अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी । Ajinkyatara Fort History In Marathi

अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी । Ajinkyatara Fort History In Marathi

अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी । Ajinkyatara Fort History In Marathi : अजिंक्यतारा हा महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे.

आज आपण याच अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी सविस्तर मध्ये बघणार आहोत.

आणि अजिंक्यतारा चा इतिहास देखील आज आपण पाहणार आहोत ( Ajinkyatara Fort History In Marathi ).

अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी । Ajinkyatara Fort History In Marathi

चला तर मग बघुया ” अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी मध्ये “. प्रतापगड किल्ला पासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर हा अजिंक्यतारा किल्ला उभारला आहे. अजिंक्यतारा किल्ल्याची उंची ही साधारणता 4,400 फूट येवढी आहे.

व या किल्ल्याचा दक्षिणोत्तर विस्तार 600 मीटर एवढा आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकाराच्या किल्ल्यांमध्ये मोडतो व ह्या किल्ल्याची चढाई ही सोपी आहे व अजिंक्यतारा किल्ल्याची सध्याची स्थिती ही बऱ्यापैकी व्यवस्थित बघायला मिळते. आज या किल्ल्यावर वृक्ष रोपणाचे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.

अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास :

सातारचा किल्ला म्हणजेच हा अजिंक्यतारा किल्ला हा मराठ्यांची चौथी राजधानी होता. अजिंक्यतारा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसर्‍या भोज राजाने इ.स. 1190 मध्ये बांधला होता. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला.

अजिंक्यतारा किल्ल्याचा पूर्वीचा उपयोग हा जेल म्हणून होता. पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी हिला किश्वरखान याने याच जेल मध्ये कैद करून ठेवले होते.

पुढे 17 जुलै 1673 मध्ये शिवाजी महाराजांच्या हाती हा किल्ला गेला. व याच अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवाजी महाराजांना ज्वर झाला तेव्हा दोन महिने त्यांनी वास्तव्य केले होते. पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1682 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात आला व त्याने इ.स. 1699 मध्ये त्याने या अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा घातला.

या लढाईत औरंगजेबाचा पराभव होऊन सुभानजीने हा किल्ला जिंकला. व किल्ल्याचे नामकरण आझमतार झाले. त्यानंतर ताराराणीच्या सैन्याने हा किल्ला जिंकुन त्याचे नाव बदलून अजिंक्यतारा असे केले. परंतु पुन्हा हा अजिंक्यतारा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. पुढे 1708 मध्ये छत्रपती शाहू महाराजांने पुन्हा किल्ला घेतला आणि स्वतःस राज्याभिषेक करून घेतले.

मराठी साम्राज्याचा कारभार सांभाळताना छत्रपती शाहू महाराजांनी सातारा शहराची स्थापना केली व पुढे 11 फेब्रुवारी 1818 मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा अजिंक्यतारा किल्लाही इंग्रजांकडे गेला.

अजिंक्यतारा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

साताराची राजधानी असलेला हा अजिंक्यतारा किल्ल्यावर आपणास पाहण्यासारखी बहुतेक ठिकाणे आजही चांगल्या स्थितीत आहेत.

साताऱ्या पासून ज्या मार्गाने आपण अजिंक्यतारा किल्ल्यावर प्रवेश करतो. त्या मार्गावरच दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी एक दरवाजा चांगल्या अवस्थे मध्ये बघायला मिळतो. व या दरवाजाचे दोन्ही बुरुज ही अस्तित्वात आहेत. किल्ल्यावर प्रवेश करताच आत मध्ये हनुमानाचे मंदिर दिसेल.

तसेच डाव्या बाजूच्या रस्त्याने सरळ गेले असता महादेवाचे मंदिर आहे. तसेच किल्ल्यावर मंगळादेवी मंदिर सुद्धा आहे. या मंगळादेवी मंदिराकडे जाताना वाटेत ताराबाई यांचा असलेला राजवाडा दिसेल पण हा वाडा आज ढासळलेल्या अवस्थेत आहे.

अजिंक्यतारा किल्ल्याहून समोरचा यवतेश्वराचे पठार चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा, आणि सज्जनगड हा परिसर दिसतो. संपूर्ण अजिंक्यतारा किल्ला बघण्यासाठी साधारणता दीड तासाचा कालावधी लागतो. किल्ल्या वरून मराठ्यांची राजधानी असलेला सातारा शहराचे सौंदर्य दृष्टीस पडते.

अजिंक्यतारा किल्ल्यावर कसे जाल :

अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरात असल्याने सातारा पासुन या किल्ल्यावर घेऊन जाण्यासाठी खाजगी वाहने तर आहेतच सोबतच सातारा एस.टी. स्थानकावरून अदालत किश्वरखान जाणाऱ्या कोणत्याही बसने अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जाता येते.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment