आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या निबंध मराठी | Aajchya Vidhyarthyache Samasya Marathi Nibandh

आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या निबंध मराठी | Aajchya Vidhyarthyache Samasya Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या निबंध मराठी | Aajchya Vidhyarthyache Samasya Marathi Nibandh “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या निबंध मराठी | Aajchya Vidhyarthyache Samasya Marathi Nibandh

शालेय आणि महाविद्यालयीन मुलांना आपल्या जीवनामध्ये शाळेमध्ये आणि महाविद्यालय ज्ञानाचा भंडार घेत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

एक विद्यार्थ्याला विद्यार्थी म्हणून आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी संघर्ष आणि विविध समस्यांना तोंड देऊन पुढे जावे लागते. विद्यार्थ्यांचे शिशुवर्गात नाव दाखल केल्यापासून पदवी मिळेपर्यंत विद्यार्थी दशा चालू असते. अलीकडच्या काळामध्ये तर विद्यार्थ्यांचे अनेक दशा पाहायला मिळतात.

विद्यार्थी शिक्षणाच्या केंद्रस्थानी असला तरी त्याच्या सभोवताली अनेक प्रश्नांची आणि समस्याचे प्रश्नचिन्ह पाहायला मिळतात. ही प्रश्नचिन्हे देशभरातील सर्व विद्यार्थ्यांच्या सभोवताली जणू फेरस धरून जमलेली असतात.

विद्यार्थी दशांमध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड देऊन यशस्वीरित्या पुढे जाणे हे सर्व विद्यार्थ्यांसाठी असलेली सर्वात मोठी समस्या आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या समोर येणाऱ्या समस्यांमध्ये एक प्रश्नचिन्ह असते ते म्हणजे शिक्षणाच्या माध्यमाचे!

आजच्या काळामध्ये शिक्षण विविध माध्यमातून दिले जाते जसे की, इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यम, मराठी माध्यम. अशा माध्यमांत पैकी नेमका कुठला माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे हे विद्यार्थ्यांसमोर असणारे प्रथम प्रश्नचिन्ह असते.

काही विचारवंतांच्या मते शिक्षण हे स्वतःच्या मातृभाषेच्या माध्यमातून घेणे उचित आहे. तर काहींच्या मते, इंग्रजी माध्यम हे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. परंतु आपल्यातील काही विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा ही सहज लिहिता बोलता आणि वाचता येत नाही अशा विद्यार्थ्यांना मातृ भाषेचे पुरेसे ज्ञान असल्यानंतर हे विद्यार्थी पात्र भाषेमधून शिक्षण घेतात.

अशा माध्यमाच्या स्तरावर विद्यार्थी गोंधळून जात आहे. पदवीत्तोर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीसाठीही माध्यमांचा विचार केला जातो ज्यांनी उच्च माध्य मातून शिक्षण घेतले आहे त्यांना उच्च स्तरावरील नोकरी दिली जाते. त्यामुळे आजचा विद्यार्थी नेमके कुठल्या माध्यमातून शिक्षण घ्यावे या समस्यांनी गोंधळून गेलेला आहे.

त्यांना शिक्षण घेत असताना अनेक बऱ्याचशा समस्यांतून जावे लागते त्यातील एक समाजामध्ये अभ्यासासाठी पुरेशी जागा नसणे. दोन खोलीच्या जागेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ आणि जागा मिळत नाही.

विद्यार्थ्यांचे पालक सुशिक्षित किंवा अशिक्षित असले तरी पालकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणे फार गरजेचे आहे. जर पालकांच्या मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले नाही तर विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण येते. तर काही पालकांना आपल्या मुलांकडून उत्कृष्ट गुण मिळवून प्रथम क्रमांक आणण्याची इच्छा असते.

अशा इछ्याच्यामुळे देखील विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण येते. अशा वेळी विद्यार्थ्यांना शिकवणीच्या दावणीला बांधले जाते. शाळेमध्ये अभ्यास पुन्हा घरी आल्यानंतर शिकवणीचा अभ्यास यामुळे मुलांना मनमोकळेपणाने खेळायला पुरेसे वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनाचा कोंडमारा होतो, त्यामुळे मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास योग्यरित्या होत नाही.

शाळा आणि महाविद्यालय परीक्षेच्या वेळी तर मुलांच्या मनावर कष्टाचा जणू डोंगरच कोसळतो‌. परीक्षेच्या वेळी प्रत्येक विद्यार्थ्यांना अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास करावा लागतो.

परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना करमणुकीच्या साधनांचा पासून दूर ठेवले जात. त्यासोबतच खेळापासून देखील दूर ठेवले जाते, अशा वेळी विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येऊन विद्यार्थी कॉपी करणे, पेपर चोरणे, पेपर फुटणे, पेपर तपासण्या तलाव भ्रष्टाचार या सर्व गोष्टीतून विद्यार्थी सुटला, उत्तीर्ण झाला तर त्या विद्यार्थ्यांचे नशीब समजायचे!

एवढे करून सुद्धा काही विद्यार्थ्यांना मनासारख्या मार्क मिळत नाहीत त्यामुळे हव्या त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थान मध्ये तणाव निर्माण होतो. तर काही विद्यार्थी उच्च पैसा देऊन हव्या त्या पदासाठी ऍडमिशन घेतात.

त्यामुळे विद्यार्थी चुकीच्या मार्गाला लागतात जसे की मनासारखे ॲडमिशन न मिळाल्याने विद्यार्थी कॉपी करणे, पेपर चोरणे अशा चुकीच्या मार्गाला लागतो. अशा अनेक कारणामुळे विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा आपण लपवून टाकतो. आणि आपणच आपल्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता परकीय लोकांना विकतो.

अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे वैयक्तिक नुकसान होतेच तर त्यासोबत देशाचे सुद्धा नुकसान होते. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या फक्त विद्यार्थ्यांच्या समस्या नसून देशाच्या समस्या बनलेले आहेत.

त्यामुळे जेव्हा आपण संपूर्ण दुष्ट विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करतो, त्यांचे निराकरण करतो तेव्हाचा आजच्या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान आणि आजचा विद्यार्थी ज्या समस्यांतून जात आहे त्या   समस्यांपासून विद्यार्थ्यांची सुटका होईल.

तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्या कडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment