चांदोली अभयारण्य मराठी माहिती । Chandoli Sanctuary Marathi Information
चांदोली अभयारण्य मराठी माहिती । Chandoli Abhayaranya Information in Marathi : आज आपण महाराष्ट्रातील अभयारण्यांपैकी चांदोली या अभयारण्याची माहिती बघणार आहोत.
चला तर मग बघुया काय आहे चांदोली अभयारण्य मराठी माहिती Chandoli Abhayaranya Information in Marathi .
आणि चांदोली अभयारण्याचा वन्यजीवन देखील आज आपण पाहणार आहोत. ( Chandoli Abhayaranya Information in Marathi ).
चांदोली अभयारण्य मराठी माहिती । Chandoli Abhayaranya Information in Marathi
Table of Contents
चांदोली हे अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा आणि सांगली या चार जिल्ह्यामध्ये पसरलेले आहेत. पश्चिम घाट क्षेत्रामध्ये असलेल्या वारणा धरणाच्या जलाशय परिसरातील हे चांदोली अभयारण्य महत्त्वाचे आहे.
वन्यजीवांचे संरक्षण आणि त्यांना आश्रय देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने 15 सप्टेंबर 1985 रोजी चांदोली अभयारण्याची स्थापना केली. चांदोली अभयारण्यात एकूण 32 गावांचा समावेश होतो.
या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ 308.97 चौरस किलो मीटर येवढे आहे. हे अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. तसेच या अभयारण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. 2004 मध्ये आला राष्ट्रीय उद्यान म्हणून दर्जा मिळाला.
चांदोली अभयारण्याचे क्षेत्र हे सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील डोंगर- टेकड्यांचे व दऱ्याखोर्यांनी व्याप्त आहे. समुद्र सपाटीपासून या डोंगरांची उंची ही सुमारे 500 मीटर ते 900 मीटर इतकी आहे.
पश्चिमेकडील सीमा ह्या सह्याद्रीच्या उंच कड्यांच्या असून येथे वार्षिक पर्जन्यमान हे सरासरी 3000 ते 5000 मिलि मीटर ऐवढे आहे. या अभयारण्याच्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने इथली जंगले आणि परिसर हिरवागार आणि घनदाट झाडींचा आहे.
चांदोली अभयारण्यातील वन संपत्ती :
चांदोली अभयारण्यामध्ये उष्णकटिबंधिक निमसदाहरित. सदापर्णी वृक्षांची जंगले आहेत. या अभयारण्यातील झाडांची उंची हे साधारणता 10 ते 15 मीटर एवढी आहे.
हिरडा, गेळा, करंज, पीसा, चांदाडा, जांभूळ, आवळा, वारंग, पांगारा, धायटी, फणस, वाघाटी, आंबा, आपटा, अर्जुन सादडा, खरसिंग, सर्पगंधा, धायटी, आंबाडा, उंबर, हिरडा, ऐन, बेहडा, पांगारा अशी मोठी वृक्ष चांदोली अभयारण्यात आढळतात. अडुळसा, कढीलिंब, शिकेकाई, तमालपत्र अशी वन औषधी वनस्पती या अभयारण्यात आढळतात.
या व्यतिरिक्त करवंद, कारवी, निरगुडी, वाघाटी, तोरण, रानजाई, मुरुड शेंग इत्यादी झुडपे चांदोली अभयारण्यात आढळतात. तसेच चांदोली अभयारण्यात गवताचे ही प्रकार आढळतात त्यामध्ये कराड, कोळंब, डोंगरी, फुल, तांबड आणि कुसळ यांचा समावेश होतो.
चांदोली अभयारण्यातील प्राणीजीवन :
चांदोली अभयारण्यामध्ये विविध प्रकारचे वन्यजीवन आढळते त्यामध्ये पट्टेवाला वाघ, बिबट्या, अस्वल, रान डुक्कर, कोल्हे, गवे, वानर, सांबर, वानर, सायाळ, ससे, भेकर, रानकुत्री, खवले मांजर, शेकरू, हरिण अशा वन्यजीव प्राण्यांचा समावेश या अभयारण्यात होतो.
तसेच सरपटणारे प्राणी सुद्धा येथे आढळतात. त्यामध्ये साप, नाग, धामण, अजगर आणि इतर कीटक हे प्राणी चांदोली अभयारण्यात आढळतात.
चांदोली अभयारण्यातील पक्षी :
प्राण्यांप्रमाणेच पक्ष्यांचा ही संचार चांदोली अभयारण्यात बघायला मिळतो त्यामध्ये गरुड, ससाणे, रानकोंबड्या, घारी, खंड्या असे शिकारी पक्षी आढळतात.
तसेच घुबड, चंडोल, पिंगळा, कोकीळ, स्वर्गीय नर्तक, पावश्या चातक, मैना, होले, मोर, सातभाई, भारद्वाज, महाधनेश, राखीधनेश, रातवा, सुभग असे अनेक प्रकारचे पक्षी चांदोली अभयारण्यात आढळतात. तसेच चांदोली या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या अभयारण्यात विश्लेषक फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती येथे बघायला मिळतात.
चांदोली अभयारण्यातील पर्यटन :
चांदोली हे अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे अभयारण्य असल्याने येथे विविध प्रकारची जैवविविधता आढळते.
त्यामुळे या अभयारण्यास भेट देण्यासाठी विविध निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमी या ठिकाणी पर्यटनासाठी येतात. पर्यटकांच्या दृष्टीने पश्चिम घाटामधील घनदाट व हिरवेगार जंगल,
चांदोली धरण, वसंतसागर, धबधबा, जलाशय, प्राचीन किल्ले, भैरवगड अशी ऐतिहासिक प्रसिद्ध ठिकाणी या ठिकाणी असल्याने हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे. तसेच सह्याद्रीच्या माध्यावरून कोकणामध्ये जाण्यासाठी येथे शिड्या आहेत. त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षण आहे तसेच चांदोली अभयारण्यात वन्य प्राणी
आणि पक्षी निरीक्षणासाठी झोळंबी, खदलापूर, चांदेल या ठिकाणी मनोरे बांधण्यात आल्यामुळे येथे पर्यटकांची उत्तम सोय आहे. या मनोऱ्यावरून विविध प्रकारचे सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते.
चांदोली अभयारण्यात जाण्यासाठी आपल्याला मणदुर तालुका, शिराळा, जिल्हा सांगली या गावातून जावे लागते. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामधील मौजे उदगिरी या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला चांदोली अभयारण्यात जाता येते.
पर्यटकांना चांदोली अभयारण्यात जीपने आणि लॉन्चने प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे.
चांदोली अभयारण्यात कसे जावे :
चांदोली या अभयारण्यास भेट देण्याचा उत्तम कालावधी हा जानेवारी ते मे या महिन्या दरम्यानचा आहे. या अभयारण्यास भेट देण्यासाठी आपण खालील मार्गाचा उपयोग करू शकतो.
विमानातून जाण्याचा मार्ग :
चांदोली या अभयारण्यापासून जवळचे विमानतळ आहे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. चांदोली पासून ते सुमारे 78 किलो मीटरच्या अंतरावर आहे.
रेल्वेतून जाण्याचा मार्ग :
चांदोला या अभयारण्यापासून जवळचे विमानतळ हे कराड येथे आहे. चांदोली पासून ते सुमारे 55 किलो मीटरच्या अंतरावर आहे.
रस्त्यावरून जाण्याचा मार्ग :
कराड- चांदोली, इस्लामपूर- चांदोली, कोल्हापूर- चांदोली अशा महामार्गानी आपण चांदोली अभयारण्यास जाऊ शकतो.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- बोर अभयारण्य माहिती
- भीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी
- माळढोक पक्षी अभयारण्य माहिती
- चंदन वंदन किल्ला ची माहिती
- अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी
धन्यवाद मित्रांनो !