आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh Vidyarthi Nibandh In Marathi

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh Vidyarthi Nibandh In Marathi

आजचा विद्यार्थी म्हटलं की, आपल्या‌ मोर भांडणखोर, दंगाखोर, सतत मस्ती करणारा, ते बोलणारा,आभ्यास न करणारा, मोठ्यांचा आदर्श न करणारा, अशा विद्यार्थ्यांची प्रतिमा उभी राहते.

यामागचे कारण म्हणजे बदलत चाललेली जीवनशैली होय ज्या प्रमाणे काळ बदलतो त्याप्रमाणे माणसाची जीवनशैली, वर्तणूक आणि स्वभाव देखील बदलतो. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आदर्शाचे कोणतेही गुण दिसत नाहीत आणि याला कारणीभूत तुम्ही आम्हीच आहोत.

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh Vidyarthi Nibandh In Marathi

प्रत्येक आई वडिलांचे किंवा शिक्षकांचे आशा असते की यांच्या हाताखाली शिकणारा हा विद्यार्थी आदर्श असला पाहिजे परंतु कोणताही विद्यार्थी जन्माला येताच आदर्श नसतो.

जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळते चांगल्या लोकांचा सहवास लाभतो तेव्हा तो विद्यार्थी नक्कीच एक आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी तत्पर असतो. प्रत्येक वर्गामध्ये एक तर आदर्श विद्यार्थी असतो. त्या विद्यार्थ्याकडे पाहून शिक्षक आणि इतर विद्यार्थी देखील प्रभावित होतात.

शाळेमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये शिकवणार्‍या प्रत्येक शिक्षकाला वाटत असते की, आपला वर्ग हा आदर्श विद्यार्थ्यांनी भरावा. एखाद्या विद्यार्थ्याला आदर्श बनवायचे की वाईट मार्गावर घेऊन जायचे हे शिक्षक, पालक आणि स्वतःच्या विद्यार्थ्यावर अवलंबून असते.

एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा गुण असावा तो म्हणजे ” मेहनत “. मेहनत करून आयुष्यात पुढे जाणारे व्यक्ती जीवनामध्ये किंवा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी नक्कीच यशस्वी होते.

मेहनत करून जो आपल्या आयुष्यात एक स्वप्न निर्धारित करून त्या दिशेने वाटचाल करतो तो नक्कीच इतरांसाठी आदर्श बनतो.

आदर्श विद्यार्थी जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले संपूर्ण बळ लावून प्रयत्न करतो. अभ्यास असो किंवा खेळ असो इतर कुठलीही गोष्ट असो तो प्रत्येक गोष्टींमध्ये प्रयत्न करून ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत असतो.

जीवनात आवश्यक असलेल्या कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न करण्याचा संकोच न करणे हे आदर्श विद्यार्थ्याचे खूप महत्त्वपूर्ण लक्षण आहे.

एक आदर्श विद्यार्थ्याचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे त्यामध्ये असलेला ऊर्जावानपणा. एक विद्यार्थी हा उर्जेने भरलेला असावा. विद्यार्थ्यांमध्ये आळस भरलेला नसून काम करण्यासाठी सतत ऊर्जा भरलेली असणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यासोबतच एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये सकाळी लवकर , उठणे व्यायाम करणे, व आपले महत्वाची कामे आटोपूने ही दिनचर्या ठरलेली असावी. तसेच एक आदर्श विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांनी आपली सर्व कामे वेळेवर पूर्ण करावी.

कोणत्याही फालतू गोष्टीसाठी आपला वेळ वाया घालवावा. मोबाईल, टीव्ही इत्यादी मनोरंजनाच्या साधनांचा आवश्‍यकतेपेक्षा जास्त वापर करू नये. तसेच आरोग्यदायी भाजीपाला खाणे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीरात उर्जा राहते व त्याचे चित्त किंव्हा एकाग्रता अभ्यासामध्ये लागते.

जिज्ञासा हादेखील एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये असलेला आवशक्य गुण आहे. एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची व अवलंब करण्याची नेहमी जिज्ञासा असली पाहिजे.

काहीना काही गोष्टींमधून ज्ञानग्रहण करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतो. तसेच अभ्यासाचा संबंधित शिक्षकांना वेळोवेळी वेगवेगळे प्रश्न विचारणे, वेळोवेळी पुस्तके व माहिती वाचून ज्ञान प्राप्त करणे, आपल्या कल्पना शक्ती मधून नवीन प्रश्नांना जन्म देऊन त्यांच्या उत्तराचा शोध घेणे अशी कार्य आदर्श विद्यार्थी करीत असतो.

सकारात्मकता हा देखील आदर्श विद्यार्थ्यांमध्ये असलेला आवश्यक गुण आहे.  आयुष्य जगताना आणि आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यासोबत प्रत्येक व्यक्तीसाठी सकारात्मकता हा गुण महत्त्वाचा आहे. कारण सकारात्मक दृष्टिकोन हा सर्व समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.

आजच्या विद्यार्थ्यांना जर आदर्श विद्यार्थी बनवायचा असेल तर सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे खूप गरजेचे आहे. समोर येणाऱ्या प्रत्येक समस्या ला हसून स्वीकारणे गरजेचे आहे. त्यामुळेच आदर्श विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ता हा गुण असणे आवश्यक आहे.

याशिवाय एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे नेहमी खरे बोलणे. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा नेहमी आदर करून त्यांच्या आज्ञेचे पालन करणे.

तसेच विद्यार्थी खोटं बोलत होतो एक खोटं लपवण्यासाठी आणि खोटे बोलतो त्यामुळे आदर्श विद्यार्थी बनायचे असेल तर नेहमी खरे बोलणे गरजेचे आहे.

परिस्थिती कशी ही आसो त्या परिस्थितीमध्ये नेहमी सत्याचा किंवा खार याचा मार्ग अवलंबावा. खोटे बोलणाऱ्या व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कधीही  यशस्वी होऊ शकत नाही.

त्यामुळे खोटे बोलणे हा दुर्गुण काढून टाकणे आजच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे. याशिवाय नेहमी मोठ्यांच्या अन्यायाची पालन करणे त्यांचा आदर करणे यामुळे विद्यार्थी आज्ञाकारी होतात.

मोठ्या व्यक्ती ही नेहमी आपल्याला आपल्या चांगल्या साठी काही ना काही सल्ला देत असतात त्यामुळे मोठ्यांच्या ऐकल्याने आपल्याला यश प्राप्तीसाठी मदत होते. आणि आज्ञाधारक हा एक आदर्श विद्यार्थ्यांचे गुण म्हणून ओळखला जातो.

याशिवाय एखाद्या विद्यार्थ्याला आदर्श घडविण्यासाठी आई-वडील, शिक्षक आणि समाजाचे मोठे योगदान असते.

लहानपणापासून मिळालेले शिक्षण आणि संस्कार हे मुलांना भविष्यामध्ये आदर्श विद्यार्थी बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. एक आदर्श विद्यार्थी त्याच्या आयुष्यातील सर्व समस्यांना पार करत देशाचे, आई-वडिलांचे आणि समाजाचे नाव उंच करीत असतो.

त्यामुळे आपल्या समाजातील आजचा विद्यार्थी हा आदर्श व्हायलाच हवा. म्हणून शाळेतील शिक्षकांनी आणि पालकांनी आपल्या विद्यार्थ्याकडे योग्य लक्ष देऊन त्यांच्यातील दुर्गुणांचा नाश करून आजचा आदर्श विद्यार्थी बनविण्याकरिता हातभार लावला पाहिजे.

तर मित्रांनो ! ” आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh Vidyarthi Nibandh In Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment