चंदन वंदन किल्ला ची माहिती । Chandan Vandan Fort Information in marathi

चंदन वंदन किल्ला ची माहिती । Chandan Vandan Fort Information in marathi

चंदन वंदन किल्ला ची माहितीChandan Vandan Fort Information in marathi : महाराष्ट्रातील एकमेव जोडकिल्ला म्हणजेच हा चंदन- वंदन किल्ला होय.

आज आपण याच चंदन वंदन किल्ला ची माहिती सविस्तर मध्ये बघणार आहोत. आणि चंदन वंदन किल्ल्याचा इतिहास देखील आज आपण पाहणार आहोत ( Chandan Vandan Fort Information in marathi ).

चंदन वंदन किल्ला ची माहिती । Chandan Vandan Fort Information in marathi

चला तर मग बघुया ” चंदन वंदन किल्ला ची माहिती ( Chandan Vandan Fort Information in marathi )मराठी मध्ये “.

महाराष्ट्र राज्यात सह्याद्री पर्वताची एक शाखा म्हणजे महादेव डोंगर आणि याच डोंगरामध्ये चंदन वंदन हे किल्ले वसलेले आहेत.

चंदन या किल्ल्यापेक्षा वंदन किल्ला थोडा उंच आहे. वंदन गड किल्ला पाच टप्प्यात विभागला आहे तर चंदनगड हा तीन टप्प्यात आहे. आणि आच किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नदीचे खोरे दुभागले आहे.

चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी या गावात मोडतो तर वंदनगड हा वाई तालुक्यातील बेलमाची गावामध्ये मोडते. चंदन- वंदन किल्ल्याची उंची हे सुमारे 3800 फूट येवढी आहे. व हा किल्ला गिरीदुर्ग प्रकाराच्या किल्ल्यांमध्ये मोडतो. तरी ह्या किल्ल्याची चढाई ही सोपी आहे. व किल्ल्याची सध्याची स्थिती बर्‍यापैकी व्यवस्थित आहे.

चंदन- वंदन किल्ल्याचा इतिहास :

महाराष्ट्रातील पहिला जोडकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा चंदन वंदन किल्ला इतिहासामध्ये महत्त्वाचा समजला जातो.

इ.स. 1191- 1192 सालाच्या सुमारास हे चंदन- वंदन किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले असा उल्लेख ताम्रलेखामध्ये आढळतो. पण पुढे जाऊन 1642 च्या सुमारास शिवाजी महाराजांनी हे किल्ले जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

आफझल खानाच्या वधा नंतर शिवाजी महाराजांनी साताराचा वासोटा जिंकून या चंदन वंदन किल्ल्या वर ही आक्रमण केले. महाराजांनी या किल्ल्याची पूर्वीचे नाव शुरगड आणि संग्रामगड बदलून चंदन- वंदन असे नाव ठेवले.

1673 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा जिल्ह्याचा संपूर्ण प्रांत जिंकून सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबतच चंदन वंदन या किल्ल्यांना सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतले.

त्यानंतर पुढे 1685 च्या सुमारास अमानुल्लाखाने चंदन वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या मध्ये मोगलांच्या हातात 25 घोडे, 20 बंदुका, 2 निशाणे, 1 नणारा सापडला.

पण पुढे 1689 मध्ये हा किल्ला परत मराठ्यांच्या ताब्यात गेला. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा सन 1707 मध्ये हा प्रदेश जिंकून घेतला. नंतर हा चंदन वंदन किल्ला इतर किल्ल्यांप्रमाणेच हा ही इंग्रजांच्या ताब्यात गेला.

चंदन वंदन किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

चंदन गडावरील पाहण्यासारखे ठिकाणे :

1. महादेव मंदिर :

चंदनगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले दोन शिवलिंगे असलेले महादेवाचे मंदिर आहे.

2. दगडी मिनार :

चंदन गडावर राजा भोजने उभारलेल्या दगडी मिनारी गडावर प्रवेश करताच आपल्या नजरेस पडतात.

3. चंदनगड किल्ल्याच्या मध्यभागी एक पायापर्यंत बांधलेला चौथारा आहे.

4. चंदन गडाच्या नैऋत्य दिशेला दारुगोळा ठेवण्याचे पूर्वीचे कोठार आहे.

5. चंदन गडाच्या वायव्ये दिशेला एक बुरुज असून शेजारी एक शिवलिंग असलेली समाधी आढळते व या समाधीच्या एका बाजूला मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे.

वंदन गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

1. वंदन गडावर प्रवेश द्वार आहे आणि या प्रवेश द्वारा वर कीर्तीचक्र आणि गणेश प्रतिमा कोरलेल्या आढळतात.

2. या प्रवेश द्वारातून आत गेल्यावर अजून एक दार लागते हे गडाचे दुसरे प्रवेशद्वार आहे.

3. वंदन गडाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला तटबंदी लागतच हे खंदक आहे.

4. गडाच्या पूर्व दिशेला बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी महादेव मंदिर आहे. व गडाच्या वायेव्य दिशेला काळुवाई मंदिर आहे.

5. वंदनगड किल्ल्यावर पुरातन राजवाडाचे अवशेष आजही बघायला मिळतात.

6. तसेच वंदन गडाच्या पूर्व दिशेला शेकडो पडक्या घराचे अवशेष आढळतात.

7. वंदन गडाच्या दक्षिणेस एक चोरवाट आहे.

चंदन वंदन किल्ल्यावर जाण्याच्या वाटा :

चंदन वंदन किल्ला वर जाण्यासाठी खिंडीतून वाट आहे तसेच राऊत वाडीतून या चंदन- वंदन किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहेत.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment