौंदर्याच्या जग ओसाड झाले असते.

कवींच्या कल्पनाशक्ती ना आणि भावनांना चंद्रामुळे जागृती आणि चालना मिळते. चंद्रापासून प्रेरणा मिळाल्याने जगात कित्येक साहित्य आणि कविता लिहिलेल्या आहेत. आणि भविष्यामध्ये अशा कितीतरी कविता लिहिल्या जातील.

आकाशात चंद्र आहे म्हणून ” चंद्रवदनी “ आणि ” चंद्रमुखी “ नायकांची कल्पना केली जाते. चंद्र पाहून आपण आपले सर्व दुःख विसरुन चंद्राच्या  सौंदर्यामध्ये रमून जातो. एकादाच्या चारित्रात किंव्हा रुपात काहीतरी व्यक्तिमत्व दिसल्यास त्यांना चंद्रावरील डागाची उपमा दिली जाते.

जरी आपल्याला कुठे तरी प्रवास करावा लागला तरी सर्वजण प्रथम चंद्र कोणत्या  स्थितीमध्ये आहे हे बघून पुढचा प्रवास करतात. त्याप्रमाणे एखाद्या मुलीच्या कुंडलीमध्ये चंद्रबळ असल्यास अशुभ मानले जाते.  चंद्राच्या वेगा वरूनच हिंदू आणि मुस्लिम धर्माचे पंचांग तयार होतात. त्यामुळे जर चंद्र उगवला नसता तर या सर्व गोष्टी कशा घडल्या असत्या?

तसेच आपल्या इथे चंद्र आणि समुद्राचे अतूट नाते समजले जाते. चंद्र हे समुद्राच्या भरतीची प्रेरणा देखील आहे. जर हे घडलेच नसते तर समुद्राची भरती आणि ओहोटी ची कल्पना कशी झाली असती.

त्याप्रमाणे आपल्या येथे चंद्राच्या गतीनुसार अमावस्या आणि पौर्णिमा होताना दिसतात. मग हा चंद्र उगवला नसता तर आपल्याला पौर्णिमा आहे हे कसे कळाले असते. त्यामुळे  अमावस्या आणि पौर्णिमा या चंद्रावर अवलंबून आहेत. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये चंद्राला महत्त्वाचे स्थान आहे.

त्याप्रमाणेच चंद्रा  शिवाय काळा कृष्ण पक्ष किंवा प्रकाशमान शुल्क पक्ष नसता. चंद्र उगवला नाही तर चंद्रग्रहणाची माहिती आपल्याला झालीच नसते. आणि चंद्र ग्रहणा संबंधी माहिती भूगोलाच्या पुस्तका मध्ये वाचायला मिळाली नसती.

तसेच चंद्रामुळे जगातील सर्व शास्त्रज्ञाच्या बुद्धीला चालना मिळाली. चंद्र जगातील सर्व शास्त्रज्ञ साठी एक चांगला उपकारक बनला आहे. त्यामुळे चंद्र उगवला नसता तर अमेरिकन आणि रशियाच्या सरांना त्यांच्या कौशल्य  दाखवण्याची  सुवर्णसंधी प्राप्त झाली नसती.

त्याप्रमाणे चंद्र उगवला नसता तर चंद्रयानाच्या शोधांमध्ये अनेक पैसे खर्च झाले ते पैसे खर्च झाले नसते. इतकेच नव्हे तर विविध देशाने चंद्रावर काय आहे हे पाहण्यासाठी चंद्र यान पाठवले आहेत. मग चंद्र उगवला नसता तर एवढे सगळे होणे शक्य झाले असते का?

आजच्या आधुनिक जगातील शास्त्रज्ञांची चंद्रावर यान पाठवून चंद्रावरील भूमी सुद्धा पाहिजे आहे. असे म्हणतात की, प्रत्यक्षात चंद्र इतका सुंदर नाही इतका कवयित्री आणि लेखकाने त्याच्या वर्णन केले आहे.

परंतु विज्ञानाने काही सांगितले तरी चंद्र हा चंद्र राहील.  चंद्राचे सौंदर्य हे सर्वसामान्यांसाठी अप्रतिम आहे आणि ते पिढ्यानपिढ्या अप्रतिमच राहील. त्यामुळे चंद्र हा आपल्या पृथ्वी साठी खूप महत्वाचा आहे.  त्यामुळे चंद्र उगवला नाही तर हि कल्पना डोक्यात घालून घेण्यापेक्षा चंद्राच्या अप्रतिम सौंदर्याचे आणि चंद्र आणि मानव यांच्यातील संबंध जाणून घेऊन चंद्र आपल्या निसर्गासाठी किती गरजेचा आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो ! ” चंद्र उगवला नाही तर निबंध मराठी । Chandra Ugavala Nahi Tar “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” चंद्र उगवला नाही तर निबंध मराठी । Chandra Ugavala Nahi Tar “  यामध्ये आमच्याकडून काही  पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment