Balgeet Marathi | मराठी बालगीते
मित्रांनो! लहान मुलांना लहान वयामध्ये च अभ्यासाचे वेड लागावेत म्हणून कित्येक आईवडील आपल्या मुलांना बालगीत शिकवतात. मुलांच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी त्यांना शाळेची आवड निर्माण करून देण्यासाठी आणि अभ्यासांमध्ये त्यांची रुची निर्माण करण्यासाठी बालगीते खूप महत्वाचे ठरतात.
आपल्याला देखील आपल्या लहानपणी आपल्या आईवडिलांनी आनेक बालगिते शिकवलीच असतील.
आजचा डिजिटल काळामुळे आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अलीकडील पालकांना जुन्या काळातील बालगीते येत नाहीत किंवा त्याबद्दल पुरेसे ज्ञान नसते. परंतु काही पालक युट्युब, गुगल यांच्या माध्यमातून आपल्या मुलांना बालगीते शिकवण्याचा प्रयत्न करीत असतात. कित्तेक पालकांची मदत करण्याच्या हेतूने आजच्या लेखामध्ये आणि लहान मुलांसाठी मराठी बालगीते घेऊन आलोत.
Balgeet Marathi | मराठी बालगीते
मला आशा आहे की, आजचा लेख Balgeet Marathi | मराठी बालगीते वाचून आपणास नक्कीच फायद्याचा ठरेल.
मराठी बालगीते म्हणजे काय? Marathi balgeet meaning in Marathi
बालगीते हा शब्द दोन शब्दांचा मिळून बनलेला आहे, ” बाल + गीत = बालगीत “. यादतील बाल या शब्दाचा अर्थ लहान, कोमल असा होतो. तर गीत म्हणजे गाणी होय. बालगीत म्हणजेच “लहान मुलांची गाणी” होय.
मुले जेव्हा तीन ते चार वर्षा च्या दरम्यान असतात किंवा शाळेत जाण्या अगोदर घरात पालकांकडून त्यांना अनेक गीते किंवा गाणे शिकवले जातात. यांनाच बालगीत असे म्हणतात. मुलां मध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी तसेच शाळेत जाण्याची आवड निर्माण करण्यासाठी ही बालगीते खूप महत्वाचे ठरतात.
आजच्या लेखामध्ये आपण काही मराठी बालगीते पाहणार आहोत.
Balgeet Marathi | मराठी बालगीते
1. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार
शेपटीच्या झुपक्या न झाडून जाईल खार
शेपटीच्या झुपक्या न झाडून जाईल खार
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
हॅलो, हॅलो करायला छोटासा फोन
बिस्किटाच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…
कॅण्डी च्या झाडामागे चांदोबा राहातो
मोत्याच्या फुलातुन लपाछपी खेळतो,
हो लपाछपी खेळतो..
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
2. मामाच्या गावाला जाऊया ( Balgeet Marathi )
झुक झुक झुक झुक आगीनगाडी
धुरांच्या रेखा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया | जाऊया
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुनी घेऊया
मामाच्या गावाला जाऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाच्या गावाला जाऊया…
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामाच्या गावाला जाऊया…
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी घेऊया
मामाच्या गावाला जाऊया
झुक झुक झुक झुक आगीनगाडी
धुरांच्या रेखा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया | जाऊया
मामाचा गाव मोठा
3. नाच रे मोरा ( Balgeet Marathi )
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी वीज देते टाळी
आता तुझी पाळी वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ
पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघांत
पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
4. सांग सांग भोलानाथ ( Balgeet Marathi )
सांग सांग भोलानाथ,
पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून,
सुटटी मिळेल काय?
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय?
भोलानाथ… भोलानाथ…
भोलानाथ, भोलानाथ.. खरं सांग एकदा
आठवडयातन रविवार, येतील का रे तीनदा?
भोलानाथ… भोलानाथ…
भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर?
भोलानाथ… भोलानाथ…
5. ससा तो ससा ( Balgeet Marathi )
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहिले
वाटेत थांबले ना, कोणाशी बोलले ना
चालले लुटूलुटू पाही ससा
हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा
झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा, तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही, ओशाळा मनी होई
निजला तो संपला, सांगे ससा
6. शुभम करोती ( Balgeet Marathi )
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||
तिळाचे तेल कापसाची वात |
दिवा जळो मध्यान्हरात |
दिवा लावला देवांपाशी |
उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन |
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते || 3 ||
अधिराजा महाराजा वनराज वनस्पती |
इष्टदर्शनं इष्टानं शत्रूणां च पराभवम् |
मुले तु ब्रह्मरुपाय मध्ये तु मध्यविष्णुरुपिण: |
अग्रतः शिवरुपाय अश्वत्थाय नमो नमः ||
7. चांदोबा चांदोबा भागलास का? ( Balgeet Marathi )
चांदोबा चांदोबा भागलास का?
लिंबोणीच्या झाडामागे लपलास का
लिंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
चांदोबा चांदोबा भागलास का
आई बाबांवर रुसलास का
कशास एकटा बसलास का
आतातरी परतून जाशील का
दुध आणि शेवया खाशील का ….
चांदोबा चांदोबा भागलास का?
लिंबोणीच्या झाडामागे लपलास का
लिंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
चांदोबा चांदोबा भागलास का
आई बिचारी रडत असे
बाबांचा पर चढत असे
असाच बसून राहशील का
बाबांची बोलणी खाशील का ….
चांदोबा चांदोबा भागलास का?
लिंबोणीच्या झाडामागे लपलास का
लिंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
चांदोबा चांदोबा भागलास का
चांदोबा चांदोबा कुठेरे गेला
दिसता दिसता गडप झाला
हाकेला ओ माझ्या देशील का
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का …
8. मी नाही अभ्यास केला ( Balgeet Marathi )
दुपारचा वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
दुपारचे वाजले दोन
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
दुपारचे वाजले तीन
ताईची हरवली पीन
पीन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
दुपारचे वाजले चार
आईनी दिला मार
मार खाउन रडण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
संध्याकाळचे वाजले पाच
ताईने केला नाच
नाच बघण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
संध्याकाळचे वाजले सहा
आईने केला चहा
चहा पिण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
संध्याकाळचे वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले आठ
ताईने फोडला माठ
तुकडे उचलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले नउ
घरात शिरली माउ
माउ हाकलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले दहा
टीव्ही वरची गंमत पहा
टीव्ही बघण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले अकरा
बिल्डिंगमध्ये शिरला बकरा
बकरा हाकलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले बारा
आईचा चढला पारा
तिला शांत करण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
9. येरे येरे पावसा ( Balgeet Marathi )
येरे येरे पावसा, तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
ये ग ये ग सरी, माझे मडके भरी
सर आली धाउन,
मडके गेले वाहुन!
10. लकडी की काठी ( Balgeet Marathi )
लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा
घोडे की दुम पे जो मारा हथौड़ा
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा
लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा
घोडे की दुम पे जो मारा हथौड़ा
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा
लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा
घोडे की दुम पे जो मारा हथौड़ा
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा
घोड़ा पहुंचा चौक में
चौक में था नाई
घोड़े जी की नाई ने हजामत जो बनाई
टग-बग, टग-बग
टग-बग, टग-बग
घोड़ा पहुंचा चौक में
चौक में था नाई
घोड़े जी की नाई ने हजामत जो बनाई
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा
लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा
घोडे की दुम पे जो मारा हथौड़ा
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौडा
ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला
घोड़ा था घमंडी
पहुंचा सब्जी मंडी
सब्जी मंडी बरफ पड़ी थी
बरफ में लग गई ठंडी
टग-बग, टग-बग
टग-बग, टग-बग
घोड़ा था घमंडी
पहुंचा सब्जी मंडी
सब्जी मंडी बरफ पड़ी थी
बरफ में लग गई ठंडी
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा
लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा
घोडे की दुम पे जो मारा हथौड़ा
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा
घोड़ा अपना तगड़ा है
देखो कितनी चर्बी है
चलता है महरौली में
पर घोड़ा अपना अरबी है
घोड़ा अपना तगड़ा है
देखो कितनी चर्बी है
चलता है महरौली में
पर घोड़ा अपना अरबी है
बाँह छुड़ा के दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा
लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा
घोडे की दुम पे जो मारा हथौड़ा
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा
ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला
तर मित्रांनो ! ” Balgeet Marathi | मराठी बालगीते “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
ये देखील अवश्य वाचा :-
- स्त्री पुरुष समानता मराठी निबंध
- वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध
- Mole चा अर्थ काय?
- तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध
- RIP म्हणजे काय?
धन्यवाद मित्रांनो !