चाकण किल्ल्याचा इतिहास । Chakan Killa Chi Mahiti

चाकण किल्ल्याचा इतिहास । Chakan Killa Chi Mahiti

चाकण किल्ल्याचा इतिहास । Chakan Killa Chi Mahiti : ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेला हा चाकणचा किल्ला म्हणजेच भुईकोट चा किल्ला होय.

आज आपण याच चाकण किल्ल्याचा इतिहास( Chakan Killa Chi Mahiti ) बघणार आहोत.

चला तर मग बघुया ” चाकण किल्ल्याचा इतिहास ( Chakan Killa Chi Mahiti ) “.

महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देत उभारलेला हा चाकणचा भुईकोट किल्ला आजही आपल्याला बघायला मिळतो. पुण्यापासून साधारणता 20 किलो मीटरच्या अंतरावर आहे.

चाकण किल्ल्याचा इतिहास । Chakan Killa Chi Mahiti

भुईकोट किल्ल्याला संग्रामगड असे म्हणतात. हा संग्रामगड फिरंगोजी नरसाळा या किल्ले दराने बलाढ्य मोगली सेने समोर सलग 55 दिवस लढवल्यामुळे हा किल्ला शिवचरित्रात प्रसिद्ध झाला.

प्राचीन काळात चाकण हे गाव घाट माथ्यावरील व्यापारी केंद्र होते या व्यापारी केंद्राची रक्षण करण्यासाठी व लक्ष ठेवण्यासाठी हा चाकणचा भुईकोट किल्ला बांधण्यात आला त्यामुळे घोटण, पौड या मावळांवर आणि घेडनेर, भीमनेर या नेरांवर नजर ठेवणे सोपे झाले.

  • चाकण किल्ल्याची रचना :

भुईकोट किल्ल्याची उंची भरपूर असल्याने या किल्ल्याला रुंदी सुद्धा चांगली लाभली आहे. या किल्ल्या भोवती एक खंदक खाणलेला आहे. या खंदकामध्ये नेहमी पाणी भरलेले असते.

हा खंदक 6 फूट खोल तर 20 फूट रुंद होता. किल्ल्याचा आकार चौकोनी आहे व सध्याची किल्ल्याची स्थिती ही अगदी खराब आहे. पण शिवाजी महाराजांच्या काळात ह्या किल्ल्याला विशेष महत्त्व होते.

जर महाराष्ट्र शासनाने या किल्ल्याकडे लक्ष देऊन किल्ल्याची डागडुजी केल्यास हा किल्ला पुन्हा नव्याने उभा राहील.

  • चाकण किल्ल्याचा इतिहास :

अनेक प्राचीन काळापासून उभा असलेला हा भुईकोट किल्ला अनेक ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षी आहे. हा किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीकडे या भुईकोट किल्ल्याचा ताबा गेला.

त्यानंतर अल्ला उद्दिनशहा बहामनीने घाटमाथा व कोकणपट्टीवर कब्जा करण्याचा विचार केला व ही कामगिरी त्याने मलिक उत्तुजार वर सोपवले.

त्यानंतर इ.स. 1453 च्या सुमारास मालिक उत्तुजार याने चाकण येथे आपले प्रमुख ठाणे केले. या मोहिमेत विशाळगडावर स्वारी करण्यासाठी निघालेल्या मालिक उत्तुजार व त्याच्या सेनेला शिर्फे आणि मेरे यांनी फसवल त्यांच्यावर अचानक हल्ला करून मलिक उत्तुजार सह त्याच्या 2500 सेनांची कत्तल केली.

पुढे शिवाजी महाराजांचे पणजोबांचे वडील मलोजी व खेळोजी यांना दौलताबादचा सुभेदार आमिरशा याने चाकण चौऱ्यांशी परगण्याची जहागिरी दिली होती.

व पुढे चाकणचा प्रांत शहाजी राजांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी आदिलशहा कडून हा चाकणचा किल्ला म्हणजेच भुईकोट किल्ला जिंकला. व फिरंगोजी नरसाळा यांना किल्लेदार म्हणून निवडले.

पुढे 21 जून 1660 रोजी शाहिस्ते खानाचा 20 हजार फौजेने चाकणच्या भुईकोट किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्यात 600 ते 700 मराठे मावळे होते, धनधान्य व पुष्कळ दारूसाठा होता.

मराठ्यांनी तोफा, बंदुकी यांच्या साह्याने शाहिस्ते खानाच्या सैन्यावर आक्रमण केले. दिवसा मागून दिवस गेले तरी किल्ला काही न पडला नाही ते पाहून शाहिस्ते खानाने ईशान्येकडील बाजूस बुरुजा पर्यंत भुयार खोदले.

या लढाईच्या सुमारे 55 वा दिवस म्हणजे 14 ऑगस्ट 1660 या दिवशी भुयारात दारू भरून बत्ती दिली व 15 ऑगस्ट 1660 रोजी हा हल्ला केला. त्यामुळे हा भुईकोट चा किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला.

  • चाकणच्या किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :

चाकणचा भुईकोट किल्ल्याची कालौधात पडझड झाली असून आज किल्ल्याचे फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत. चाकणचा किल्ला पूर्व पश्चिम असून पूर्वेकडून या किल्ल्यात प्रवेश करता येतो. प्रवेश करताच जिल्ह्यातील खंदक आणि तटबंदी पाहायला मिळते.

प्रवेश द्वाराच्या उजव्या बाजूला देवडी आहे व येथून सरळ किल्ल्यात गेल्यास श्री दामोर विष्णूंचे मंदिर दिसते. या मंदिराच्या दोन्ही बाजूला तोफा ठेवलेला आहेत.

या मंदिराच्या विरुद्ध दिशेला एक तोफ ठेवलेली दिसते व त्याच्याच बाजूला मशिद आहे. व तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.

किल्ल्याच्या तटबंदीवर बंदुका डांगण्यासाठी आजू बाजूला सलग 5 ते 7 खोबण्या केलेल्या दिसतात. या तट बंदीवरुन 3 बुरुज स्पष्टपणे पाहता येतात.

  • चाकण किल्ल्यावर जाण्याचा वाटा :

मुंबई- तळेगाव- चाकण या मार्गाने चाकणला जाता येते. चाकण बस स्थानका पासून उजव्या बाजूला गेल्यास मराठी प्रशाला आहे आणि या प्रशाले समोरून प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यास किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्यात प्रवेश होतो.

इंदुरीचा किल्ल्या पासून चाकणचा किल्ला 15 किलो मीटर अंतरावर आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment