भीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी । Bhimashankar Abhayaranya Mahiti Marathi

भीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी । Bhimashankar Abhayaranya Mahiti Marathi

महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक मोठी आरण्ये आणि अभयारण्य आहेत. त्यातील भीमाशंकर अभयारण्य हे महत्त्वाचे अभयारण्य मानले जाते.

आज आपण भीमाशंकर अभयारण्यातील सर्व माहिती जाऊन घेणार आहोत, चला तर मग बगुयात ” भीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी “.

भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असून पुण्यातील खेड तालुक्यात वसलेले अभयारण्य आहे.

भीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी । Bhimashankar Abhayaranya Mahiti Marathi

या अभयारण्याचे विशेष महत्त्व म्हणजे भारतात असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक ज्योतिर्लिंग येथे आहे ते म्हणजे ” भीमाशंकर “. आणि याच कारणामुळे या अभयारण्याला ” भीमाशंकर अभयारण्य ” हे नाव देण्यात आले असावे.

तसेच महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी ती म्हणजे ” भीमा नदी ” येथेच उगम पावते. म्हणून या अभयारण्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

भीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्री पर्वताच्या प्रमुख रांगेत असून ते चोही बाजूंनी अतिशय घनदाट अरण्यानी वेढलेले आहे. 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.

भीमाशंकरच्या जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा आणि बिबट्या अशा प्रकारच्या विविध जातींच्या प्राण्यांचे वस्तीस्थान या अभयारण्यात आहे. तसेच अनेक प्रजातीचे पक्षी सुद्धा आढळतात.

तसेच भीमाशंकर अभयारण्याचे आणखी एक विशिष्ट महत्त्व म्हणजे महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी ” शेकरू ” या सस्तन प्राण्याचे निवासस्थान याच अभयारण्यात आहे.

” शेकरू ” या प्राण्याला उडणारी खार असेही म्हणतात. या जंगलातील शेकरू हा प्राणी तांबूस रंगाचा असून तो फक्त याच जंगलात आढळतो. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथील वन विभागाने विशेष योजनांचा अवलंब केला आहे. भीमाशंकर अभयारण्याच्या सड्यांवर गवळी धनगर समाज राहतो तर डोंगर उतारांवर आदिवासी महादेव कोळी हा समाज राहतो.

अतिशय घनदाट जंगलामुळे व येथे असलेल्या तीर्थ क्षेत्रामुळे भीमाशंकर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.

भीमाशंकर अभयारण्यातील जैवविविधता :

महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्या पैकी एक भीमाशंकर अभयारण्य हे जैवविविधतेने परिपूर्ण आहे. अतिशय घनदाट जंगलांनी हे अभयारण्य बनलेले आहे. भीमाशंकर अभयारण्य हे ” डेसिडियस फॉरेस्ट ” या वनाच्या प्रकारात मोजले जाते. ह्या अभयारण्याच्या परिसरात दरवर्षी सुमारे सात हजार मिलिमीटर पाऊस पडतो.

या अभयारण्याचे सरासरी क्षेत्रफळ हे 130 – 180 किलो मीटर आहे. भीमाशंकरच्या जंगलात आंबा, जांभूळ, उंबर, अंजन, साग, मोह, बांबू, हिरडा, करवंदे, पिसा, आईन अशा वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आढळतात. व जंगली वनस्पतींच्या बऱ्याचशा प्रजाती या जंगलात पाहायला मिळतात. त्याबरोबरच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत.

या अभयारण्यात अनेक जातीचे प्राणी व पक्षी आढळतात. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी ” शेकरू ” ह्या साठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे.

सोबतच या अभयारण्यात वाघ, बिबटे, रानडुक्कर, सोनेरी लांडगा, कोल्हा, काळवीट, मुंगीखाऊ, तरस, वानर, हरीण, सांबर, पिसोरी हरीण, उंदीर इत्यादी प्राणी आढळतात.

प्राण्यांप्रमाणेच मोर, दयाळ, पोपट, कोकीळ, तांबट, घुबड, खाटीक, चंडोल, रान कोंबडी, धनेश, ससाणा, घार आणि गरुड इत्यादी पक्षी सुद्धा आहे ह्या अभयारण्यात बघायला मिळतात.

भीमाशंकर अभयारण्याचे धार्मिक महत्त्व :

भीमाशंकर अभयारण्य पूर्णता जैवविविधतेने नटलेले तर आहेच. पण सोबतच या अभयारण्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.

कारण भारतात असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी सहाव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे पुण्यापासून 127 किलो मीटर अंतरावर वसलेले असून ते भीमाशंकर वन्यजीवन अभयारण्याच्या परिक्षेत्रात येते.

या ज्योतिर्लिंगा मुळेच अनेक श्रद्धाळू भावीक इथे शिवरात्री, श्रावण आणि सोमवारच्या दिवशी मोठ्या संख्येने येतात. भीमाशंकराच्या परिसरात साधारणा 14 देवराई आहेत.देवराई म्हणजे जंगल परिसराचा असा भाग ज्या भागात तेथील रहिवासी पिढ्यानपिढ्याा अध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन जपतात व राहतात.

देवराई फक्त झाडेच नव्हे, तर पूर्ण आदिवास व तेथील सर्व समाज आहे. भीमाशंकर येथे आहुपे या नावाची देवराई 1 हजार वर्षे जुनी आहे असे म्हटले जाते. आज- काल भीमाशंकर हे ठिकाण पर्यटकांसाठी विशेष प्रसिद्ध झाले आहे. येथे अनेक गिर्यारोहन संस्था निसर्ग प्रेमींना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेऊन जातात. पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणचा सर्व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहलीच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात. महाराष्ट्राचा राज्य प्राणी ” शेकरू ” या प्राण्याला पाहण्यासाठी येथे मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळते.

भीमाशंकर अभयारण्याचे भौगोलिक तपशील :

महाराष्ट्र राज्याच्या वन्यजीव विभागात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये पश्चिम घाटातील परिसरात भीमाशंकर अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे.

भीमा शंकर अभयारण्याचे संपूर्ण क्षेत्र हे सुमारे 13 हजार 78 हेक्‍टर इतके मोठे आहे. या अभयारण्यातील वन्य जीव विभागाची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली आहे व हे अभयारण्य पूर्णता संरक्षित करण्यात आले आहे. भीमाशंकर हे अभयारण्य सुमारे तीन हजार फूट इतके उंची कड्यांनी बनले आहे. व या कड्यांचे विभाजन दोन भागात झाले आहे.

१. भीमाशंकर अभयारण्य क्रमांक एक मध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि त्या परिसरातील जंगलाचा भाग समाविष्ट होतो.

२. भीमाशंकर अभयारण्य क्रमांक दोन मध्ये ठाणे, रायगड, जिल्ह्यातील जंगलांचा समावेश होतो. धसई, नारोली, म्हसा ही या जंगल परिसरातील गावांचा समावेश होतो.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment