बोर अभयारण्य माहिती । Bor Sanctuary Information In Marathi

बोर अभयारण्य माहिती । Bor Sanctuary Information In Marathi

बोर अभयारण्य माहिती । Bor Sanctuary Information In Marathi : भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखणारे बोर अभयारण्य हे वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये येते.

वाघांसाठी प्रसिद्ध असणारे ताडोबा अभयारण्या नंतर चे हे दुसऱ्या अभयारण्य आहे. आज आपण याच बोर अभयारण्य माहिती बघणार आहोत.

चला तर मग बघुया ” बोर अभयारण्य माहिती ” (Bor abhayarayna mahiti).

बोर अभयारण्य माहिती । Bor Sanctuary Information In Marathi

बोर अभयारण्य वर्धा- नागपूर या जिल्ह्यांमध्ये वसलेले आहे. देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाला लौकिक प्राप्त झाला आहे. हे अभयारण्य आकाराने अगदी लहान आहे पण जैवविविधतेने संपन्न आणि आकर्षित अभयारण्या पैकी एक म्हणजे हे बोर अभयारण्य आहे.

या अभयारण्याचा परिसर हा सुमारे 13 हजार 812. 32 हेक्टर म्हणजेच 138.12 चौरस किलो मीटर क्षेत्रात हे अभयारण्य किंवा व्याघ्र प्रकल्प पसरला आहे.

या अभयारण्याच्या जवळून बोर नदी वाहते त्यामुळेच या अभयारण्यास बोर अभयारण्य असे नाव देण्यात आले असावे. जलाशयाचा भरपूर साठा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी पक्षी या अभयारण्यात पाहायला मिळतात.

Bor abhayarayna mahiti

बोर अभयारण्य हे वाघांसाठी प्रसिद्ध झाले आहे. जगभरात वाघांची कमी होणारी संख्या ही चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या अभयारण्याची निर्मिती केली असावी.

अतिशय कमी वनक्षेत्रात अधिक वाघांचे अधिवास असणारे बोर अभयारण्य वाघांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जाते. बोर अभयारण्यास केंद्र सरकारने व्याघ्र प्रकल्पास मंजुरी दिली आहे. भारत देशातील सहाव्या क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर ओळखले जाते. वर्धा- नागपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या बोर या नदीवर 1965 मध्ये ” यशवंत धरण ” बांधण्यात आले आहे.

बोर अभयारण्यातील निसर्ग, प्राणी, पक्षी संपत्ती :

बोर हे अभयारण्य निसर्ग रित्या अतिशय संपन्न आणि पर्यटनासाठी महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे. विविध प्रकारची झाडे, झुडपे, वेली बोर अभयारण्यात आढळतात. तसेच विविध रंगीबेरंगी फुलझाडे या अभयारण्यात आहेत.

विविध वन्य प्राणी या अभयारण्यात आढळतात. वाघ, बिबटे, अस्वले, चितळ, खवले मांजर, रानगवे, नीलगाय, रान डुक्कर, उडती खार असे विविध प्रकारचे प्राणी येथे आढळतात. तसेच मोर, तुरेवाले गरुड, कबूतर, असे 125 विविध जातींचे पक्षी दूर अभयारण्यात आढळतात.

बोर अभयारण्यातील पर्यटन :

बोर अभयारण्याच्या आसपासचा निसर्ग विविध प्राणी, पक्षी आणि झाडे- झुडपे यामुळे या अभयारण्यात पर्यटकांची संख्या वाढताना दिसत आहे.

ताडोबा अभयारण्या प्रमाणेच बोर अभयारण्या मध्ये पर्यटनाची विविध ठिकाण आहेत. बोर अभयारण्याला दोन प्रवेशद्वार आहेत एक अमरावती – आर्वी या भागाकडून आहे, तर दुसरे हे नवरगाव या गावाकडून आहे.

बोर अभयारण्यात पर्यटकांसाठी विश्रांती गृह बांधलेले आहेत. बोर धरण प्रवेश द्वारा जवळच पर्यटकांसाठी माहिती केंद्र आहे आणि येथूनच व्याघ्र प्रकल्प भेटीसाठी परवानगी दिली जाते. बोर अभयारण्य फिरण्यासाठी येते जिप्सी गाड्यांची सुविधा करून दिली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटन बोर अभयारण्यात पर्यटनासाठी येतात.

बोर अभयारण्यास जाण्याचा मार्ग :

बोरा अभयारण्यास जाण्यासाठी आपण खालील मार्गांचा उपयोग करू शकतो.

१. विमानातून जाण्याचा मार्ग :

बोर अभयारण्या पासून जवळचे विमानतळ हे नाशिक जिल्ह्यात आहे. हे विमानतळ मुंबई, पुणे अश्या आंतरराष्ट्रीय विमान तळांशी जोडलेले आहे.

२. रेल्वे मधून जाण्याचा मार्ग :

बोर अभयारण्या पासून जवळचे रेल्वे स्टेशन हे वर्धा येथे आहे. हे रेल्वे स्टेशन मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर बऱ्याचश्या शहरांशी जोडले आहे. वर्धा पासून पुढे बोर अभयारण्यास जाण्यासाठी पर्यटक खाजगी वाहने, जीप्स आणि बसेसचा उपयोग करतात.

३. रस्त्यावरून जाण्याचा मार्ग :

वर्धा पर्यंत जाण्यासाठी वाहतूक मंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत व तेथून पुढे हिंगणी या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक वाहने अथवा बसेस ची उपलब्धता आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment